३० वर्षांनी शनी जयंतीला दुर्मिळ योग: केवळ ‘या’ ३ राशींना धनलाभाचे योग; फायदेशीर काळ

३० वर्षांनी शनी जयंतीला दुर्मिळ योग: केवळ ‘या’ ३ राशींना धनलाभाचे योग; फायदेशीर काळ

ज्योतिषशास्त्रात शनी हा ग्रह अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एवढेच नाही तर त्याच्या जयंतीचा दिवसही साजरा केला जातो. हिंदू धर्मात शनैश्चर जयंतीला खूप महत्त्व आहे. दरवर्षी वैशाख अमावास्येला शनी जयंती साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेवाचा पुत्र शनिदेव याचा जन्म झाला असे मानले जाते.

ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्याय देवता म्हटले जाते. शनिदेव प्रत्येकाला कर्मानुसार फळ देतात. तसेच सत्कर्म करणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव कृपा करतात, असे मानले जाते.

आताच्या घडीला शनी स्व-राशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे. कुंभ राशीचे स्वामित्व शनीकडे आहे. यामुळे मकर, कुंभ आणि मीन या राशींची साडेसाती सुरू आहे. शनी जयंतीला विशेष योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे.

सोमवती अमावास्या आणि शनैश्चर जयंती हा योग शुभ मानला जात आहे. याचे कारण शनी देव महादेवांना आपले गुरू मानतात. त्यामुळे या दिवशी गुरु-शिष्याचे एकाच दिवशी पूजन करण्याचे भाग्य भाविकांना लाभणार आहे.

याशिवाय, वृषभ राशीत बुधचा उदय या दिवशी होणार आहे. या दिवशी संपूर्ण दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग जुळून येणार आहे. यामुळे या दिवशी उपाय केल्यास दुहेरी फळ मिळू शकते.

शनैश्चर जयंतीला शनिदेवाची कृपा मिळवायची असेल, तर शुभ मुहूर्तावर पूजा करणे खूप शुभ ठरू शकेल. दुसरीकडे, शनिदेव या दिवशी त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत राहतील, असा योग जवळपास ३० वर्षांनंतर जुळून येत आहे.

मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीच्या व्यक्तींसाठी शनी जयंती विशेष ठरू शकते. या निमित्ताने नानालाभ प्राप्त होऊ शकतात. या काळात तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकता. व्यवसाय आणि करिअरमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. करिअरमध्ये यश व प्रगती मार्ग प्रशस्त होऊ शकते. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते.

शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शनी जयंती फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला कार्यक्षेत्रात उत्तम यश संपादन करता येऊ शकेल. प्रगतीच्या चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतील. तुम्ही व्यवसायात चांगले पैसे कमवू शकता. करिअरमध्ये यश मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीच्या व्यक्तींसाठी शनी जयंती शुभ ठरू शकेल. धनु राशीच्या लोकांना साडे सातीपासून मुक्ती मिळाली आहे. तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. या काळात तुमची शक्ती आणि धैर्य वाढेल. यासोबतच तुम्हाला कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकेल.

Team Beauty Of Maharashtra