या संकष्टीचे खास महत्व, बहुला संकष्टी कथा आणि महात्म्य

या संकष्टीचे खास महत्व, बहुला संकष्टी कथा आणि महात्म्य

श्रावण महिन्यातील संकष्टी बुधवार २५ ऑगस्ट २०२१ रोजी आहे. श्रावणातील या संकष्ट चतुर्थीला विशेष आणि अद्भूत योग जुळून येत आहेत. या चतुर्थीला अन्य भागात बहुला चतुर्थी म्हणूनही साजरे केले जाते तर जाणून घेऊया बहुला चतुर्थीचे महत्व आणि मान्यता…

आपल्या सर्वांचा लाडका असलेल्या गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणपती बाप्पाच्या आगमानापूर्वीची म्हणजेच श्रावण महिन्यातील संकष्टी बुधवार २५ ऑगस्ट २०२१ रोजी आहे.

श्रावणातील या संकष्ट चतुर्थीला विशेष आणि अद्भूत योग जुळून येत आहेत. या चतुर्थीला अन्य भागात बहुला चतुर्थी म्हणूनही साजरे केले जाते तर जाणून घेऊया बहुला चतुर्थीचे महत्व आणि मान्यता…

बहुला चतुर्थी- ऑगस्ट महिन्यात श्रावणी बुधवारी संकष्ट चतुर्थी येत असल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याशिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. सर्वार्थ सिद्धी योगात प्रथमेश गणेशाचे पूजन करून आपण आपल्या कामांना सुरुवात करू शकता. तसेच श्रावणी बुधवार असल्यामुळे गणपती पूजनासह बुधपूजन आणि गणेश पूजनाला अधिक महत्व प्राप्त झालं आहे. हे अत्यंत शुभ मानले गेले आहे. तसेच या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते.

बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे. हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते. या सर्व अद्भूत योगांमुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्या मुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खॊटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने “संकष्ट चतुर्थी व्रत ” केल्यामुळे गेला, अशीही एक कथा आहे.

आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वांनी करावयाचे , हे एक साधे , सोपे पण शीघ्र फ़लदायी व्रत आहे. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फ़लदयी व महत्वाची मानतात.प्रत्येकाने निदान वर्षांतून या दोन तरी अवश्य कराव्या.

श्रावण महिन्यातील संकष्टी- ” श्रीसंकष्टहरगणपती” हे या व्रताच्या देवतेचे नांव आहे, हे व्रत करणार्‍या स्त्री अगर पुरुषाने, व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी. सतत २१ संकष्ट्या करुन व्रताचे उद्यापन करावे. काहीजण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेकजण सततच संकष्टीचा उपवास करतात. संकष्टी करणार्‍यांनी उपवास सोडण्यापूर्वी नेहमी “संकष्टी चतुर्थी महात्म्य” अवश्य वाचावे. ते शक्य नसल्यास गणपतीचे स्तोत्र पठण करावे.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra