साप्ताहिक राशीभविष्य: तुम्ही या 4 पैकी एका राशीतले असाल तर हा आठवडा असेल फक्त तुमचाच! तुमच्यावर देवाची राहील कृपा…

साप्ताहिक राशीभविष्य: तुम्ही या 4 पैकी एका राशीतले असाल तर हा आठवडा असेल फक्त तुमचाच! तुमच्यावर देवाची राहील कृपा…

आज षष्ठी श्राद्ध. या आठवड्यातील ग्रहस्थिती – शनि गुरू मकर राशीत हळूहळू मार्गी होत असून बुध या आठवड्यात तुला राशीत वक्री अवस्थेत जात आहे. सूर्य मंगळ कन्येत तर शुक्र तुला राशीत भ्रमण करीत आहे. राहू चंद्र आज वृषभ राशीतून भ्रमण करतील तर केतू वृश्चिकेत असेल. या ग्रह स्थिती नुसार पाहूया बारा राशींचे भविष्य.

मेष- राशीच्या धन स्थानातील चंद्र राहू आठवड्याची सुरवात मध्यम करतील. आर्थिक, कौटुंबिक बाबतीत खूप सावध राहणे गरजेचे आहे तरच लाभ होतील. शत्रू अनेक ठिकाणाहून तुमच्यावर नजर ठेऊन आहेत. कोणालाही दुखावू नका. वैवाहिक जीवनावर शुक्राचा शुभ प्रभाव आहे. आनंदाचे अनेक क्षण येतील. गुरु शनी कार्य क्षेत्रात सतत सहायक आहेत. वडीलधारी व्यक्ती मदत करेल. सप्ताह आनंदात जाईल.

वृषभ- राशीतील चंद्र भ्रमण राहू पीडित आहे. मनाची द्विधा अवस्था होईल. धार्मिक निष्ठा वाढतील. वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. तुमचे संतती साठी प्रयत्‍न सुरू असतील तर फळ मिळेल. गुरु कृपा राहील. राशी स्वामी शुक्र बुध अतिशय शुभ फळ देणार आहे.जोडीदाराची साथ लाभेल आध्यात्मिक प्रगती होईल. सप्ताह अनुकूल.

मिथुन- व्यय स्थानात राहू चंद्र दूरच्या प्रवासाचे योग आणतील. खर्च वाढेल. गृहसौख्य चांगले लाभेल पण वाद विवाद टाळा. घराचे योग येतील. नवीन वाहन खरेदी कराल. सुंदर वस्तु खरेदी कराल. संतती साठी अत्यंत शुभ आठवडा आहे. गुरु आणि शनि अष्टमात आहेत. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. प्रकृती सांभाळून असावे. सप्ताह शुभ आहे.

कर्क- सप्ताहात सुरवातीला प्रसन्न करणारे ग्रहमान आहे. लाभ होतील. काहीतरी मोठी खरेदी कराल. धार्मिक गोष्टी साठी खर्च होईल. जोडीदार आनंदात असेल. चतुर्थ शुक्र बुध गृहसौख्य उत्तम देईल. अकस्मात प्रवास योग येतील. भावंडाची गाठभेट होईल. कोणाशी वाद नको. तुमचे मनोबल वाढेल. उत्तरार्धात आर्थिक लाभ होतील.

सिंह- कुटुंबात काही विशिष्ट घटना घडतील. वर्चस्व सिद्ध करावे लागेल. वाद टाळा. तृतीय स्थानात शुक्राचे भ्रमण लाभदायी ठरेल. व्यवसाय वाढ, कलाकारांना शुभ फळ देणारा काळ आहे. आईवडील षष्ठ स्थानातील गुरू नोकरी पेशा व्यक्तींना शुभ फळ देईल. अकस्मात लाभ होतील. मित्र मैत्रिणींना भरपूर वेळ द्याल. पराक्रम आणि चिकाटी वाढेल. सप्ताह शुभ.

कन्या- राशीतील मंगळ स्वभाव तेज करेल. वाणी कठोर होईल. अधिकार वाढेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. अनेक वस्तु खरेदी कराल. उंची कपडे मिळतील. संतती चिंता आता थोडी कमी होईल.अभ्यासात गती प्राप्त होईल. धर्म विधायक कार्य घडेल. कौटुंबिक जीवनात एक प्रकारचे सौहार्द राहील. उत्तरार्ध जरा जपून राहण्याचा आहे.

तूळ- राशिस्थानी शुक्र बुध अनेक ठिकाणी तुमचे महत्व वाढेल. व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. अनेक लाभ, खरेदी होईल. व्यय सूर्य मंगळ अनेक कटकटी उभ्या करतील. कायद्याचे भय वाटेल. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. खर्च वाढेल. मुलांकडे लक्ष द्या.. सप्ताहाची सुरवात अष्टमात चंद्र भ्रमण मानसिक आंदोलने दर्शवतो. उत्तरार्ध अनुकूल. दूरचे प्रवास योग येतील.

वृश्चिक- राशी स्थानी असलेला केतू प्रकृतीची कुरकुर दाखवतो. जोडीदाराची प्रगती अडकून राहील. व्यय बुध शुक्राचे भ्रमण लाभदायी आहे परदेश प्रवास संबंधी काही निर्णय होतील. संतती सहकार्य करणार आहे. मंगळ उपासना करावी. रक्त विकार असतील तर दुर्लक्ष नको. काही कारणाने आर्थिक स्थिती बिघडू शकते. सप्ताह मध्यम आहे.

धनू- षष्ठ राहू चंद्र शत्रू वर विजय मिळवून देतील. मानसिक ताण जाणवत असेल तर काही निर्णय टाळा. डोळ्याचे त्रास संभवतात. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. मंगळ सूर्य अनेक अधिकार बहाल करण्यास मदत करतील. कुटुंब सुख लाभेल. संतती आनंदी राहील. वास्तुसंबंधी निर्णय होईल. उत्तरार्ध जरा जपून रहावे असे सुचवत आहे.

मकर- राशीतील गुरू शनि मकर व्यक्तींना एक प्रतिष्ठा मिळवून देतील. आर्थिक व्यवहार होतील. नवीन खरेदी करण्याची इच्छा होईल. संतती संबंधी काही चिंता उत्पन्न होईल. धार्मिक निष्ठा वाढेल. भाग्यात सूर्य मंगळ वडीलधारी व्यक्ती च्या मदतीने कार्यक्षेत्रात सफलता मिळेल. बुध शुक्राचे भ्रमण शुभ फळ देईल. उत्तरार्ध अनुकूल.

कुंभ- राशी स्वामी शनि वक्री अवस्थेत व्यय स्थानात असून मंगळ रवि अष्टमात आहे. हा आठवडा थोडा कठीण असून अपघात, पडणे यापासून जपा. वाहन सांभाळून चालवा. आर्थिक गुंतवणूक सांभाळून करा भागातील बुध शुक्र मात्र शुभ फळ देतील. प्रवास योग येतील. धार्मिक, सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाल. स्त्रिया तर्‍हेतर्‍हेच्या उंची वस्तु खरेदी करतील. उत्तरार्ध जपून राहण्याचा संकेत देतो आहे.

मीन- सप्ताहात सुरूवातीला प्रवास योग येतील. परदेशी असणार्‍यांची खुशाली समजेल. महत्त्वाचा निर्णय होईल.व्यावसायिक लाभ होतील. भावंड मदत करतील. जोडीदाराला नाराज करू नका. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. गुरु संतती कडे शुभ दृष्टी ठेवेल. शुभ कार्य घडतील. आठवडा शुभ फळ देणारा ठरेल.

Team Beauty Of Maharashtra