साप्ताहिक राशीभविष्य ५ ते ११ सप्टेंबर २०२१ : मंगळ शुक्र राशीपरिवर्तन यांच्यासाठी लाभदायक

साप्ताहिक राशीभविष्य ५ ते ११ सप्टेंबर २०२१ : मंगळ शुक्र राशीपरिवर्तन यांच्यासाठी लाभदायक

सप्टेंबर च्या या आठवड्यात सुरवातीलाच मंगळ आणि शुक्र दोन्ही ग्रह राशी परिवर्तन करतील. याचा परिणाम सर्व राशींवर होईल. काही राशींसाठी मंगळ आणि शुक्राचे राशीपरिवर्तन शुभ फलदायक होणार आहे तर काहींसाठी चढउताराची संभावना असेल. तुमच्यासाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या प्रसिद्ध ज्योतिषी पुरुषोत्तम शुक्ल यांच्याकडून…

मेष – घरगुती प्रश्न सोडवा- ग्रहमान पाहता या आठवड्यात घरगुती प्रश्नांची उकल केल्यास खरे समाधान मिळेल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला उत्तम काळ असून, महिलांना त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. सध्याची स्थिती मजबूत करण्याचा आपला मानस राहील. जोडीदारासाठी अधिक वेळ द्या. काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. चांगल्या व्यक्तीशी सल्लामसलत करून महत्त्वाचे निर्णय घ्या. प्रवासाचे योग येतील. नोकरदारांना कौशल्याने नव्या संधी प्राप्त होतील. आर्थिक बाजू ठीक राहील. आरोग्य उत्तम राहील. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. डोळ्यांची जळजळ संभवते.

वृषभ – कामे पार पाडाल- ग्रहांची बऱ्यापैकी साथ मिळाल्याने आपली नियोजित कामे पार पाडू शकाल. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल. स्थावरबाबतचे प्रश्न सोडविता येतील. नव्या उद्योगाची सुरूवात करू शकता. आपल्या जोडीदारासोबत आनंद घ्याल. संगणक, क्रीडा या क्षेत्रांतील व्यक्तींना हा काळ उत्तम राहील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. घरगुती कार्यात व्यस्त राहाल. व्यापार-उद्योगात प्रगती कराल. कामानिमित्त प्रवासाचे योग संभवतात. बौद्धिक क्षेत्राला चांगला वाव मिळेल. लेखकवर्गाला हा काळ छान राहील. आर्थिक बाजू ठीक राहील. प्रकृतीमान ठीक असले तरी खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, चटकदार खाणे टाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

मिथुन – प्रतिकूल आठवडा- एकूण ग्रहमान पाहता हा आठवडा आपणास सर्व बाबतीत प्रतिकूल स्वरूपाचा राहणार आहे. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. कलाक्षेत्राला चांगला काळ असून, महिलांना त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. कुटुंबियांसमवेत बाहेर जाण्याचा मानस राहील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. नोकरदारांना जबाबदारीत बदल संभवतो. आधुनिक माध्यमातून जोडीदाराच्या संपर्कात राहू शकाल. प्रकृतीस्वास्थ्य ठीक असले तरी मोसमी आजारांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

कर्क – चांगला कालावधी- एकूण ग्रहमान पाहता या आठवड्याचा काळ चांगला असल्याने मनासारख्या गोष्टी साध्य़ करता येतील. नोकरदारांना दिलासा मिळेल. व्यवसायात नवी सुरूवात करण्याची शक्यता राहील. शेअर बाजाराच्या व्यवहारापासून दूर राहा. बोलण्यात अहंकार व उग्रपणा कटाक्षाने टाळा. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. नोकरीत प्रगती साधता येतील. प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक वातावरण छान राहील. स्थावरबाबतचे प्रश्न सुटू लागतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रकृतीस्वास्थ्य जपा, ध्यानधारणा करा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

सिंह – परिश्रमाचे फळ मिळेल- एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात आपणास केलेल्या परिश्रमाचे य़ोग्य फळ मिळू शकेल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. कामाचा व्याप वाढेल. वाहनांपासून सावध राहा. प्रवासाचे योग येतील. सरकारी नियमांचे पालन करा. विविध मार्गांनी धनलाभ संभवतो. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. प्रकृतीमान ठीक राहील. मोसमी आजारांपासून सावध राहा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

कन्या – अपेक्षित गोष्टी साध्य- एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात आपणास ग्रहांची साथ लाभल्याने योजिलेल्या अपेक्षित गोष्टी साध्य होतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने प्रथमपासून अनावश्यक खर्च टाळा. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रवासात सावधगिरी बाळगा. स्थावरबाबतचे प्रश्न मार्गी लागतील. कोर्टकचेरीच्या कामांना चालना मिळेल. प्रवासाचे योग येतील. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. व्यापारात प्रगती करण्याची संधी मिळेल. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या, नियमित व्यायाम करावा. जोडीदाराची साथ मिळेल.

तूळ – यशदायी आठवडा- एकूण ग्रहमान पाहता हा आठवडा सर्व दृष्टीने यशदायी स्वरूपाचा राहणार आहे. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला हा काळ उत्तम असून, महिलांना त्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तरी अनावश्यक खर्च टाळा. प्रवासाचे योग येतील, पण सावधानता बाळगा. स्थावरबाबतचे प्रश्न मार्गी लागतील. विद्यार्थीवर्गाला त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. व्यवसायाला प्रगतीपथावर न्याल. तब्येतीसाठी उपवास अथवा हलका आहार उत्तम राहील. जोडीदाराला खूश ठेवा.

वृश्चिक – फायदेशीर आठवडा- ग्रहमान पाहता हा आठवडा सर्व बाबतीत फायदेशीर स्वरूपाचा असणारा आहे, त्याचा अवश्य लाभ घ्यावा. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. स्थावरबाबतचे प्रश्न सुटू लागतील. आपल्या रागावर योग्य नियंत्रण ठेवा. पत्नीला खूश ठेवा. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात सावधानता बाळगा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. अचानक प्रवास योग संभवतात. व्यापारात लाभ संभवतो. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. कृषी व सरकारदरबारी काम करणाऱ्यांना हा काळ उत्तम राहील. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्य़ाची पथ्ये पाळा. नियमित व्यायाम, ध्यानधारणा करा.

धनू – आव्हानात्मक आठवडा- एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात आपणास अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. नोकरदारांना दिलासा मिळेल. प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. प्रवासाचे योग येतील. आपल्या कार्यात कामचुकारपणा करण्याचे टाळा. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. प्रवासात सावधानता बाळगा. कामकाजात व्यस्त राहाल. जोडीदाराला उत्तमपणे समजावण्याचा प्रयत्न कराल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या शिक्षणाबाबत. छोट्या आजारांबाबत निष्काळजी राहू नका. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. सर्दी, खोकला यासारख्या विकारांपासून सावध राहा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

मकर – प्रगतीची संधी मिळेल- एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात विविध क्षेत्रांत प्रगती करण्याची संधी मिळाल्याचे समाधान मिळेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ उत्तम राहील. स्थावरबाबतचे प्रश्न सोडविता येतील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या शिक्षणाबाबत. प्रवासाचे योग येतील. बौद्धिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल. शेअर बाजार, वायदा बाजार यापासून दूर राहावे. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. तब्येतीच्या बाबतीत अधिक जागरूक राहावे, विशेषतः पोटात जळजळ होण्याबाबत. जोडीदाराची साथ मिळेल.

कुंभ – खरेदीचे बेत आखाल- ग्रहमान पाहता या आठवड्यात विशेष गोष्टी खरेदीचे बेत साध्य होतील. स्थावरबाबतचे प्रश्न सोडवाल. नवीन वाहन खरेदीचे बेत आखाल, पर्यायाने कौटुंबिक सुख-समाधान व आनंद मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. इतरांवर विसंबून कामे टाकू नका. कामकाजात काही बदल करावेसे वाटतील. बोलताना इतरांशी गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्या. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. प्रवासाचे योग येतील. प्रवासात सावधानता बाळगा. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, विशेषतः उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

मीन – आशावादी आठवडा- ग्रहमान पाहता हा आठवडा सर्व दृष्टीने आशावादी स्वरूपाचा राहणार आहे. नोकरदारांना दिलासा मिळेल. राजकीय क्षेत्रातील मंडळींना हा काळ छान राहील. संगणक, तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना हा काळ विशेष लाभदायक राहील. कामानिमित्त प्रवास योग संभवतात. स्थावरबाबतचे प्रश्न सुटू लागतील. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा मानस राहील. आपल्या कर्तृत्वाने यशाची उंची गाठू शकाल. ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या भवितव्याबाबत. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. रक्तदाब व पोटाच्या विकारांबाबत सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

Team Beauty Of Maharashtra