शनिदेवांच्या उदयानंतर पाच राशींच्या अडचणीत होणार वाढ, आतापासून हे उपाय करा सुरु

शनिदेवांच्या उदयानंतर पाच राशींच्या अडचणीत होणार वाढ, आतापासून हे उपाय करा सुरु

ज्योतिषशास्त्रात सर्वाधिक लक्ष हे शनिच्या स्थितीकडे असतं. कारण शनिदेवांचा प्रभाव इतर ग्रहांच्या तुलनेत सर्वाधिक आणि तातडीने अनुभवण्यास मिळतो. त्यामुळे शनि आपल्या राशीला आला की, चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा पापग्रह असला तरी ग्रहमंडळात न्यायदेवतेची भूमिका बजावतो. चांगली कर्म असणाऱ्यांना शनिदेव चांगली फळं, तर वाईट कर्म असणाऱ्यांना शनिदेव चांगलाच दणका देतात. आता 5 मार्चच्या रात्री शनिदेव कुंभ राशीत उदीत होणार आहेत. म्हणजेच सूर्यादेवांच्या कक्षेतून दूर जाणार असल्याने स्वताच्या शक्तीने प्रभावित होतील.

शनिदेव स्वताच्या कुंभ राशीत असल्याने अनेकांना दिलासा मिळाला. 17 जानेवरी 2023 रोजी शनि महाराजांनी कुंभ राशीत प्रवेश केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अस्ताला गेल्याने काही राशींना दिलासा मिळाला होता. आता पुन्हा शनिदेव आपल्या येणार असल्याने चार राशींना अडचणीचा काळ असणार आहे.

या राशींनी घ्यावी विशेष काळजी- ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा उदय झाला की चांगली फळं मिळतात. तसेच मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम टाकतात. मात्र शनिदेवांचं इतर ग्रहांपेक्षा वेगळी स्थिती असते. कारण न्यायदेवता असल्याने हिशेब बरोबर चुकता करतात. यावेळी मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरु आहे. आणि कर्क, वृश्चिक राशीला अडीचकी सुरु आहे. त्यामुळे या काळात पाच राशींनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

शनिच्या या स्थितीत काय फटका बसेल- शनिदेवांचा उदय झाल्यानंतर काही राशींना काळजी घेणं गरजेचं आहे. कारण अनेकदा आपण निर्णय घेतो खरं पण त्यात अपेक्षित यश मिळत नाही. या काळात जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. त्याचबरोबर कोणालाही पैसे देताना शंभर वेळा विचार करा. अन्यथा पैसे बुडू शकतात. तसेच कामाच्या ठिकाणी हवी तशी साथ मिळणार नाही. हातात घेतलेली कामं अडकून जातील. तसेच या काळात गुंतवणूक विचारपूर्वक करा. कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता देखील आहे.

काय उपाय कराल- शनि साडेसाती आणि अडीचकीच्या काळात मारुतीरायाची उपासना कराल. यामुळे निश्चितच दिलासा मिळेल. मारुतीरायाची उपासना करणाऱ्यांवर शनिदेव अवकृपा करत नाहीत. या काळात हनुमान चालिसा आणि नामस्मरणावर जोर द्या. शनिवारी शनिदेवांची विधीपूर्वक पुजन करा. यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद मिळेल. सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाखाली तीळाचा दिवा लावा. तसेच दूध अर्पण करा. तसेच शनिस्तोत्राचं पठण करा. शनिवारी कावळ्यांना अन्न खाण्यास द्या. तसेच गरजवतांना आपल्या कुवतीनुसार शनिच्या संबंधित वस्तूंचं दान करा.

Team BM