शनीदेव होणार वक्री, केंद्र त्रिकोण राजयोग बनल्याने ‘या’ राशींना प्रचंड श्रीमंती? १७ जूनपर्यंत लक्ष्मी देऊ शकते धनलाभ

शनीदेव होणार वक्री, केंद्र त्रिकोण राजयोग बनल्याने ‘या’ राशींना प्रचंड श्रीमंती? १७ जूनपर्यंत लक्ष्मी देऊ शकते धनलाभ

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा वेळोवेळी गोचर करत असतो. काही ग्रहांचा मूळ वेग कमी असल्याने त्यांच्या गोचरास कित्येक वर्ष लागू शकतात. असाच कमी वेगाने चाल करणारा ग्रह म्हणजे शनिदेव. वैदिक ज्योतिषअभ्यासकांच्या माहितीनुसार शनिदेव हे कलियुगातील न्यायाधिकारी व कर्मदेव म्हणून ओळखले जातात. यामुळेच शनीच्या प्रभावाला विशेष महत्त्व आहे.

२०२३ च्या सुरुवातीला शनिदेव तब्बल ३० वर्षांनी स्वराशीत स्थिर झाले आहेत. तर आता तब्बल सहा महिन्यांनी शनिदेव वक्रस्थितीत येणार आहेत. यामुळे शनीचा केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. या राज्योगाच्या प्रभावाने काही राशींच्या नशिबाचे दार उघडण्याची चिन्हे आहेत. १७ जून २०२३ ला शनिदेव वक्री होणार आहेत. तत्पूर्वी याचा प्रभाव कोणत्या राशीवर कसा होईल हे पाहूया…

शनी वक्रीने केंद्र त्रिकोण राजयोग बनताच, ‘या’ राशी होतील श्रीमंत?
सिंह रास- शनीदेव वक्री होताच सिंह राशीत सप्तम स्थानी केंद्र व शश राजयोग तयार होत आहे. तुमच्या राशीच्या सहाव्या स्थानाचे स्वामी शनीदेव आहेत. येत्या काळात तुम्हाला कोर्टाच्या खटल्यांमध्ये यश लाभण्याची शक्यता आहे. याकाळात अर्थांजनाचे विविध स्रोत व मार्ग तुमच्यासाठी उघडे होऊ शकतात. तुम्हाला स्वतःच्या व्यक्तिमत्वात साहसी व पराक्रमी गुण गवसण्याचा हा काळ ठरू शकतो. व्यवसाय वृद्धीचे संकेत आहेत. तुम्हाला प्रवासाची संधी मिळू शकते. असे काही अनोळखी चेहरे समोर येऊ शकतात ज्यांच्याशी दीर्घकाळ संबंध टिकून राहू शकतात. तुमच्यामुळे तुमच्या पार्टनरला सुद्धा प्रगती अनुभवता येऊ शकते.

वृषभ रास- शनीदेवांच्या उलट वक्रीस्थितीमुळे वृषभ राशीसाठी लाभदायक काळ सुरु होण्याची शक्यता आहे. शनीदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत कर्मस्थानी केंद्र त्रिकोण योग तयार होत आहे. १७ जून पासून तुम्हाला अर्थाजनाचे नवे मार्ग मोकळे होऊ शकतात. तुम्हाला प्रॉपर्टी खरेदीची संधी मिळू शकते. यावेळी शेअर बाजारात गुंतवणुकीची संधी आहे. नोकरदार मंडळींना पदोन्नती व पगारवाढीचा योग आहे. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी तुमच्या खांद्यावर टाकली जाऊ शकते. समाजात तुमचा मान- सन्मान वाढीस लागू शकतो.

मिथुन रास- शनीदेव मिथुन राशीत नवव्या स्थानी केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहे. याकाळात आपल्याला नशिबाची भक्कम साथ लाभू शकते. याकाळात तुम्हाला परदेशवारीच्या संधी मिळू शकतात. हे प्रवास तुम्हाला नवे संपर्क बनवण्यासाठी फायदा होऊ शकतो. शनीदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत आठव्या स्थानीचे स्वामी आहेत. अभ्यासक मंडळींना या काळात लाभ होऊ शकतो. वडिलांसह तुमचे नाते सुधारण्यास मदत होऊ शकते. बेरोजगारांना नोकरीच्या नव्या संधी चालून येऊ शकतात.

Team BM