शनीच्या केंद्र त्रिकोण राजयोगात लक्ष्मीचे बळ वाढून ‘या’ राशी होतील मालामाल? सहा महिने प्रचंड पैसा कमावू शकता

शनीच्या केंद्र त्रिकोण राजयोगात लक्ष्मीचे बळ वाढून ‘या’ राशी होतील मालामाल? सहा महिने प्रचंड पैसा कमावू शकता

ज्योतिष शास्त्रानुसार शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनीचे एक गोचर किमान अडीच वर्षांनी पूर्ण होते. यंदा १७ जानेवारीला ३० वर्षांनी कुंभ राशीमध्ये शनीने प्रवेश घेतला आहे. तर आता तब्बल सहा महिन्यांनी म्हणजे १७ जून ला कुंभ राशीतच शनिदेव वक्री होणार आहेत. या अवस्थेत शनिदेव ४ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहेत. या कालावधीत शनीदेव केंद्र त्रिकोण राजयोग तयार करणार आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, जेव्हा कुंडलीमध्ये ३, ४, ७, १० व १, ५, ९ मध्ये त्रिकोण स्थानी शनिदेव सक्रिय होतात तेव्हा केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत असल्याचे मानले जाते.

केंद्र त्रिकोणात माता लक्ष्मी ही त्रिकोण देवी व भगवान विष्णू हे केंद्रीय देवता मानले जातात यामुळेच ज्या व्यक्तीच्या कुंडलीत असा राजयोग तयार होतो, त्याचे भाग्य रातोरात उजळण्याची शक्यता असते. येत्या महिन्याभरात या केंद्र त्रिकोण राजयोगाने नक्की कोणत्या राशीला धनलाभ होण्याची संधी आहे हे पाहूया…

शनीदेव ‘या’ राशींना बनवणार का करोडपती?
वृषभ रास (Taurus Zodiac)
ज्योतिष शास्त्रानुसार शनी कुंभ राशीत वक्री होताच नोकरीमध्ये सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे, या काळात आपल्याला उत्तम नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच सुख समृद्धी, व राजेशाही थाट अनुभवता येऊ शकतो. या महिन्याभरात आपलायला गुंतवणुकीबवर भर देण्याची गरज आहे. ऑफिसमध्ये तुमच्या खांद्यावर एक नवी जबाबदारी टाकली जाऊ शकते. मिळकतीत वाढ होण्याची संधी आहे.

मिथुन रास (Gemini Zodiac)
शनीचा कुंभ राशीत वक्री मार्ग हा मिथुन राशीला भाग्योदयाचा काळ अनुभवण्याची संधी देऊ शकतो. आपल्या कुंडलीत नवव्या स्थानी केंद्र त्रिकोण राजयोग तयात होत आहे. यामुळे आपल्याला नशिबाची साथ मिळू शकते. आपल्या कुंडलीत लांबच्या प्रवाशाची चिन्हे दिसत आहेत. भविष्यामध्ये फायदेशीर यथारतील असे काही निर्णय आपल्याला या काळात घ्यावे लागू शकतात. तुम्हाला एखाद्या नव्या विषयाचा अभ्यास करावा लागू शकतो.

सिंह रास (Leo Zodiac)
ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीला शनी वक्री अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तुम्ही सातत्याने घेतलेल्या कष्टाचे गोड फळ आपल्याला या काळात मिळू शकते. आपल्या कुंडलीत सहाव्या स्थानी शनीचे स्वामित्व आहे. येत्या काळात तुम्ही शक्य तितकी बचत करणाऱ्यावर भर द्यायला हवा. प्रदीर्घ काळ त्रास देणाऱ्या आजारातून सुटका मिळू शकते. नोकरदार मंडळींना पगारवाढीचे संकेत आहेत.

Team BM