जोतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार अशी असावी घड्याळाची दिशा, संपत्ती आणि समृद्धीने होईल जीवनात भरभराट…

जोतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार अशी असावी घड्याळाची दिशा, संपत्ती आणि समृद्धीने होईल जीवनात भरभराट…

ज्योतिषशास्त्र आणि वस्तू अनुसार घड्याळ जर घर आणि कार्यालयात योग्य ठिकाणी लावले तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. त्याच बरोबर हे देखील पाहिले गेले आहे की जर घड्याळ वास्तुच्या नियमांविरुद्ध ठेवले असेल तर तोटा सहन करावा लागतो किंवा त्या ठिकाणी कायम नकारात्मकता राहते.

‘माझा वेळ चांगला जात नाही’ असे लोकांच्या तोंडून आपण नेहमीच ऐकत असाल. परंतु जेव्हा ज्योतिषशास्त्र आणि वस्तूशास्त्रचा विचार केला जातो तेव्हा हे अनोखे शास्त्र आपल्याला अशी माहिती देतात की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या मदतीने हे दोष कमी केले जाऊ शकतात आणि वेळ अनुकूल बनविला जाऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या किंवा कार्यालयाच्या दक्षिणेकडील भिंतीवर घड्याळ असू नये. दक्षिण दिशा ही यमाची दिशा असल्याचे मानले गेले आहे. यम हा हिंदू शास्त्रांमध्ये मृत्यूचा देव मानला जातो.

जर नशीब आणि वेळ तुम्हालाही पाठिंबा देत नसेल तर मग आपले घर आणि वास्तुला पूर्णपणे वास्तूशी सुसंगत करा आणि सकारात्मक शक्ती वाढवा.

ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या दक्षिण दिशेची शुभता वाढविण्यासाठी आपण घराच्या कर्त्यापुरुषाचा फोटो लावू शकता कारण ही दिशा घराच्या मुख्य व्यक्तीची आहे. असे केल्याने, मुख्य व्यक्तीचे आरोग्य नेहमीच चांगले राहते.

घराच्या मुख्य दरवाजाच्या वर कधीही घड्याळ लावू नका. बंद घडाळ्याला शक्य तितक्या लवकर काढून टका किंवा दुरुस्त करून घ्या. जर घड्याळ खराब झाले असेल तर ते घरी ठेवू नका.

भेट म्हणून कोणत्याही नातेवाईकांना घड्याळ देऊ नये. भिंतीवरच्या घड्याळावर कधीही धूळ बसू देऊ नका, ते नेहमी स्वच्छ ठेवा. मधुर आवाज असलेल्या घड्याळे लावा. घराच्या पूर्वे, उत्तर आणि पश्चिम दिशेलाच घड्याळ लावा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra