शनिदेव उदय होताच बनला ‘शश राजयोग’; ‘या’ राशींना मिळू शकतो गडगंज पैसा, भाग्यही उजळणार?

शनिदेव उदय होताच बनला ‘शश राजयोग’; ‘या’ राशींना मिळू शकतो गडगंज पैसा, भाग्यही उजळणार?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा विशिष्ट अंतराने उदय होतो आणि ते अनेक शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर पडतो. अशातच आता शनिदेवाचा ९ मार्च रोजी उदय झाला आहे. त्यामुळे शश महापुरुष राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. परंतु यातील ३ राशी अशा आहेत, ज्यांना या राजयोगामुळे अचानक धनलाभ आणि भाग्याचा योग बनणार आहे. तर त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

कुंभ राशी –शनिदेवाचा उदय तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. कारण यावेळी तुमच्या गोचर कुंडलीच्या लग्न स्थानी शश नावाचा राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता आणि शिवाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचीही शक्यता आहे. तसेच तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होऊ शकते. शिवाय शश योगाची नजर तुमच्या जीवनसाथी आणि भागीदारीच्या स्थानावर आहे. त्यामुळे जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते. नवीन व्यवसायात भागीदारी होण्याची शक्यता आहे.

सिंह राशी – शनिदेवाचा उदय तुमच्यासाठी आनंददायी आणि लाभदायक ठरू शकतो. कारण तुमच्या राशीच्या सातव्या स्थानी शश राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या काळात सर्वांशी तुमचे नाते घट्ट होऊ शकते ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील यशाचा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात जे अविवाहित आहेत त्यांना लग्नासाठी स्थळ येऊ शकतात. शिवाय तुमच्या करिअरमध्ये यश आणि करिअरमध्ये उत्कृष्ट संधी मिळू शकतात. दुसरीकडे, जे व्यावसायिक आहेत त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.

मिथुन राशी- मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा उदय चांगला ठरू शकतो. कारण मिथून राशीच्या नवव्या स्थानी शश राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तसेच, या काळात तुम्हाला लांबचा प्रवास घडू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर धार्मिक कार्यात तुमची आवड वाढू शकते. या काळात तुम्हाला उत्पन्नाचे इतर स्त्रोतदेखील मिळू शकतात. तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता.

Team BM