शनिवारी करा हे उपाय , प्रत्येक कार्यात व्हाल यशस्वी, जाणून घ्या

हिंदु शास्त्रानुसार शनिवार हा दिवस भगवान शनिदेवांचा वार आहे. ह्या दिवशी ज्या व्यक्तीवर शनिदेव प्रसन्न असतात त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याच क्षेत्रात कोणतीही अडचणी येत नाहीत. आज ह्याच विषयाबद्दल जाणून घेऊया की ह्या दिवशी कोणते उपाय करावेत ज्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि आपल्या जीवनातील संकटे दूर होतील. तर जाणून घ्या काय आहेत ते उपाय
१) शनिवारी सकाळी घरातून बाहेर पडताना ओम प्रां प्रीं पौं सः शनैश्वराय नमः ह्या मंत्राचा जप करावा. ह्या मंत्राने शनिदेवाची कृपा आपल्यावर राहील आणि दिवसभरात आपण जी जी कामं कराल त्यात नक्कीच यशस्वी व्हाल.
२) शनिवारच्या दिवशी आपण कोणते वस्त्र परिधान करतो त्यावर सुद्धा आपला दिवस अवलंबून आहे. शनिवारच्या दिवशी आपण निळे वस्त्र परिधान करायला हवे. ह्यादिवशी निळे कपडे घातल्याने ते आपल्यासाठी शुभ आणि लाभकारी ठरते. ह्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न राहतात.
३) शनिवारच्या दिवशी आपण तीळ खाणे गरजेचे आहे. ह्यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात आणि जीवन सुखमय होते. त्यामुळे आपले मन प्रसन्न राहते व कामात मन रमते. त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला आर्थिकदृष्ट्याही मिळतो
४) शनिवारी आपण शनिदेवाची मनोभावे सेवा आणि पूजा करणे गरजेचे आहे. घरात शनिदेवाची प्रतिमा अथवा मूर्ती नसेल तर जवळच्या शनिदेव मंदिरात जावे. त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा मिळेल. शनिदेवाची पूजा करताना त्यांना निळे किंवा जांभळे फुल अर्पण करावे.
५) शनिदेव कलियुगाचे साक्षात भगवान आहेत असे मानले जाते त्यामुळे त्यांना प्रसन्न केल्यावर त्याची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते. त्यामुळे शनिवारी शनिदेवाची आराधना करणे गरजेचे आहे.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.