रेवती नक्षत्रात बुध- गुरु एकत्र आल्याने ‘या’ राशींना प्रचंड धनलाभाची संधी; नोकरीत बदलांचे संकेत व श्रीमंतीचा योग

रेवती नक्षत्रात बुध- गुरु एकत्र आल्याने ‘या’ राशींना प्रचंड धनलाभाची संधी; नोकरीत बदलांचे संकेत व श्रीमंतीचा योग

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव १२ राशींवर सुद्धा दिसून येतो. जेव्हा एकाहून अधिक ग्रह एखाद्या राशीत किंवा नक्षत्रात एकत्र येऊन युती करतात तेव्हा त्यांचा प्रभाव हा साहजिकच द्विगुणित होतो. काही दिवसांपूर्वी गुरु ग्रहणे रेवती नक्षत्रात प्रवेश घेतला होता तर २७ मार्च रोजी ग्रहांचे राजकुमार बुध देव सुद्धा रेवती नक्षत्रात स्थिर झाले आहेत. या दोन्ही ग्रहांच्या युतीने काही राशींच्या नशिबात भाग्योदयाचे योग आहेत. बुध हा तर्क व गुरु हा ज्ञानाचा कारक मानला जातो त्यामुळे येत्या काळात आपल्या बुद्धिमत्तेला नशिबाची सुद्धा साथ लाभण्याची चिन्हे आहेत. बुध व गुरूच्या युतीने ज्यांच्या भाग्याचे दार उघडणार अशा राशी कोणत्या व त्यांना नेमका काय लाभ होऊ शकतो हे पाहूया…

बुध- गुरु युतीने ‘या’ राशी होतील धनवान?
मिथुन रास (Gemini Zodiac)
बुध व गुरुची युती ही मिथुन राशीसाठी लाभदायक ठरू शकते. तुमच्या राशीला या वर्षाच्या सुरुवातीला शनीच्या साडेसातीतून मुक्ती मिळाली आहे त्यामुळे २०२३ हे पूर्ण वर्ष आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतो. आपल्याला प्रगतीचे योग आहेत. वाहन व प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. नोकरदार मंडळींना नव्या जॉबची संधी लाभू शकते. तसेच तुम्हाला कामाच्या ठिकाणी ज्युनिअर व सिनियर्स दोन्ही मंडळींकडून पाठिंबा मिळू शकतो. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुकीतून अपार संपत्तीचे धनी होता येऊ शकते.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)
रेवती नक्षत्रातील बुध व गुरु हे वृश्चिक राशीच्या आयुष्यात प्रगतीचे वाहक ठरू शकतात. तुम्हाला विवाहाचे योग आहेत. प्रेमाच्या माणसाची साथ लाभल्याने दिवस आनंदात जातील. विवाहित मंडळींना संतती सुख अनुभवता येऊ शकते. आर्थिक बाजू भरभक्कम झाल्याने तुमच्या मनावरील ताण- तणाव दूर होण्यास मदत होईल. इच्छापूर्तीसाठी तुम्हाला कामाचा वेग व गुणवत्ता दोन्ही वाढवावे लागतील पण तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला नशिबाची साथ लाभू शकते.

धनु रास (Dhanu Zodiac)
रेवती नक्षत्रातील बुध व गुरु धनु राशीसाठी बदलाचे संकेत घेऊन आले आहेत. तुम्हाला आयुष्याला कलाटणी देणारे काही निर्णय घ्यावे लागू शकतात. दैव परीक्षा पार करताच तुमच्यासाठी सुखाची कवाडे उघडी होऊ शकतात. तुमचे आई- वडील तुमच्या कामावर खुश होऊ शकतात. कौटुंबिक सुखाने तुमचे दिवस समृद्ध होऊ शकतील. धनु रास ही आर्थिक बाजूने मजबूत होऊ शकते.

वृषभ रास (Taurus Zodiac)
बुध व गुरुची युती ही वृषभ राशीसाठी लाभदायक व शुभ सिद्ध होऊ शकते. येत्या काळात आपल्या नोकरीत पगारवाढ व पदोन्नतीचे योग आहेत. तुमचे आर्थिक पाठबळ वाढवणाऱ्या काही घटना घडू शकतात. समाजात मान- सन्मान वाढू शकतो. मीडिया,बँकिंग, फिल्म व अभिनयाशी संबंधित करिअर मध्ये असलेल्या मंडळींना अत्यंत लाभाचा काळ अनुभवता येऊ शकतो.

Team BM