‘मुलगी झाली हो’ मालिकेत दिसणार ‘बिगबॉस’ मधील कलाकार, बघा कोण आहे तो कलाकार

सध्या मराठी मालिकांमध्ये अनेक मालिका या प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या आहेत. मात्र, यातील काही मालिका या प्रेक्षक आवर्जून पाहत असतात. यामध्ये “आई कुठे काय करते”, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या सारख्या मालिका आहेत. मात्र, याहून अधिक एक मालिका म्हणजे “मुलगी झाली हो” ही मालिका देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
या मालिकेतील सगळ्याच अभिनेत्याच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. सध्या मराठी मालिकांमधील अनेक कलाकार हे मराठी बिग बॉस तीनच्या पर्वामध्ये दिसताहेत. मराठी बिग बॉस हे पर्व चांगलेच चालत आहेत. मात्र, बिग बॉस मधून मराठी मालिकेत काम करण्यास एखादी अभिनेत्री अपवादात्मक तयार होईल.
आज आम्ही आपल्याला याबद्दलच माहिती देणार आहोत. सध्या मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वा मध्ये धूमधडाका सुरू आहे. यामध्ये अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. त्यामध्ये स्नेहा वाघ ही अभिनेत्री देखील सहभागी झालेली आहे. त्याचप्रमाणे तिचा माजी पती अविष्कार दारव्हेकर देखील या शो मध्ये दिसत आहे. दोघांची केमिस्ट्री पुन्हा जुळणार का? याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे.
याप्रमाणे सुरेखा कुडची देखील या बिग बॉसच्या भागात दिसत आहेत. विशेष म्हणजे मराठी बिगबॉस तिसऱ्या पर्वामध्ये शिवलीला पाटील या कीर्तनकार देखील दिसत आहेत. त्यामुळे अनेक जण आश्चर्यचकित झालेले आहेत. एखाद्या कीर्तनकार महिलेने अशा शोमध्ये सहभागी व्हावे का? असे म्हणून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यादेखील बिग बॉस, मध्ये दिसत आहेत. आपण काही वर्षापूर्वी आलेली “उंच माझा झोका” ही मालिका पाहिली असेल. उंच माझा झोका या मालिकेमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले होते. मात्र, यामध्ये असलेल्या छोट्या रमाबाईंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यामध्ये शर्मिष्ठा राऊत यांनी देखील भूमिका केली होती.
शर्मिष्ठा राऊत या अतिशय ग्लॅमरस अशा अभिनेत्री आहेत. मात्र, या मालिकेत त्यांनी अतिशय पारंपरिक भूमिका केली होती. त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक देखील झाले होते. मात्र, कालांतराने शर्मिष्ठा राऊत यांनी काही चित्रपटांमध्ये देखील नशीब आजमावले. मात्र, त्यांना फारसे यश मिळाले नाही. शर्मिष्ठा राऊत या मराठी बिग बॉस च्या पहिल्या पर्वा मध्ये दिसल्या होत्या.
आता शर्मिष्ठा राऊत या मुलगी झाली हो, या मालिकेमध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येते. या मालिकेमध्ये त्या निर्मला सामंत ही भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे त्या “हे मन बावरे” या मालिकेत देखील दिसणार आहेत. “मुलगी झाली हो” या मालिकेमध्ये आता त्या कशाप्रकारे भूमिका निभावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.