८ ते १४ मे मध्ये ‘या’ राशींच्या नशिबाला कलाटणी? संकष्टीने सुरु झालेला आठवडा तुम्हाला कसा जाणार वाचा

८ ते १४ मे मध्ये ‘या’ राशींच्या नशिबाला कलाटणी? संकष्टीने सुरु झालेला आठवडा तुम्हाला कसा जाणार वाचा

मे महिन्यातील दुसरा आठवडा आजपासून सुरु होत आहे. या आठवड्यात १० मे ला मंगळ ग्रहाचे कर्क राशीत गोचर होणार आहे. तर आठवड्याची सुरुवातच गणपती बाप्पांच्या संकष्टी चतुर्थीपासून होत आहे. आठवड्याच्या सरतेशेवटी बुध देवाचा उदय होणार आहे. या एकूण ग्रहस्थितीनुसार काही राशींसाठी सुखाचा तर काहींना कष्टाचा काळ अनुभवावा लागू शकतो. चला तर मग आपल्या राशीला ८ मे ते १४ मे हा आठवडा कसा जाणार हे पाहूया..

८ ते १४ मे पर्यंतचे १२ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य
मेष (Aries Zodiac)
आपल्या नशिबात या आठवड्यात गतिशीलता दिसून येत आहे. प्रलंबित कामे वेगाने पूर्ण झाल्याने तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्या कष्टाचे चीज होण्याचा हा कालावधी ठरू शकतो.

वृषभ (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या मंडळींना आयुष्यातील सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे मान- सन्मान मिळवून देणारा हा कालावधी ठरू शकतो. वरिष्ठांकडून आपले कौतुक होऊ शकते यामुळे तुम्हाला पदोन्नत्तीसह पगारवाढ सुद्धा मिळू शकते.

मिथुन (Gemini Zodiac)
मिथुन राशीच्या कुंडलीत बदल दिसून येत आहे. आपल्याला कामाच्या निमित्ताने घरापासून दूर राहावे लागू शकते. या काळात नोकरी व व्यवसायात लाभ वाढू शकतो पण कौटुंबिक जबाबदाऱ्या दुर्लक्षित करू नका.

कर्क (Cancer Zodiac)
कर्क राशीला नव्या नोकरीची संधी चालून येऊ शकते. तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास फायद्याची चिन्हे आहेत. मन व डोके शक्य तितके शांत ठेवण्यावर भर द्या.

सिंह (Leo Zodiac)
सामाजिक जबाबदारी पार पाडण्याची ही वेळ आहे. धार्मिक कार्यांची आवड, गरज वाढून तुमचा सहभागही अधिक वारंवार होऊ शकतो. आरोग्याची हेळसांड टाळा. डोळ्यांची काळजी घ्या.

कन्या (Virgo Zodiac)
कन्या राशीला प्रचंड मानसिक ताण व थकवा सहन करावा लागू शकतो. मंगळ गोचर आपल्याला कामाच्या जबाबदाऱ्या वाढवणारे ठरू शकते. डोके शांत ठेवून निर्णय घेतल्यास त्रास कमी होऊ शकतो.

तूळ (Libra Zodiac)
तुम्हाला प्रवासाचे योग आहेत. करिअरमध्ये बदल घडवून आणणाऱ्या काही व्यक्तींच्या संपर्कात येऊ शकता. तुम्हाला समृद्ध करून जाणारी एखादी घटना घडू शकते.

वृश्चिक (Scorpio Zodiac)
तुमच्या कामाचे खूप कौतुक करून घेण्याचा हा कालावधी ठरू शकतो. पण तुमचे हितशत्रू वाढल्याने तुम्हाला सावध राहणे सुद्धा गरजेचे ठरणार आहे. या आठवड्यात जरा खर्चावर नियंत्रण ठेवावे लागू शकते.

धनु (Sagittarius Zodiac)
मन स्थिर ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागू शकतात. तुम्हाला भागीदारीतून अधिक पैसे कमावण्याची संधी चालून येऊ शकते. आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची चिन्हे आहेत. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला सुखावणारा एखादा क्षण सगळा शीण दूर करू शकतो.

मकर (Capricorn Zodiac)
मकर राशीला वैवाहिक सुख लाभण्याचा हा कालावधी ठरू शकतो. तुम्हाला कोणत्याही वादाच्या मुद्द्यांपासून दूर राहावे लागेल. आई वडिलांशी नाते आणखी घट्ट होऊ शकते.

कुंभ (Aquarius Zodiac)
कुंभ राशीला भविष्याची सोय करून ठेवणारे काही निर्णय घ्यावे लागू शकतात. तुम्हाला नशिबाची तगडी साथ लाभू शकते. मेहनतीचे फळ मिळून यश तुमच्या पायाशी येऊ शकते. हे सगळे होण्यासाठी तुम्हाला वाणीमध्ये माधुर्य आणावे लागेल.

मीन (Pisces Zodiac)
भावनिक शक्तीची परीक्षा घेणारा हा कालावधी असु शकतो. या काळात तुम्हाला जवळच्या माणसांना जपावं लागेल. विवाह इच्छुकांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत.

Team BM