‘देवमाणूस’ मधील खराखुरा अजित कुमार म्हणजेच संतोष पोळ सध्या कोठे आहे, जाणून घ्या

‘देवमाणूस’ मधील खराखुरा अजित कुमार म्हणजेच संतोष पोळ सध्या कोठे आहे, जाणून घ्या

छोट्या पडद्यावर सध्या देवमाणूस मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील सर्वांची भूमिका या अतिशय उत्कृष्ट झालेल्या आहेत. एसीपी दिव्या सिंह हे पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. दिव्या सिंह ही भूमिका अभिनेत्री नेहा खान हिने साकारली आहे. नेहा खान ही सध्या या मालिकेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. याचे कारण देखील स्पष्ट झालेले आहे.

नेहा खान ही मराठी बिग बॉस थ्री मध्ये दिसणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. त्यामुळे ती ही मालिका सोडत असल्याचे देखील सांगण्यात येते. आता नेहा खान हिच्या जागी इन्स्पेक्टर शिंदे नामक व्यक्ती येणार आहेत. आता अजित कुमार देव याने या प्रकरणात उलटतपासणी घेतली आहे आणि तो बजावत असल्याचे दिसत आहे. ही मालिका आता रंजन टप्प्यावर येऊन ठेपलेली आहे.

तो उलट तपासणी दरम्यान पुन्हा तुरुंगातून सुटणार का? त्याला फाशी भेटणार का हे तर आपल्याला आगामी भागामध्ये कळणारच आहे. आता सरकारी वकील आर्या या न्यायाधीशांकडे विनंती करतात की, मला एका साक्षीदारां चा जबाब नोंद करण्याची परवानगी द्या. न्यायाधीश देखील त्याला परवानगी देतात. त्यामुळे आता मुंबईहून डॉक्टर को लते यांची एन्ट्री या मालिकेत होणार आहे. ती साक्ष फार महत्त्वाची ठरणार आहे. कारण को लते यांच्या हाताखाली अजित कुमार देव हा कंपाऊंडर म्हणून काम करत असतो.

कोलते आता काय साक्ष देतात याकडे प्रेक्षकांची लक्ष लागले आहे. त्यांच्या साक्षी वरच अजित कुमार याचे भवितव्य ठरणार आहे असे असले तरी अजित कुमार देव हा वाड्यातील लोकांसाठी देव माणूसच आहे, असे सध्या तरी दिसत आहे. मात्र, याला सरू आजीचा विरोध आहे. सरू आजी लोकांना समजून सांगत आहे. तरीदेखील ते लोक ऐकण्याच्या तयारीत नाहीत. त्याचप्रमाणे अजित कुमार देव आणि डिंपल यांचे खूप कारस्थान अजून देखील सुरूच आहेत.

अजित कुमार देवचे पात्र किरण गायकवाड या अभिनेत्याने साकारले आहे. या आधी देखील किरण गायकवाड याने लागीर झालं जी या मालिकेत नकारात्मक पात्र साकारले होते. त्याचे हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते. आज आम्ही आपल्याला या मालिकेत अजित कुमार देव हे पात्र कोणाच्या जीवनावर आधारित आहे, हे सांगणार आहोत. ती व्यक्ती सध्या काय करते हे देखील सांगणार आहोत. देव माणूस ही मालिका एका सत्य घटनेवर आधारित आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील एका शहरांमध्ये संतोष पोळ या व्यक्तीने बोगस प्रमाणपत्राच्या आधारे दवाखाना टाकला होता. तो या शहरात राहून अनेक लोकांवर उपचार करायचा. त्याच्या दवाखान्यात जो कोणी उपचार करायला यायचा त्याला तो तुम्हाला खूप मोठी बिमारी झाली, असे सांगायचा. ज्या ज्या लोकांनी त्याचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न केला, त्याची त्याने हत्या केली.

त्याने सगळ्यात शेवटी मंगला जेधे या अंगणवाडी सेविकेची हत्या केली होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्याने आजवर सहा जणांचा खून करून एका फार्महाऊसमध्ये गाढल्याचे स्पष्ट झाले आहे. 2016 मध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे. संतोष पोळ सध्या कोल्हापूरच्या कळंबा जेल मध्ये आहे आणि तो शिक्षा भोगत आहेत.

Team Beauty Of Maharashtra