दैनंदिन राशिभविष्य : भाग्याची साथ, आर्थिक लाभ; जुलै महिन्याचा पहिला दिवस उत्तम जाणार

दैनंदिन राशिभविष्य : भाग्याची साथ, आर्थिक लाभ; जुलै महिन्याचा पहिला दिवस उत्तम जाणार

आज दिनांक 01 जुलै 2022. वार शुक्रवार. तिथी आषाढ शुक्ल द्वितीया. आज चंद्र कर्क राशीत भ्रमण करेल. सूर्याचा मिथुन राशीत प्रवेश झाला आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष- आज चतुर्थ चंद्र आहे. तुमचा न ऐकण्याचा स्वभाव आहे. राशीतील मंगळ राहू तणाव निर्माण करतील. वयाने मोठ्या मित्रमंडळींशी मतभेद होतील. घरातील कामात मन रमावा. दिवस मध्यम.

वृषभ- आज ग्रह आनंदी मनस्थिती करतील. आता भाग्य साथ देत आहे. अडचणीतून मार्ग निघेल. चंद्र तृतीय स्थानात उत्तम आहे. प्रवास आणि जन संपर्क घडेल. दिवस शुभ.

मिथुन- राशीच्या धन स्थानात चंद्र धार्मिक कामात यश देईल. आर्थिक लाभ घडतील. प्रवास योग येतील. कार्य क्षेत्रात नाव मिळेल. दिवस उत्तम.

कर्क- आज राशी स्थानातील चंद्र संततीसंबंधी मानसिक ताण होईल, असं सुचवत आहे. मन अशांत राहिल. आर्थिकदृष्टया दिवस उत्तम जाईल. उपासना करा.

सिंह- शनी सध्या मानसिक, शारीरिक ताण देत आहे. जोडीदाराला जपून राहण्याचा काळ आहे. व्यय स्थानातील चंद्र आज काम, व्यवसायात ताण देईल. दिवस मध्यम आहे.

कन्या- मानसन्मान, आर्थिक घडामोडी असा सध्याचा काळ आहे. शुक्र घराच्या नुतनीकरणासाठी मदत करेल. भाग्य साथ देईल. जोडीदारासोबत आनंदात दिवस जाईल. दिवस उत्तम आहे.

तूळ- आज दिवस कार्यक्षेत्रासाठी वेळ द्या असं सांगत आहे. घरातील दुखणी, खर्च आता कमी होतील. चंद्र भरपूर आर्थिक लाभ देईल. दिवस उत्तम.

वृश्चिक- आई वडिलांशी मतभेद, गैरसमज होऊ शकतात. व्यावसायिक संबंधसुद्धा तणावपूर्ण राहतील. आर्थिक लाभ होऊ शकतात. धार्मिक कार्य घडतील. संततीसाठी दिवस बरा.

धनु- मंगळ राहू पंचम स्थानात संभ्रम निर्माण करतील. चंद्र आर्थिक अडचणी आणेल. कुटुंब सुख कमी मिळेल. घरात काम भरपूर करावं लागेल. दिवस मध्यम.

मकर- शनी सध्या तुमच्या धन स्थानात आहे. चंद्र आर्थिक चिंता दूर करेल. घरात कलह होऊ शकतात. शांत राहा. लवकरच बदल होईल. दिवस बरा.

कुंभ- आज घरामध्ये थोडा ताण जाणवेल. काही जास्तीच्या जबाबदाऱ्या, पाहुणेसुद्धा येऊ शकतात. चंद्र खर्च खूप करवेल. मानसिक ताण देईल. दिवस मध्यम आहे.

मीन- छोटे मोठे प्रवास, खर्च असा हा दिवस आनंदात पार पडेल. चंद्र धार्मिक कारणांसाठी काही खर्च करेल. संततीला वेळ द्याल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. दिवस उत्तम.

Team Beauty Of Maharashtra