शरद पवारांच्या नातवाचा प्रसिद्ध अभिनेत्री सोबतचा फोटो व्हायरल, उलटसुलट चर्चांना उधाण

शरद पवारांच्या नातवाचा प्रसिद्ध अभिनेत्री सोबतचा फोटो व्हायरल, उलटसुलट चर्चांना उधाण

बॉलिवूड आणि राजकारण यांचे नाते हे फार पूर्वीपासून चांगलेच आहे, असे म्हणावे लागेल. कारण की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे बॉलीवूड अतिशय घनिष्ठ संबंध होते व त्यांचे अनेक मित्र होते. अनेकांवर ते टीका करायचे.

मात्र त्यांना तेवढ्याच प्रेमाने देखील बोलायचे. बाळासाहेब ठाकरे आणि आणि दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचे फार जुने संबंध होते. या दोघांमध्ये मैत्री देखील होती. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकर यांचेही खूप चांगले संबंध होते. बाळासाहेब ठाकरे अमिताभ बच्चन यांना देखील खूप प्रेमाने बोलत.

तेच नाते पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कायम ठेवले. आता देखील नव्या पिढीतील राजकारण्यांचे अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत संबंध असल्याची चर्चा गेल्या काही वर्षापासून होत असतात. त्यामध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांचाही समावेश करावा लागेल. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे बॉलीवूड मधील अनेक कलाकारांची घरोब्याचे संबंध आहेत.

मात्र राज ठाकरे यांच्या बाबतीत काही वर्षांपूर्वी एक बातमी तुफान व्हायरल झालेली होती. ती बातमी म्हणजे राज यांचे मराठमोळ्या सोनाली बेंद्रेच्या सोबत प्रेम संबंध असल्याची चर्चा त्या काळात प्रचंड होती. मात्र, याबाबत कधीही खुलासा होऊ शकला नाही. मात्र याच्या चर्चा झाल्या. अलीकडच्या काळामध्ये युवा सेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव देखील दिशा पाटनी हिच्या सोबत जोडले गेले होते.

मात्र त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी याबाबत कधीही काही माहिती सांगितली नाही. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील याच कायमच चर्चेत असतात. आपल्या लाईफ स्टाईल साठी ते अनेकदा चर्चेत आलेले आहेत. मात्र, नंतर त्यांच्याबाबत काही अधिक माहिती समोर आली नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी गेल्या लोकसभेला निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता देखील याची खंत त्यांच्या मनात आहे. अलीकडच्या काळामध्ये ते फारसे सक्रिय नसले तरी येणार्‍या काही काळामध्ये आता राजकारणात सक्रिय होतील असे सांगण्यात येत आहे.

मात्र त्यांच्याकडे बोलण्यासाठी आवश्यक असलेली वक्तृत्व कला नाही, असे देखील अनेकांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांना आधी बोलण्याची सवय लावावी लागेल. त्यानंतर ते राज्याच्या राजकारणात सक्रिय होतील, असे दिसत आहे.

आता देखील एका अभिनेत्री सोबत अजित पवार यांचे दुसरे चिरंजीव जय पवार यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे एक चर्चा रंगली आहे. काही दिवसापूर्वी हा फोटो व्हायरल झाला होता. ज्या अभिनेत्रीसोबत जाय पवार यांचा फोटो व्हायरल झाला त्या अभिनेत्रीचे नाव उर्वशी रौतेला असे आहे.

उर्वशी रौतेला हिने बॉलिवुडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय असते. आपले अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या फोटोला देखील चाहते लाईक करत असतात. त्याचबरोबर ती इन्स्पेक्टर अविनाश या वेब सिरीज मध्ये लवकरच दिसणार आहे.

या आधी देखील तिने अनेक चित्रपट आणि मालिकेत काम केले आहे. जय पवार आणि उर्वशी रौतेला यांचा हा फोटो नेमका कधीचा आहे याबाबत खुलासा होऊ शकला नाही. मात्र, हा फोटो दुबई येथील एका कार्यक्रमातील असल्याचे सांगण्यात येते. या फोटोमध्ये उर्वशी रौतेला जय पवार आणि एक व्यक्ती दिसत आहे.

या फोटोवरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Team Beauty Of Maharashtra