महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर पुन्हा चर्चेत, या निर्मात्याच्या मुलाला करतेय डेट ?, दोघांचाही फोटो काढायला विरोध

महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर पुन्हा चर्चेत, या निर्मात्याच्या मुलाला करतेय डेट ?, दोघांचाही फोटो काढायला विरोध

मराठी हिंदी चित्रपट निर्माता,दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर सध्या त्यांचा मराठी चित्रपट ‘नया वरणभात लोन्च कोन कोन्चा ‘मुळे चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटतील काही सीनमुळे त्यांच्या विरोधत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर एका मोठ्या बॉलिवूड निर्मात्याच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी समोर येत आहे. सई मांजरेकरने सलमान खान सोबत ‘दबंग३’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सई सध्या तिच्या खासगी आयुष्यमुळे चर्चेत आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सई प्रसिद्ध निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्या मुलाला डेट करत आहे. त्याचं नाव सुभान नाडियाडवाला आहे. मुंबईच्या रेस्टॉरंटमध्ये दोघांना अनेकदा पाहण्यात आलं आहे. परंतु त्यांनी मीडियाला त्यांचे फोटो सोशल करू नका अशी विनंती केल्याने त्यांचा कोणताही फोटो अद्याप समोर आला नाही.

काही दिवसांपूर्वी दोघांना एका रेस्टॉरंटमध्ये जाताना पहिलं होतं. सईचे फोटो देखील काढण्यात आले होते परंतु जेव्हा त्यांना एकत्र पोझ देण्यासाठी सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी नकार दिला. असं सांगितलं जात आहे की सई आणि सुभान खूपच तरुण आहेत आणि त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडते.

सध्या ते रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत आणि ते हे नातं सगळ्यांसमोर उघड करण्यापूर्वी त्यांना एकमेकांना ओळखेच आहे. दरम्यान ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सईने तिच्या आणि सुभानसोबतच्या नात्यांबद्दल भाष्य केलं आहे.

ती म्हणाली, “आम्ही लहानपणापासूनचे चांगले मित्र आहोत. आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतो. आम्ही एकमेकांना डेट करत नाही आहोत या बातम्या खोट्या आहेत. सईच्या दबंग ३मधील कामाबद्दल बोलताना महेश मांजरेकर यांनी इ-टाइम्सला दिलेल्या मुलाखती त्यांना त्यांच्या मुलीचा अभिनय आवडला नव्हता, असं सांगितलं होतं.

तसंच तिच्या सोबत काम कधी करणार असा प्रश्न विचारल्यावर महेश यांनी सांगितलं की, ‘भूमिका योग्य असेल तर. मला अशी भूमिका हवी आहे ज्यामध्ये मी तिच्याशिवाय इतर कोणाला चित्रपटात पाहू शकणार नाही. मला तिच्यासाठी तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी भूमिका हवी आहे.

ती माझी मुलगी आहे म्हणून मी तिच्यावर इतर लोकांच्या भूमिका लादणार नाही.’

Team Beauty Of Maharashtra