‘सारेगमप’ सेटवर राडा ! लघाटे, तू असा का आहेस अरे ?, आर्या आंबेकर का चिडली ?

‘सारेगमप’ सेटवर राडा ! लघाटे, तू असा का आहेस अरे ?, आर्या आंबेकर का चिडली ?

अनेकदा सेटवर शूटिंग मध्ये असं काही घडतं की, कलाकारांना राग अनावर होतो आणि मग त्याचे ते सोशल मीडियावर व्यक्त होतात. असंच काहीसं घडलंय गायिका आर्या आंबेकर हिच्यासोबत. याबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. आर्या आंबेकर हे नाव मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आता चांगलच रुळल आहे.

आर्या आंबेकर हिने अगदी लहान वयातच सारेगमप लिटल कॅम्पमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. आता ती याच शोमध्ये जज म्हणून वावरताना दिसत आहे. ती‌ ज्या वेळेस सारेगमप शो करत होती, त्यावेळेस तिचे वय अतिशय लहान होते.

मात्र, असे असले तरी तिने आपल्या गाण्याने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले. आर्या आंबेकर सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडिया वर ती आपले फोटो नेहमीच शेअर करत असते. तिच्या फोटाेला तिचे चाहते लाईक आणि शेअर देखील करत असतात.

त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना देखील उत्तर देत असते. सध्या सुरू असलेल्या सा रे ग म प लिटल चॅम्प मध्ये आर्या आंबेकर सोबत तिचा लहानपणापासूनचा मित्र प्रथमेश लघाटे हा देखील सहभागी झाला आहे. याचप्रमाणे रोहित राऊत हा देखील या शोमध्ये सहभाग झाला आहे या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना हे सगळे मार्गदर्शन देखील करतात.

हे सर्व जण लहानपणापासून मित्र असल्यामुळे खूप दंगा-मस्ती करत असतात. काही दिवसांपूर्वीच आर्या आंबेकर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती गुलाबी रंगाचा ड्रेसवर दिसत आहे. तिच्या मागे हात वर करून प्रथमेश लघाटे हा देखील दिसत आहे. ही व्हिडिओ देखील समोर आला आहे.

यामध्ये आर्या आंबेकर हिला गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो काढायचा होता. तिने अनेक फोटो काढले. जो चांगला फोटो आला होता या फोटोच्या मागे प्रथमेश लघाटे हा उभा राहिला. त्यामुळे आंबेकरने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यावर कॅप्शन देखील लिहिले आहे.

मला गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो काढायचे होते एकच हा फोटो चांगला आला मात्र, प्रथमेश याने फोटोची घाण केली, असे ती म्हणाली. गुलाबी रंगाच्या ड्रेस मधला माझा एकच चांगला फोटो. पण या व्यक्तीने तो खराब केला आहे. लघाटे तू असं का आहेस रे असे म्हणून सॅड स्माईली शेअर केली आहे.

आर्याने यावरून नाराजी व्यक्त केली आहे. ती खरी नसून मस्करी केली आहे. आर्या, मुग्धा, प्रथमेश, कार्तिकी सारेगमपच्या सेटवर फोटो शूट करतात आणि कायम मस्ती करतात. यामुळे या सेटवर खूपच खेळीमेळीचे वातावरण असते. अगदी लहानपणापासून मित्र असल्यामुळे त्यांची ही मैत्री या सेटवर अधिक खुलते आहे हे मात्र नक्की आहे.

आर्याने फक्त आपल्या गायकीने हेच नाही तर अभिनयाने देखील चहात्यांची मने जिंकली आहेत. सोबतच आर्या तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. ती तिचे स्टायलिश लुक कायमच शेअर करत असते.

Team Beauty Of Maharashtra