शनिदेवांच्या त्रासातून दिलासा मिळवण्यासाठी 18 मार्च हा दिवस खास, अद्भुत संयोगात करा हे उपाय

शनिदेवांच्या त्रासातून दिलासा मिळवण्यासाठी 18 मार्च हा दिवस खास, अद्भुत संयोगात करा हे उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या वेळेनुसार राशीबदल करत असतो. या दरम्यान काही ग्रह अस्त किंवा उदीत होतात. त्याप्रमाणे त्या ग्रहांचं फळ मिळतं. शनिदेव सध्या स्वराशीत असून उदीत झाल्यानंतर 18 मार्चपासून पूर्ण शक्तिसह कार्यरत होणार आहेत. त्यामुळे जातकांना हा दिवस खास असणार आहे. सध्या साडेसाती आणि अडीचकी सुरु असलेले जातक या दिवशी खास उपाय करून शनिदेवांच्या त्रासातून दिलास मिळवू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरु आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशी अडीचकीच्या फेऱ्यात आहेत.

18 मार्च 2023 हा दिवस खास असणार आहे, कारण फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला श्रवण नक्षत्र आहे. या नक्षत्राचे स्वामी स्वत: शनिदेव आहेत. त्याचबरोबर या दिवशी शिवयोग आहे. त्यामुळे शनिदेवांची पूजा करण्यासाठी उत्तम दिवस आहे.

शनिवारी एकादशी आल्याने भगवान विष्णुंची पूजा करण्याचा योग जुळून आला आहे. शनिदेव भगवान विष्णुंच्या कृष्णाचे उपासक आहेत. त्यामुळे या दिवशी शनिदेवांसह भगवान विष्णुंची पूजा केल्यास शनि त्रासातून दिलासा मिळू शकतो.

शनिदेवांना प्रसन्न करण्याचे उपाय
सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करा.पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करून दिवा लावा. पिंपळाच्या वृक्षाचं पूजन केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होतात. ओम शं शनैश्चराय नम: या मंत्राचा जप करा. शनिवारी शनि चालीसा आणि शनि स्तोत्राचं पठण करा.

चार राशींना या योगाचा विशेष लाभ
मकर : शनिदेवांना तेज प्राप्त होणार असल्याने या राशीच्या जातकांना फायदा होईल. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. मानसिक तणावातून या काळात सुटका होईल. केलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळेल. तुमचं काम लोखंड, पेट्रोलियम पदार्थांशी निगडीत असेल तर तुम्हाला त्यातून फायदा होईल. त्यामुळे पुढचे तीन महिने तुमच्यासाठी खास असतील.

कुंभ : या राशीतच शनिदेव आपलं तेज प्राप्त करणार आहेत. गोचर कुंडलीत शश महापुरुष राजयोग तयार होत आहे. त्यामुळे समाजात मान सन्मान मिळेल. वैवाहिक जीवनातही आनंद प्राप्त होईल. कमिशन आणि कन्सल्टंसीचं काम करणाऱ्या या काळात चांगला आर्थिक लाभ होईल.

वृषभ : शनिदेव या राशीच्या गोचर कुंडलीत शश आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहे. यामुळे वडिलांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या जातकांना या काळात पदोन्नतीचा योग आहे. पगारात मनासारखी वाढ दिसून येईल. विदेशात कामानिमित्त जाण्याचा योग जुळून येईल.

तूळ : या राशीची नुकतीच अडीचकीतून सुटका झाली आहे. गोचर कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. अध्यात्म, विचारक, रिसर्च, डॉक्टर, शास्त्रज्ञ असलेल्या जातकांना हा काळ चांगला जाईल. लॉटरी किंवा शेअर बाजारातून अचानक धनलाभ होऊ शकतो.

Team BM