‘सारेगमप लिटील चॅम्प’ फेम रोहित राऊतची ‘गर्लफ्रेंड’ बघितली का, मराठी सिनेइंडस्ट्रीतील आहे गायिका

सध्या मराठी वाहिन्यांवर वेगवेगळे गाण्याचे शो सुरू आहेत. गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंड फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सगळ्यात आधी सा रे ग म प हा गाण्यांचा शो हिंदी मध्ये सुरू करण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शोने अनेक लोकप्रिय कलाकार मराठी चित्रपट सृष्टी तसेच बॉलीवूडला दिलेले आहेत.
सोनू निगम याचा प्रवास याच शो च्या माध्यमातून सुरू झाला होता. आज तो बॉलीवूडचा आघाडीचा स्टार बनला आहे. त्याचप्रमाणे सुनिधी चौहान याच शोच्या माध्यमातून वर आली आहे. सुनिधी आज बॉलीवूडची आघाडीची गायिका म्हणून गणली जाते. त्याचप्रमाणे इंडियन आयडल शो देखील काही वर्षांपूर्वी सुरू झाला.
इंडियन आयडल चा पहिला विजेता हा मराठमोळा अभिजीत सावंत ठरला होता. याच शोमध्ये राहुल वैद्य हा देखील सहभागी झाला होता. मात्र, त्याला ही स्पर्धा जिंकता आली नव्हती. कालांतराने मराठीमध्ये देखील असेच शो सुरू झाले. आता ‘सूर नवा ध्यास नवा’ हा शोध सुद्धा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला होता.
या शोमधून देखील अनेक कलाकार उदयास आले. आता मराठी इंडियन आयडल देखील सुरू झाला आहे. अजय अतुल हे दोघे मराठी इंडियन आयडल चे सूत्रसंचालन करत आहेत. त्यामध्ये त्यांना बेला शेंडे या ज्येष्ठ गायिका देखील साथ देत आहेत. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धक या शोमध्ये सहभागी झाले आहेत.
सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये अनेक जण कठीण परिस्थितीवर मात करून देखील आलेले आहेत. मात्र, त्यांचा आवाज अतिशय सुमधुर असा आहे. सा रे ग म प लिटल चॅम्प मध्ये काही वर्षांपूर्वी रोहित राऊत हा देखील सहभागी झाला होता. आपल्या सुमधूर आवाजाने त्याने अनेकांना मंत्रमुग्ध केले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
अनेक शोच्या माध्यमातून तो सहभागी झाला होता. अनेक किताब देखील त्याने जिंकले होते. काही चित्रपटासाठी देखील त्याने गाणी गायली होती. इंडियन आयडल हिंदी मध्ये देखील तो सहभागी झाला होता. त्याने ऑडिशनला ‘दिल से रे’ हे गाणे म्हणून प्रेक्षकांचे तसेच परीक्षकांची मन देखील जिंकले होते.
या शोमध्ये देखील त्याने आपल्या मधुर आवाजाची चमक दाखवली. मात्र, त्याला किताब जिंकता आला नाही. मात्र तो अनेकांच्या मनात घर करून बसला. अतिशय जबरदस्त असा त्याचा आवाज आहे. ‘के पग घुंगरू’ हे गीत त्याने अतिशय जबरदस्त इंडियन आयडल मध्ये गयिले होते. या गीताचे खुद्द बप्पी लहरी यांनी देखील खूप कौतुक केले होते.
या शोमध्ये कंगना राणावत ही देखील सहभागी झाली होती. ती देखील या गाण्यावर थिरकली होती. रोहित राऊत याच्या खासगी जीवनाबद्दल आज आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. रोहित राऊत सध्या एका तरुणीच्या प्रेमात पडला आहे. ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून गायिका जुईली जोगळेकर ही आहे.
जुईली जोगळेकर हीदेखील ‘सुर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये दिसली होती. तिने देखील आपल्या अप्रतिम आवाजाने आणि सगळ्यांची मनं जिंकली होती. गेल्या दहा वर्षापासून दोघेही एकमेकांच्या प्रेमसंबंधात असल्याचे सांगण्यात येते. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी या दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. दोघेही आपले फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर करत असतात. आता हे दोघं कधी लग्न करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.