साप्ताहिक भविष्य : या राशीला येत्या आठवड्यात मिळेल योग्य जोडीदार !

साप्ताहिक भविष्य : या राशीला येत्या आठवड्यात मिळेल योग्य जोडीदार !

या सप्ताहात होणाऱ्या महत्वाच्या घटना म्हणजे शनि महाराज मकर राशीत मार्गी अवस्थेत आहेत. तसेच मेष राशीत राहू भ्रमण सुरू असून धनु राशीत बुध शुक्र रवि त्रिग्रही राज योग आहे .केतू तुला राशीत भ्रमण करीत आहे. मीन राशीमध्ये गुरू स्थित असून मंगळ वृषभ राशीत असेल . चंद्र पूर्वार्धात तुला राशीत प्रवेश करेल. वरील ग्रह स्थिती नुसार पाहूया या आठवड्याचे भविष्य.(लग्ना नुसार).

मेष- राशीतील राहू तुम्हाला भ्रमित करण्यास तयार आहे .आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्ती कडे लक्ष ठेवा .कुठलेही गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. अहंकार आणि मनावरील ताण प्रकृतीला हानिकारक ठरेल. मात्र गुरू मनाचा धार्मिक गोष्टीकडे कल ठेवेल. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात यश देईल. कार्यक्षेत्रात होणाऱ्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. आर्थिक व्यय होईल .भाग्य स्थानात शुक्र आहे .शुभ घटना,धार्मिक स्थळांचे प्रवास घडतील. एकूण सप्ताह आनंदी आहे.

वृषभ- राशीतील मंगळ स्वभावात एक प्रकारचा अधिकार आणेल. व्यक्तिमत्व तेजस्वी होईल. व्यय राहू खर्चामध्ये वाढ करील. काही कारणास्तव दवाखान्याची पायरी चढावी लागेल. लाभातील गुरू संततीसाठी शुभ असून नव विवाहिता आनंदाची बातमी देतील. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. मात्र गैरसमजातून वाद टाळा. मन धार्मिक गोष्टीमध्ये गुंतवा. एखाद्या समारंभात भाग घ्याल. कार्यक्षेत्रात होणाऱ्या महत्वाच्या घटना फायद्याच्या ठरतील. सप्ताह अनुकूल.

मिथुन- राशीच्या सप्तम स्थानात असलेले सूर्य बुध शुक्र व्यावसायिक दृष्ट्या शुभ आहेत . प्रवास घडेल .व्यय स्थानात मंगळ आहे कायदा पाळा. कार्यक्षेत्र गुरूच्या शुभ प्रभावात आहे. नवीन संधी मिळतील. वक्री शनि आता मार्गी अष्टम स्थनाकडे आहे . सावध राहण्याचा काळ आहे. मन शांत ठेवा . छोट्या मोठ्या गोष्टीनी विचलित होऊ नका. संतती चिंता निर्माण होईल.सप्ताह मध्यम फळ देईल .

कर्क- राशीस्वामी चंद्राचे चतुर्थ स्थानातून भ्रमण आरोग्याच्या तक्रारी निर्माण करेल. लाभाचे नवीन मार्ग मिळतील. मित्र मैत्रिणी सोबत वेळ घालवाल.कार्यक्षेत्रात राहू नवीन संधी देईल.मात्र सहजपणे कोणतेही काम होणार नाही. शनीची तीव्रता थोडी कमी होईल.घर आणि व्यवसाय यात बदल होऊ शकतो. संधी कडे दुर्लक्ष नको. उत्तम गुरु बळ तुम्हाला सर्व कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल सप्ताह शुभ.

सिंह- राशीस्वामी रवि पंचमी स्थानात आहे.काम आणि व्यवसाय बाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे.गुरू बल नसल्याने सांभाळून निर्णय घ्या. भाग्यातील राहू धार्मिक स्थानाचे प्रवास घडवील.दशम मंगळ सावधगिरीचा इशारा देत आहे. चंद्र शुभ प्रभाव देईल . आर्थिक लाभ होतील. एकूण सप्ताहाचे बल उत्तम आहे.

कन्या- राशीस्वामी बुध चतुर्थ स्थानात असून व्यवसाय वृद्धी,प्रवास ,घर यात शुभ फळ देईल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. आर्थिक आणि सामाजिक प्रभाव वाढेल. अष्टम स्थानातील राहू काही प्रकृतीचे त्रास दाखवीत आहे .कंबर आणि स्नायूमध्ये दुखापत असेल तर काळजी घ्या. स्त्रियांनी वेळीच काळजी घेतल्यास त्याचा फायदा होईल वैवाहिक जीवन सुखी राहील .खर्चावर नियंत्रण ठेवा. सप्ताह बरा जाईल.

तुला- राशीस्वामी शुक्र तृतीय स्थानात येणार आहे. अष्टम मंगळ आहे ,प्रवास होतील. जोडीदाराशी गैरसमजातून वाद होतील. रवि बुध पोटाचे किंवा पायाचे त्रास निर्माण करतील . प्रकृती जपा शत्रुत्व होऊ देऊ नका मात्र नोकरी व व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील. नातेवाईक भेट संभवते.राशीतील केतू अध्यात्मिक बाजू कडे कल ठेवेल. एकूण सप्ताहात मिश्र फळ मिळेल .

वृश्चिक- राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानात आहे . वैवाहिक जीवन हा या आठवड्याचा केंद्र बिंदू राहील.जोडीदार साठी वेळ द्या. तृतीय स्थानात शनि घरात सुखद वातावरण निर्माण करेल .आई वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या.नोकरीच्या ठिकाणी जपून रहा. जोडीदाराला अधिकार प्राप्तीचे योग येतील.सप्ताहात चंद्र भ्रमण अनुकूल आहे.

धनु- राशी स्वामी गुरू चतुर्थ स्थानात आहेत.मंगळ षष्ठात आहे स्वभावात तेज येईल.घरामध्ये काही दुरुस्ती,सुधारणा करण्यास योग्य काळ.नवीन वास्तु योग येतील.वाहन जपून चालवा .आईवडील आनंदी राहतील. संतती काहीशी खर्चिक आणि चैनी बनेल.सामाजिक क्षेत्रात प्रभाव राहिलं.भावंडांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे.काळजी घ्या.सप्ताह मध्यम आहे.

मकर- राशी स्वामी शनी आता मार्गी आहे. आर्थिक बाबतीत जपून रहा.शेअर मार्केट किंवा अनपेक्षित ठिकाणीं धनप्राप्ती होऊ शकते. मात्र व्यवहार जपून करा.भावंडं भेट होईल.संततीसुख भरपूर मिळेल. प्रवास योग येतील . विश्वास ठेवून कार्य क्षेत्रात यश मिळवाल. सप्ताहाचा पूर्वार्ध काही कटकटीचा असेल. उत्तरार्ध मात्र शुभ फल देईल.

कुंभ- मार्गी शनि काहीशी नकारात्मक परिस्थिती करेल. खर्चात वाढ होईल.शनि उपासना करणे गरजेचे आहे.साडेसाती सुरू झाली आहे. कुटुंबात गैरसमज निर्माण होतील.अष्टम सूर्य बुध धार्मिक स्थानाचे प्रवास घडवतील. प्रकृती जपा. आई वडील तुमच्यावर नाराज राहतील. बहिण भावंडं भेट होईल.त्यांच्यासाठी खर्च कराल.सप्ताह एकूण मिश्र फळ देईल.

मीन- राशीस्वामी गुरू राशीत आहे.सात्विक आणि अध्यात्मिक काळ आहे .काही काळ मंगळ वृषभ राशीत असल्याने स्वभाव तेज होईल. लौकर राग येईल. आर्थिक घडामोडी होतील.प्रवास योग,बंधू भेट संभवते. केतू काही कमरेचे स्नायूंचे विकार निर्माण करेल.जपून रहा.अती दगदग टाळा.सप्ताह मध्यम आहे.

Team BM