‘या’ गोष्टीमुळे या दोन अभिनेत्रींवर नाराज झाले होते ऋषी कपूर, त्यांचा राग पाहून सगळे जण झाले होते चकित..

को रो नामुळे आजकाल सर्वत्र दहशत पसरली आहे, भारतातही लॉकडाऊन चालू आहे. सामान्य लोकांप्रमाणेच चित्रपट कलाकार आप आपल्या घरात कैद आहेत, दरम्यान सोशल मीडियावर त्यांच्या संबंधित असलेले किस्से व गोष्टी व्हायरल होत आहेत.
दीपिका पादुकोण आणि सोनम कपूर यांचा असाच एक किस्सा व्हायरल होत आहे, यामध्ये त्यांनी रणबीर कपूरबद्दल अशी गोष्ट सांगितली की त्याचे वडील ऋषी कपूर नाराज झाले होते, ऋषी कपूर आता या जगात नाही, गेल्या महिन्यात 30 एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले होते.
ऋषी कपूर आपल्या अभिनयाबरोबरच अपल्या बेबाक बयानांसाठी परिचित होते, कधीकधी ते आपल्या अपमानकारक वक्तव्यांमुळे माध्यमांमध्ये खूप चर्चेत आले होते, एकदा ऋषी कपूर दीपिका पादुकोण आणि सोनम कपूरवर इतके भडकले होते की, त्यांनी त्यांच्या करियर आणि क्लास पर्यंत प्रश्न उपस्थित केले होते.
वास्तविक 2010 ची ही घटना आहे जेव्हा दीपिका पादुकोण आणि सोनम कपूर या दोघीही करण जोहरच्या प्रसिद्ध टॉक शो कॉफी विथ करणमध्ये आल्या होत्या. शोमध्ये करणने दीपिकाला विचारले की, रणबीर कपूरला गिफ्ट म्हणून तुला काय द्यायला आवडेल.
तर अभिनेत्री म्हणाली की मी रणबीरला कंडोमचे पॅकेट गिफ्ट करु इच्छिते, कारण तो याचा उपयोग जास्त करतो असेही ती म्हटली होती आणि रणबीरने कंडोम कंपनीची जाहिरात करावी असे तिला वाटते.
तसेच याच शोमध्ये अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरने रणबीर बद्दल सांगितले की तो एक चांगला मित्र आहे, पण मला माहित नाही की तो एक चांगला बॉयफ्रेंड आहे की नाही, मी रणबीरला मागील काही वर्षांपासून ओळखते, पण एक मित्र म्हणून. मला म्हणायचे आहे की दीपिका खूप दिवस त्याच्याबरोबर चांगली राहिलेली आहे.
आपल्या मुलाबद्दल अशा गोष्टी ऐकल्यानंतर ऋषीं यांना या दोन अभिनेत्रींचा राग आला होता, त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की या दोघांनीही आपला क्लास दाखविला आहे. ऋषी कपूर यांनी असेही म्हटले होते की या दोघींकडे अशा गोष्टींपेक्षा आपल्या कारकिर्दीवर लक्ष दिले पाहिजे.
बॉलिवूड अभिनेते एवढ्यातच थांबले नाही तर, ते म्हणाले की या शोमध्ये दोन्ही अभिनेत्रींना त्यांच्या वडिलांच्या कर्तृत्वामुळे बोलावण्यात आले होते, कारण त्या दोघींनी अद्याप काहीही मिळवलेले नाही.
आमचे पेज नक्की लाईक करा.