संक्रातीला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत करणार प्रवेश, ‘या’ 4 राशींचं नशीब चमकणार

संक्रातीला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत करणार प्रवेश, ‘या’ 4 राशींचं नशीब चमकणार

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्य आपली राशी बदलतो तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात. दरवर्षी जानेवारी महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य त्यांचा मुलगा शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस मकर संक्रांतीचा सण म्हणून साजरा केला जातो. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा चार राशींवर त्याचे खूप शुभ परिणाम होतात. त्या चारही राशींना या दरम्यान अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी ज्यांच्यावर होणार हा शुभ परिणाम.

वृषभ : सूर्याचं राशी बदलल्यानं वृषभ राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायावर खूप चांगला परिणाम होतो. त्यांच्यासाठी सूर्याचं मकर राशीत प्रवेश करण शुभ असेल. या लोकांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारात वाढ होऊ शकते. त्याचबरोबर व्यापारी वर्गाला मोठी ऑर्डर किंवा डील मिळू शकते. त्यांना प्रवासाची संधी मिळण्याची शक्यता आहे. लोक तुमच्या कामानं खूश होतील आणि तुमची प्रशंसा करतील.

मिथुन : सूर्याचे हे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप आनंदी ठरेल. या राशीच्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल. रिसर्च करण्या संबंधित काम करत असलेल्यांना विशेष लाभ मिळू शकते. या लोकांचे आरोग्य चांगले राहील. जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल.

कर्क : सूर्याचा मकर राशीत प्रवेश कर्क राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ राहील. या लोकांना त्यांच्या जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. दुसरीकडे भागीदारीत काम करणाऱ्यांना मोठे यश मिळू शकते. जे लोक, आयात-निर्यात संबंधित काम करतात, त्यांना व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो. दुसरीकडे, अविवाहित लोकांचं लग्न ठरू शकतं.

मकर: सूर्याचा मकर राशीत प्रवेश करणार जिथे आधीच शनि आहे. अशा स्थितीत मकर राशीच्या लोकांना शनि आणि सूर्याच्या एकत्र आल्यानं विशेष फळ मिळेल. या लोकांचे आरोग्य सुधारेल. संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य मिळेल. चांगला वेळ जाईल, नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. सध्याच्या नोकरीत तुम्हाला बढती मिळू शकते. मुलांकडून आनंद मिळेल.

Team BM