‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘सौंदर्या’ आहे या प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची पत्नी, जाणून घ्या

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमध्ये आता येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय रंजक घटना-घडामोडी करताना दिसणार आहेत. कारण दीपिका आणि कार्तिकी यांच्या शाळेची सहल लवकरच बाहेरगावी जाणार आहे आणि या सहलीला एक पालक त्यांच्यासोबत असणे अतिशय गरजेचे आहे.
त्यामुळे आता दीपा ही दीपिकासोबत जाणार आहे तर कार्तिक हा कार्तिकी सोबत जाणार आहे. त्यामुळे आता मालिकेत खूप मज्जा येणार आहे. कारण कार्तिक हा दीपिका आणि दिपा यांना सहलीमध्ये पाहतो तेव्हा आवाक होऊन जातो आणि त्याला लक्षात येते की, आपल्या सोबत जी मुलगी कार्तिकी राहत आहे ही दुसरी तिसरी कोणी नसून दीपा हिची मुलगी म्हणजेच आपली स्वतःची मुलगी आहे.
त्यानंतर त्याला खूप वेगळेच वाटते. या ट्रीपमध्ये वेगवेगळ्या स्पर्धादेखील घेण्यात येतात. या स्पर्धांमध्ये मग दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र येऊ लागतात. त्यांना आपली जुने दिवस खुप आठवतात. आपण एकमेकांवर किती प्रेम करत होतो. हेदेखील त्यांना आठवत राहणार आहे.
नंतर कार्तिक याला जाणवते की, आपण जर खरच एकत्र राहिलो असतो, तर आपला संसार किती सुखी राहिला असता. दिपा हिला ही असेच वाटू लागते. हे दोघेही या सहलीमध्ये खूप धमाल करतात. त्यामुळे येणाऱ्या काही भागांमध्ये आता कार्तिक आणि दीपा पुन्हा एकदा एकत्र येतील का? हे पाहणे फार मजेशीर ठरणार आहे.
मात्र, दुसरीकडे आयेशा ही कार्तिक सोबत लग्न करण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे आता नेमके या मालिकेत काय होणार हे पाहणे फार मजेशीर ठरणार आहे. या मालिकेमध्ये सौंदर्या ही भूमिका देखील अशी अतिशय चांगली अशी झाली आहे. सौंदर्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते. सौंदर्याची भूमिका अभिनेत्री हर्षदा खानविलकर हिने साकारली आहे.
हर्षदा खानविलकर गेल्या अनेक वर्षापासून मराठी मालिका आणि चित्रपट सृष्टी मध्ये कार्यरत आहे. तिने अनेक मालिका आणि या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. हर्षदा खानविलकर यांचा जन्म 23 जुलै 1973 रोजी झालेला आहे. सध्या ती 48 वर्षाची आहे. तिचा जन्म मुंबईतील लालबाग येथे झालेला आहे.
तिने बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पदवी मिळवलेली आहे. तिचे शिक्षण मुंबईतीलच डी. जी. रुपारेल कॉलेज येथे झाले आहे. तसेच तिला खेळ खेळायला खूप आवडत असल्याचे तिने सांगितले. हर्षदा खानविलकर ही एका मालिकेच्या भागासाठी पंचवीस हजार रुपये मानधन घेते, तर हर्षदा खानविलकर हिचे इंस्टाग्राम वर जवळपास 39 हजार फॉलॉवर आहेत.
तर हर्षदा खानविलकरकडे जवळपास 70 लाख रुपयांची संपत्ती आहे, तर हर्षदा खानविलकर ही प्रसिद्ध अभिनेते संजय जाधवची पत्नी आहे. संजय जाधव यांनी आजवर अनेक मराठी मालिका चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन देखील केलेले आहे. येणाऱ्या काही काळामध्ये त्यांच्याकडे आणखी चित्रपट असल्याचे सांगण्यात येते.
तर आपल्याला रंग माझा वेगळा मधील सौंदर्याची भूमिका आपल्याला आवडते का? आम्हाला नक्की सांगा.