‘चला हवा येऊ द्या’ मधून सागर कारंडे पडणार बाहेर ? समोर आले धक्कादायक कारण

‘चला हवा येऊ द्या’ मधून सागर कारंडे पडणार बाहेर ? समोर आले धक्कादायक कारण

छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिका चालताना दिसतात. रिॲलिटी शो आणि कॉमेडी शो यांचा तर सध्या खूप मोठ्या प्रमाणात बोलबाला असल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्यातच कलर्स मराठी वर सुरू असलेला मराठी बिग बॉस हा संपला. या शोला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.

विशाल निकम हा अभिनेता या शोचा विजेता ठरला होता, तर मराठीमध्ये सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा, चला हवा येऊ द्या आणि इतर मालिका या मोठ्या प्रमाणात गाजत असताना दिसतात. या मालिकांना देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आपल्या खुमासदार अभिनय व शैलीने अभिनेता डॉक्टर, निलेश साबळे याने अल्पावधीतच हा शो महाराष्ट्राच्या घराघरात नेऊन पोहचवला आहे.

त्याने अनेक ठिकाणी देखील या शोचे आयोजन केले होते. चला हवा येऊ द्या शो मध्ये नीलेश साबळे यांच्यासोबतच भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांच्यासह इतर कलाकारांचा सहभाग असतो. हा शो प्रेक्षकांना खूप मोठ्या प्रमाणात आवडत असतो. या शोमध्ये काम करणारे कलाकार हे अतिशय दर्जेदार रीत्या आपला अभिनय सादर करत असतात.

सातत्याने नवनवीन प्रयोग आणि वेगळ्या विषयाचे कथन या शोच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे या शोचा टीआरपी हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. चला हवा होऊ द्या या शोला प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यामुळे हा शो पाहणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. भारत गणेशपुरे हा आपल्या वैदर्भीय बोली भाषेने सगळ्यांना आकर्षित करत असतो.

तर श्रेया बुगडे ही देखील अतिशय खुमासदार पद्धतीने अभिनय सादर करत असते. कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांचा अभिनय तर हा अतिशय लक्षणीय असा असतो. “चला हवा येऊ द्या’ शो मध्ये सागर कारंडे हादेखील अतिशय उत्कृष्टरित्या काम करताना दिसत असतो. मात्र, आता सागर कारंडे याने शो सोडला असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

याचे कारण म्हणजे सागर सध्या ‘ही तर फॅमिली ची गंमत आहे’ या नाटकामध्ये दिसत आहे, तर त्याचं ‘इशारो इशारो मेें’ हे नाटक देखील सध्या लोकप्रिय झाले आहे. त्यामुळे एकाच वेळेस त्याला सगळीकडे लक्ष देता येणे अशक्य झाले आहे. त्यामुळे त्याने चला हवा येऊ द्या हा शो सोडल्याची चर्चा आहे.

मात्र, याबाबत अधिकृत माहिती अजून कळली नाही, तर सागर कारंडे आपल्याला आवडतो का? आम्हाला नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra