साप्ताहिक राशीभविष्य २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२१ : सप्टेंबरचा शेवटचा आठवडा या राशीसाठी ठरेल भाग्यकारक

साप्ताहिक राशीभविष्य २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२१ : सप्टेंबरचा शेवटचा आठवडा या राशीसाठी ठरेल भाग्यकारक

ग्रहांच्या परिवर्तनात राशींवर होणारा प्रभाव लाभ, नुकसान, चढउतार दर्शवते. सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशींसाठी कसा ठरेल, कोणती राशी यश संपादन करेल, कोणासाठी भाग्यकारक आठवडा असेल, कोणत्या राशीसाठी अडथळ्याचा आठवडा असेल, कोणती राशी प्रगती पथावर राहील हे सर्व जाणून घेण्यासाठी वाचा प्रसिद्ध ज्योतिषी पुरुषोत्तम शुक्ल यांच्याकडून या आठवड्याचं राशीभविष्य….

मेष – अपेक्षित गोष्टी साध्य- ग्रहमान पाहता या आठवड्यात आपल्या मनातील अपेक्षित गोष्टी साध्य होण्याचा काळ राहील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. प्रवासाचे योग येतील. व्यावसायिक विस्ताराची योजना पूर्ण कराल. प्रगतीचा मार्ग सुकर होईल. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. कुटुंबात वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याची दक्षता घ्या. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. कुटुंबियांसमवेत प्रवासाचे योग येतील. स्थावरबाबतचे प्रश्न सुटतील. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, पाठदुखीचा त्रास संभवतो. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

वृषभ – स्वकर्तृत्वाची जोड द्या- एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात स्वकर्तृत्वाची जोड दिल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होतील. नोकरदारांना दिलासा मिळेल. संगणक, तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना हा काळ उत्तम राहील. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. लेखकवर्गाला उत्तम दिवस आहेत. रागावर योग्य नियंत्रण ठेवा. स्थावरबाबतचे प्रश्न सुटतील. जमीन विकणे-घेणे अशा व्यवहारात लाभ संभवतो. नोकरीत बदलीची शक्यता संभवते. प्रवासाचे योग येतील. सौंदर्यप्रसाधने व्यवसायात प्रगती कराल. प्रवासात सावधानता बाळगा. प्रकृतीची पथ्ये पाळा, पोटाच्या तक्रारी सांभाळा. जोडीदाराची साथ मिळेल.

मिथुन – भाग्यकारक आठवडा- ग्रहमानाची साथ मिळाल्याने या आठवड्यात भाग्यकारक गोष्टी घडण्याची शक्यता राहील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. घरगुती वातावरण वादविवादाने बिघडणार नाहीत याची दक्षता घ्या. सरकारी नियमांचे पालन करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. प्रवासाचे योग येतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. अनावश्यक खर्च टाळा. रागावर योग्य नियंत्रण ठेवा. एखाद्या व्यक्तीला आकर्षित कराल. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, जलजन्य विकारांपासून सावध राहा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

कर्क – प्रगती कराल- एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात विविध क्षेत्रांत प्रगती करण्याचा मानस राहील. नोकरदारांना दिलासा मिळेल. गुंतवलेल्या गोष्टींतून चांगला परतावा मिळेल. स्थावरबाबतचे प्रश्न सुटतील. वाहन खरेदीचे योग संभवतात. प्रवासाचे योग येतील. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. येणाऱ्या प्रसंगासाठी मन खंबीर ठेवा. वाहनांच्या वेगावर निय़ंत्रण ठेवा. अपघातापासून सावध राहा. नात्यांमध्ये तुमचे वर्चस्व राहील. खरेदीचे बेत आखाल. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, मोसमी आजारांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

सिंह – कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य- ग्रहमान पाहता या आठवड्यात कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास खरे समाधान मिळेल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. आत्मविश्वासाने येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जा. खर्चावर नियंत्रण ठेवा. कमी बोला, कृतीवर भर द्या. प्रवासाचे योग येतील. अविवाहितांना दिलासा मिळेल. कामाचा व्याप वाढण्याची शक्यता राहील. आवडत्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. जोडीदाराला खूश ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीची व खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

कन्या – इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील- एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात आपल्या इच्छा-आकांक्षांची पूर्तता होण्याचे योग संभवतात. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घ्यावे. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. स्थावरबाबतचे प्रश्न सुटू लागतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवासाचे योग येतील. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. विरोधकांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या शिक्षणाबाबत. दाम्पत्य जीवन चांगले ठेवा. ज्येष्ठांची काळजी घ्या. प्रकृतीची पथ्ये पाळा, खाणेपिणे सांभाळा, दातासंबंधी तक्रारी संभवतात. जोडीदाराची साथ मिळेल.

तूळ – कामकाजात व्यस्त- एकूण ग्रहमान पाहता हा आठवडा सर्व दृष्टीने कामकाजात व्यस्त राहणारा आहे. नोकरदारांना दिलासा मिळेल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या प्रश्नांकडे. हितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवा, त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. मशिनरी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या व्यवहारात लाभ संभवतो. उत्तरार्धात खास मित्रांची जवळीक वाढेल. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. प्रवास कराल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. उजवा डोळा व कानाच्या दुखण्यापासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

वृश्चिक – व्यवसाय़ात यश- ग्रहमान पाहता या आठवड्यात व्यवसाय क्षेत्रात प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. आर्थिक आवक उत्तम राहील. महत्त्वाची कामे पूर्वार्धात उरकण्याचा प्रयत्न करा. स्थावरबाबतीतील योग संभवतो. विवाहितांचे संबंध सामान्य राहतील. प्रवासाचे योग येतील. आपल्या रागावर योग्य नियंत्रण ठेवा. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. नोकरीत बदल संभवतो. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, जेवणात द्रव पदार्थांना प्राधान्य द्या. जोडीदाराशी जुळवून घ्या.

धनू – सहकार्याने कामे होतील- एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात सर्व बाजूंच्या सहकार्याने कामे पार पाडता येतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. घरासाठी एखादी वस्तू खरेदी कराल. प्रवासाचे योग येतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. एखाद्या समारंभाचे आयोजन संभवते. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. मुलांचे प्रश्न सोडवा. राजकीय क्षेत्रातील मंडळींना हा काळ छान राहील. प्रकृती जपा. पित्त, उष्णताजन्य समस्यांना सामोरे जावे लागेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

मकर – घराकडे लक्ष द्या- ग्रहमान पाहता या आठवड्यात घरातील प्रश्नांकडे लक्ष देऊन ते सोडविण्याचा प्रयत्न केल्यास उत्तम होईल. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. कोणत्याही प्रकारचे चुकीचे व बेकायदेशीर कामे करू नयेत. प्रवासाचे योग येतील. कुटुंबियांसमवेत बाहेर जाण्याचा बेत आखाल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या शिक्षणासंबंधात. वृद्ध मंडळींची काळजी घ्या. प्रकृतीकडे लक्ष द्या, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, स्नायूदुखीचा त्रास संभवतो. जोडीदाराची साथ मिळेल.

कुंभ – उत्तम राशी- ग्रहमान पाहता या आठवड्यात आपली रास उत्तम रास म्हणून गणली जाते. नोकरदारांना दिलासा मिळेल. प्रवासाचे योग येतील, पण सावधानता बाळगा. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. आपण योग्य निर्णय घेऊन प्रसंगातून मार्ग काढाल. विरोधकांच्या कारवायांवर नजर ठेवा, त्यांना संधी देऊ नका. आपल्या नावलौकिकात भर पडेल. सरकारी नियमांचे पालन करा. प्रकृतीची व खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. पाठदुखी, डोकेदुखीचा त्रास संभवतो. जोडीदाराची साथ मिळेल.

मीन – अडथळ्यांचा आठवडा- एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात विविध अडथळ्यांना आपणास सामोरे जावे लागणार आहे. नोकरदारांना दिलासा मिळेल. संगणक, तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ उत्तम राहील. मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. स्थावरबाबतचे प्रश्न सोडविता येतील. धार्मिक कार्यात सहभागी होता येईल. प्रकृतीची व खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, नियमित व्यायाम व योगाचा उपयोग करा. जोडीदाराची साथ मिळेल.

Team Beauty Of Maharashtra