‘शब्द ना शब्द’ खरा ठरला, लता दीदींनी राणू मंडलद्दल केलेलं भाकीत

‘शब्द ना शब्द’ खरा ठरला, लता दीदींनी राणू मंडलद्दल केलेलं भाकीत

काही वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर “एक प्यार का नगमा है” हे गीत गाऊन रातोरात स्टार बनलेल्या रानु मंडल हिच्या बाबतीत नियतीने पुन्हा खेळच केला आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. रेल्वे स्टेशनवर गाणी म्हणता म्हणता तिचा हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की, बॉलीवूडपर्यंत जाऊन देखील पोहोचला.

हिमेश रेशमिया याने राणू मंडल हिला ब्रेक दिला आणि आपल्या चित्रपटातील गाणे देखील गाऊन घेतले. मात्र, त्यानंतर तिला एवढी मस्ती आली की ती कुणाला देखील काहीही बोलू लागली आणि नंतर तिचा आवाज हा आवाजच राहिला. कारण ओरिजनल ते ओरिजिनल असतं. एखाद्या वेळेस असं आपलं गीत होत असतं.

मात्र, राणु मंडल Ranu Mondal आता पुन्हा जिथे होती तिथेच जाऊन पोहोचली आहे. तिला काही पैसे हिमेश रेशमिया याच्याकडून मिळाले. मात्र, ते पैसे आल्यानंतर ती तिचा जसा स्वभाव आहे, त्याप्रमाणेच राहू लागली. आता ती पुन्हा एकदा रस्त्यावर आली असून रस्त्यावरचे जीवन जगत आहे. त्यावेळेस लता मंगेशकर यांनी देखील एक मुलाखत दिली होती आणि लता मंगेशकर यांनी देखील राणू मंडल हिला मोलाचा सल्ला दिला होता. मात्र, तिने तो सल्ला ऐकला नाही.

भारताची गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजामधील ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं लोकप्रिय असं गाणं आहे, हे गाणं गाऊनच लोकप्रिय ठरलेल्या राणू मंडल हीच सर्व स्तरातून कौतुक मोठ्या प्रमाणात त्यावेळेस होते. त्यावेळेस लता मंगेशकर यांनी देखील तिला मोलाचा सल्ला दिला होता. सध्याची स्थिती पाहता लता मंगेशकर यांचे म्हणणं आता खरं होताना दिसत आहे.

कारण राणू ही पुन्हा एकदा रस्त्यावर आली आहे. लता मंगेशकर यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की, नक्कल ही फार काळ टिकत नसते, त्यावेळेस लता मंगेशकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, माझं नाव आणि माझ्या कामामुळे कुणाचं भलं होत असेल तर मी स्वतःला भाग्यवान समजते.

पण मला वाटते की कुणाचं अनुकरण करून मिळवलेले यश हे फार काळ टिकत नाही, असे लता मंगेशकर यांनी सांगितले होते. लता मंगेशकर यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली होती. त्यानंतर लता मंगेशकर यांनी म्हटले होते की, मी केवळ सुनिधी चव्हाण, श्रेया घोषाल यांनाच ओळखते. बाकी कोण नवीन गायक मला काही माहित नसते.

त्या म्हटल्या होत्या, त्याचप्रमाणे आपलं ओरिजनल ओरिजनल राहू द्या, असा सल्ला देखील त्यांनी दिला होता. मात्र रानु मंडल हिच्या बाबतीत केलेले भविष्य आता खरे ठरताना दिसत आहे. कारण राणू मंडल आता पुन्हा एकदा रस्त्यावर आली आहे.

Team Beauty Of Maharashtra