रितेश देशमुख संतापला, स्वत:च्या डोक्यावर ओतलं पाणी, Video पाहिलात तर कळेल कारण!

रितेश देशमुख संतापला, स्वत:च्या डोक्यावर ओतलं पाणी, Video पाहिलात तर कळेल कारण!

रितेश देशमुख नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. सतत काही ना काही गमतीशीर पोस्ट शेअर करत असतो. अनेकदा त्यात त्याची पत्नी जेनेलियाचीही साथ असते. त्यामुळे त्याचा चाहता वर्गही मोठा आहे. यावेळी मात्र रितेश खूप चिडलाय. संतापानं त्याच्या अंगाची लाही लाही होत आहे.

सध्या सोशल मीडियावर रितेश देशमुखचा एक व्हिडिओ व्हारल झाला आहे. त्यात तो एका सलूनमध्ये गेला आहे. हेअर स्टाइलिस्ट बराच वेळ रितेशच्या केसांवर पाण्याचा स्प्रे मारतोय. मारतच जातोय. थांबायचं नावच नाही. मग गप्प बसेल तो रितेश कसला? त्यानं काय केल, ती स्पेची बाटली हातात घेतली आणि झाकण उघडून सगळं पाणी डोक्यावर ओतलं की हो!

तो हेअर स्टाइलिस्ट गोंधळून गेला. हे तर काहीच नाही. थोड्या वेळानं काही सेकंदानं पुन्हा एकदा हेअर स्टाइलिस्ट तेच करत असताना दिसतोय. तेव्हाही चिडून रितेश तीच अॅक्शन पुन्हा करतोय. पुढे तो लिहितो, मी शूटिंगसाठी तयार होत आहे.

काही दिवसांपूर्वी रितेशची एक गंभीर पोस्टही व्हायरल झाली होती. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, तेव्हा त्यानं ट्वीट करून त्यांचं कौतुक केलं होतं. रितेशन त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर होती. या पोस्टमध्ये रितेश म्हणाला, ‘महाराष्ट्राचे पुरोगामी, कृतीशील आणि काळजी घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांचे खूप खूप आभार. मानवतेनं आजवरच्या सर्वात कठीण काळात करोना साथीच्या आजाराशी सामना करताना, आम्हा नागरिकांना मार्गदर्शन केल्याबद्दल आणि त्यांच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद.’

Team Beauty Of Maharashtra