श्रावण महिन्यात घरी घेऊन या यापैकी कोणतीही गोष्ट, चमकेल नशीब….

देवांचे देवता महादेव यांचा सर्वात प्रिय महिना श्रावण, जो लवकरच चालू होणार आहे, विशेषत: या दिवसात भोलेनाथांची पूजा केली जाते आणि भाविक श्रावण सोमवारी व्रत ठेवतात, श्रावण महिन्यात सात्विक धर्माचे पालन करण्याची परंपरा मानली जाते.
जर भोलेनाथ एखाद्या व्यक्तीच्या भक्तीने प्रसन्न झाले तर त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील, शिवजींची भक्ती केल्याने शरीर, मन आणि आ त्मा शुद्ध होईल. श्रावण महिन्यातील पवित्र दिवसांमध्ये आपल्या भोवताली लोक भोलेनाथांचा जय जय कार करताना आपण पहिलेच असेल.
परंतु तुम्हाला माहिती आहे का, की श्रावण सारख्या पवित्र महिन्यात आपण काही वस्तू आपल्या घरी आणल्या तर जीवनात त्याचे बरेच फायदे होतात, जर तुम्ही श्रावण महिन्यात या गोष्टी आणल्या तर आपल्या जीवनात खूप मोठया सुधारणा होऊ शकतात आणि आपले बिघडलेली कामे व्यवस्थित होतील.
श्रावण महिन्यात घरी आणा यापैकी कोणतीही एक गोष्ट
त्रि शूळ– जर आपण श्रावणातल्या पवित्र दिवसांत त्रि शूळ विकत घेतला आणि आपल्या घरी आणला तर हे वर्षभर आप त्तीपासून आपले रक्षण करू शकते, कारण आपल्याला माहित आहे की महादेव नेहमीच हातात त्रि शूळ बाळगतात, हे तीन देव आणि तीन लोकांचे हे एक प्रतीक मानले जाते.
रुद्राक्ष– जर आपण श्रावण महिन्यात रुद्राक्ष आणला तर ते खूप शुभ मानले जाते. हे आपल्या घरातील कुटुंबात आनंद आणि समृद्धी आणते आणि आपल्याला सौभाग्य प्राप्त होते.
डमरू– डमरू हे भगवान शंकराचे सर्वात पवित्र साधन आहे, जर आपण ते श्रावण महिन्यात आपल्या घरी आणले तर घराची नकारात्मक उर्जा निघून जाते, डमरूच्या आवाजाने आसपासच्या नकारात्मक शक्तींचा नाश होतो, केवळ तेच नव्हे तर घरातील कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य देखील चांगले राहते, आपण श्रावण महिन्यात आणलेले हे डमरू शेवटच्या दिवशी आपण कोणत्याही मुलाला भेट म्हणून देऊ शकता.
बेलपत्र– महादेवाच्या पूजेमध्ये, बेलपत्र अर्पण केले जाते, जर आपण श्रावण महिन्यात चांदीचे बेलपत्र आणले असेल आणि नियमितपणे त्याची पूजा करुन भगवान शिवला अर्पण केले तर सर्व पापांचा नाश होईल.
नंदी– श्रावण महिन्यात तुम्ही चांदीच्या नंदी घरी आणल्यास ते तुमच्या जीवनातील अनेक त्रास दूर करते, नंदी हे भगवान शंकराचे गण आहेत आणि त्यांचे वाहन देखील नंदी आहे, जर तुम्ही चांदीच्या नंदीला घरी आणून त्याची पूजा केली तर आपण आर्थिक संकटातूनही मुक्त होऊ.
नाग– हा भगवान शंकरांचा दागिना आहे. ते त्याला नेहमी आपल्या गळ्यात धारण करून ठेवतात. जर तुम्ही श्रावण महिन्यात नाग- नागीण ची एक चांदीची जोडी घरी घेऊन येता, आणि रोज त्याची पूजा कराल, तर त्यामुळे कालसर्प दोषापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. एवढेच नाही तर पितृ दोष सुद्धा दूर होतो.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.