रविवारी करा ‘हे’ उपाय; जाणवणार नाही पैशांची कमतरता

रविवारी करा ‘हे’ उपाय; जाणवणार नाही पैशांची कमतरता

रविवारच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली चौमुख दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन धनलाभ होऊ शकतो. यादिवशी कपाळावर चंदनाचा टिळा लावणंही शुभ मानलं जातं.

रविवारी झोपण्यापूर्वी गाईच्या दूधाचा एक ग्लास आपल्या डोक्याजवळ ठेवावा. सकाळी पूजा केल्यानंतर हे दूध प्यावं. यामुळे बिघडलेली कामं सुरळीत होतील. त्याचप्रमाणे स्वास्थ्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.

रविवारी पीठाच्या गोळ्या करून माशांना खाण्यासाठी द्याव्यात. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देते. यादिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला दिवे लावावेत. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील.

रविवारी शिव मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. गौरी-शंकराला रुद्राक्ष अर्पण करावं. असं केल्याने घरात देवी लक्ष्मीचं आगमन होतं. यादिवशी पिंपळाच्या पानावर आपल्या मनातील इच्छा लिहावी आणि हे पान नदीच्या पाण्यात अर्पण करावं. यामुळे आपली मनोकामना लवकर पूर्ण होते.

रविवारी झाडू विकत घेणं शुभ मानलं जातं. दुसऱ्या दिवशी स्नान करून देवीच्या मंदिरात झाडू ठेवावा. मात्र हे करताना तुम्हाला कोणी पाहू नये याची काळजी घ्यावी. यामुळे धनलाभ होतो.

Team Beauty Of Maharashtra