आज सूर्य १२ महिन्यांनंतर करत आहे स्वत:च्याच राशीमध्ये प्रवेश, काही राशींवर होईल चांगला प्रभाव… तर काही राशींवर…

मंगळवारी, १६ ऑगस्ट २०२१ रोजी नवग्रहांचा राजा सूर्य मध्यरात्रीनंतर १ वाजून १६ मिनिटांनी कर्क राशीतून स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करेल आणि गुरुवार १६ सप्टेंबरपर्यंत याच राशीत संक्रमण करेल. सूर्य एका राशीमध्ये एक महिना राहतो, त्यामुळे एक वर्षानंतर सूर्य स्वतःच्या राशीत परत आला आहे. सूर्याच्या स्वतःच्या राशीतील आगमनामुळे, सूर्याचा प्रभाव आणखी वाढला आहे. सूर्याबरोबरच मंगळ आणि बुधही काही काळ सिंहमध्ये राहतील. अशा स्थितीत सर्व राशींसाठी सिंह राशीत सूर्याचे संक्रमण कसे राहील, पाहा सर्व राशींवर सिंह संक्रांतीचा प्रभाव…
मेष- सूर्याने स्वतःच्या राशी सिंह मध्ये प्रवेश केल्याने मेष राशीच्या लोकांच्या महत्वाकांक्षा वाढतील. विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगला राहील. नोकरदार आणि व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनाही अनुकूल परिणाम मिळतील.
वृषभ- वृषभ राशीच्या लोकांना सूर्याचे परिर्तन जमीन आणि घराशी संबंधित बाबींमध्ये लाभ मिळवणारे ठरेल. वाहन खरेदी करण्याचा योगही आहे. व्यापाऱ्यांसाठी वेळ चांगला आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत वेळ सुखद राहील. नोकरदार लोकांना आदर आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन- सिंह राशीत सूर्याच्या आगमनाने मिथुन राशीच्या लोकांना घरात किंवा कामाच्या ठिकाणी सर्वांचा पाठिंबा मिळेल. दूरच्या प्रवासाचे देखील योग असतील. लेखन करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सुखद आहे. वडिलांशी संबंध सुधारतील. तुमच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होईल.
कर्क- कर्क राशीच्या लोकांना सूर्याने सिंहमध्ये प्रवेश केल्यामुळे नवीन लोकांमध्ये मिसळणे कठीण होऊ शकते. तुमची गुपिते कोणालाही सांगणे टाळा. गुंतवणुकीत तुम्हाला नफा मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी वेळ खूप शुभ आहे.
सिंह- सूर्याचा स्वत:च्या म्हणजेच सिंह राशीतील प्रवेश या राशीच्या लोकांसाठी थोडा नफा आणि थोडा तोटा असा योग बनवत आहे. नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या लोकांसाठी वेळ चांगला आहे. विवाहित लोकांच्या जीवनात काही उलथापालथ होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका.
कन्या- सूर्य सिंह राशीमध्ये प्रवेश करत असल्याने, जे परदेश संबंधित व्यवसाय करतात अशा कन्या राशीच्या लोकांसाठी वेळ अनुकूल आहे . कामाशी संबंधित एखादा प्रवास घडण्याची संधी मिळेल. यामुळे कामाच्या ठिकाणी प्रगती करण्याची तसेच लाभ मिळण्याची क्षमता आहे.
तूळ- सिंह राशीत सूर्याच्या प्रवेशामुळे, तूळ राशीच्या लोकांसाठी जे नोकरी करत आहेत त्यांना पगारवाढीचे योग आहेत. ज्यांना आपले स्वत:चे काम सुरू करायचे आहे अशा लोकांसाठी देखील हा काळ अधिक अनुकूल आहे. हा काळ विद्यार्थ्यांसाठीही शुभ आहे. प्रेम प्रकरणांमध्ये मात्र निराश होऊ शकतात.
वृश्चिक- सूर्याच्या सिंह राशीमध्ये झालेल्या आगमनाने वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पदोन्नतीचे योग निर्माण होत आहेत. विवाहित लोकांना मुलबाळसंबंधी एखादी चांगली बातमी मिळू शकते. यासोबतच मुलांकडून आदर मिळवण्याचा योगही आहे. आर्थिक जीवनात, हा काळ अनेक स्त्रोतांपासून आणि एखाद्या वडिलोपार्जित मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता देखील दर्शवित आहे.
धनू- सूर्याच्या स्वतच्या राशीत झालेल्या आगमनाने धनू राशीच्या लोकांचा धर्माकडे कल असेल. काही सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेऊन धर्मादाय कार्य करू शकतात. काही स्थानिक लोक स्वतःमध्ये शांती आणि समाधानासाठी तीर्थयात्रेला जाण्याची योजना आखू शकतात. जे उच्च शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत त्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते.
मकर- सूर्याचे राशी बदल झाल्यामुळे मकर राशीच्या लोकांचे त्यांच्या बोलण्यावर चांगले नियंत्रण राहील. सामाजिक उपक्रम देखील वाढतील आणि लोकांना तुमच्या सभोवताली राहणे आवडेल. वेगवेगळ्या विषयांवर ज्ञान घेण्याची तुमची सवय तुम्हाला यश मिळविण्यात मदत करेल. आत्मविश्वास आणि धैर्य वाढल्याने नेतृत्व क्षमता वाढेल.
कुंभ- सिंह राशीत सूर्य येत असल्याने, कुंभ राशीचा स्वभाव आक्रमक होताना दिसेल आणि इच्छा नसतानाही छोट्या समस्यांवर जास्त प्रतिक्रिया देतील. अशा परिस्थितीत, स्वतःला शांत ठेवणे आणि जीवनशैली सुधारण्यासाठी योगा आणि व्यायामाची मदत घेणे योग्य आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी बॉसकडून कौतुक मिळेल. शास्त्रज्ञ, राजकारणी, समाजसेवक किंवा कलाकार सुद्धा आपापल्या क्षेत्रात अफाट यश मिळवण्याची शक्यता निर्माण होत आहे.
मीन- सिंह राशीत सूर्याच्या आगमनाने, मीन राशीच्या लोकांचे वर्चस्व समाजात वाढेल. यासह कौशल्यांच्या बळावर प्रसिद्धी आणि उत्तम नेतृत्व तसेच कामाच्या ठिकाणी इतरांची प्रशंसा मिळवू शकतील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, हे संक्रमण त्यांना यश देईल कारण या काळात तुम्ही तुमच्या परीक्षेत उत्तम कामगिरी करू शकाल. आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल.