शनी वक्री ते मंगळ गोचर, मे महिन्यात बनले चार महाराजयोग! कोणाला धनलाभ, कोणाला कष्ट? पाहा १२ राशींचे भविष्य

शनी वक्री ते मंगळ गोचर, मे महिन्यात बनले चार महाराजयोग! कोणाला धनलाभ, कोणाला कष्ट? पाहा १२ राशींचे भविष्य

शनी- गुरूच्या ग्रह गोचारांसह एप्रिल २०२३ चा महिना आता संपत आला आहे. वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार येणाऱ्या मे महिन्यातील ३१ दिवसात सुद्धा शुक्र, बुध, सूर्य व मंगळ असे मोठे गोचर होणार आहेत, मे महिन्याच्या सुरुवातीला शुक्र वृषभ राशीतून निघून बुध ग्रहाच्या मिथुन राशीत प्रवेश घेणार आहे. यामुळे मिथुन राशीत मंगळ व शुक्र युती तयार होत आहे. १० मे ला पुन्हा मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर सूर्य सुद्धा या महिन्यात वृषभ राशीत स्थिर असणार आहेत, मंगळ कर्क राशीत येताच काही दिवसांनी उदित होऊन पुढील गोचरासाठी त्वरित मार्गी होणार आहे. यानुसार, मेष ते मीन या १२ राशींच्या भविष्यात नेमके काय बदल घडून येऊ शकतात याविषयी ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांचे मार्गदर्शन जाणून घेऊया…

मेष रास (Aries Zodiac)
रवी आपल्या मेष राशीत उच्च स्थितीत आहे. परंतु रावीसह राहू आणि हर्षलदेखील असल्याने कोणताही निर्णय घेताना दोन वेळा विचार करावा. नीच राशीचा मंगळ चतुर्थात आहे. मानसिक स्थिती दोलायमान होईल. शुक्र शनीच्या शुभ योगामुळे कामानिमित्त प्रवास कराल. कामातील नव्या संकल्पना राबवण्यापूर्वी मार्केट संशोधन उपयोगी ठरेल. विवाहोत्सुक मुलामुलींनी वधू-वर संशोधन मनावर घ्यावे. योग्य जोडीदाराची निवड करण्यास चांगले ग्रहबल मिळेल. रक्तदाब सांभाळावा. उष्माघातामुळे चक्कर येणे, ग्लानी येणे संभवते.

वृषभ रास (Taurus Zodiac)
व्यय स्थानातील मेष राशीत राहू हर्षलसह गुरू बुधाचे भ्रमण होत आहे. डोक्यात भन्नाट कल्पना थैमान घालतील. अशा विचारांना वेळीच आळा घालावा लागेल. आर्थिक नुकसान होऊ देऊ नका. प्रवास योग चांगले आहेत. द्वितीय स्थानातील मिथुन राशीतील शुक्र बुद्धीचातुर्य आणि गोड शब्दांनी प्रिय व्यक्तींचे मन जिंकेल. संतती प्राप्तीसाठी वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे ठरेल. दशमातील शनी नोकरी व्यवसायातील खाचखळग्यांची पूर्वसूचना देईल. धुळीची ऍलर्जी होण्याची शक्यता आहे.

मिथुन रास (Gemini Zodiac)
नोकरीत बदल करू इच्छित असाल तर एप्रिलनंतरच्या मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता दाट आहे. नव्या ठिकाणी इतरांवर आपल्या ज्ञानाची छाप पाडाल. कामासंबंधीत परदेशाशी निगडीत बाबी मार्गी लागतील. सध्या रवी, राहू , हर्षलसह गुरू ग्रह आहे. या कालावधीत वैवाहिक नात्यासंबंधी मनात शंका- कुशंका येण्याची शक्यता आहे. अशा वेळी एकमेकांवरील विश्वासच कामी येईल. लक्षात ठेवा, सर्वगुणसंपन्न असे कोणीच नसते. विद्यार्थ्यांचे मन विचलित करणारे ग्रहयोग आहेत. उन्हाळी सर्दी, अपचन असे त्रास उद्भवतील.

कर्क रास (Cancer Zodiac)
परिस्थितीला धीराने सामोरे जाल. भावनावश न होता व्यावहारिक दृष्टीने प्रश्न सोडवावे लागतील. सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील अशी अपेक्षा ठेऊ नका. नोकरी व्यवसायात कसोटीची वेळ येईल. विद्यार्थी वर्गाने स्पर्धात्मक परीक्षेसाठी मनापासून अभ्यास करावा. लाभ स्थानातील रवीचे भ्रमण मानसन्मान देईल. आर्थिक स्थिती सुधारेल. आत्मविश्वास बळावल्याने नव्याने आव्हान स्वीकाराल. जोडीदाराची साथ सोबत चांगली मिळेल. संतती प्राप्तीसाठी सबुरीने घ्यावे. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा.

सिंह रास (Leo Zodiac)
लाभ स्थानातील शुक्र आणि व्यय स्थानातील मंगळ यांमुळे अतिरिक्त खर्च कराल. प्रवास, यात्रा ,स्नेहसंमेलने यात सहभागी व्हाल. जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक प्रश्न हळुवार सोडवावे लागतील. मुलांना धीर द्याल. त्यांचा आत्मविश्वास वाढवाल. नोकरी व्यवसायात रवी साहाय्यकारी ठरेल. संतती प्राप्तीसाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा. गुरुबल चांगले आहे. प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक नियोजन उपयोगी पडेल. ओळखीमुळे स्थावर मालमत्तेची कामे पुढे सरकतील.

कन्या रास (Virgo Zodiac)
अष्टम स्थानात पाच ग्रह एकत्र आहेत. अडीअडचणींचा सामना करता करता दमून जाल. मार्ग न सुचल्याने हतबल व्हाल. अशा परिस्थितीत दशम स्थानातील शुक्र आशेचा किरण दाखवेल. महिन्याच्या मध्यानंतर रवीची मदत मिळाल्याने हळूहळू स्थिरस्थावर व्हाल. जोडीदाराला आपल्या आधाराने उभारी द्यावी लागेल. मुलांना शिस्तीचा बडगा दाखवाल. विवाहोत्सुक मंडळींनी गुरुबल कमजोर असल्याने धीराने घ्यावे. नोकरी बदलू नका. आहे त्या परिस्थितीत संयमाने राहावे. उन्हाळी सर्दी आणि अपचनाचा त्रास भेडसावेल.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)
षष्ठ स्थानात पाच ग्रह एकत्र आले आहेत. रवी, राहू, हर्षल, बुध आणि गुरू यामुळे आत्मविश्वास डळमळीत होईल. भाग्यातील मंगळ नीच असला तरी बुडत्याला काठीचा आधार नक्कीच देईल. नोकरी व्यवसायात अडीअडचणींचा सामना करत पुढे जावे लागेल. विद्यार्थी वर्गाने सावध राहावे. उच्च शिक्षणाची तयारी जोरदारपणे करता येईल. जोडीदाराच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल. विवाहोत्सुक मंडळींनी धीराने घ्यावे. मध्यम गुरुबल आहे. आजाराचे निदान होणे, योग्य उपचार मिळणे यात विलंब होईल.

धनु रास (Sagittarius Zodiac)
विवाहीत दाम्पत्यांना एकमेकांसाठी वेळ देता येईल. रुसवे फुगवे दूर होतील. विद्यार्थी वर्गाच्या उच्च शिक्षणासाठी ग्रहमान अनुकूल आहेत. मेहनतीचे फळ मिळेल. नोकरी व्यवसायात मानसन्मान आणि धनसंपत्ती मिळेल. गुंतवणूकदारांना महिन्याच्या मध्यानंतर चांगला परतावा मिळेल. पण मोठी जोखीम स्वीकारू नका. कौटुंबिक समस्या सोडवताना वडीलधाऱ्या मंडळींची मदत होईल. विवाहोत्सुक मंडळींच्या शुभ वार्ता समजातील. मनाविरुद्ध घटनांचा डोक्यात राग घालून घेणे योग्य नाही.

मकर रास (Capricorn Zodiac)
21 एप्रिलला गुरूने चतुर्थातील मेष राशीत प्रवेश केला आहे. सध्या गुरू, राहू, हर्षल, रवी आणि बुध अशी पंचग्रही मेषेत आहे. मानसिक संतुलन साधणे कठीण जाईल. तोल जाऊ देऊ नका. आतापर्यंतचा संयम तसाच ठेवणे महत्वाचे आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी देखील आपल्या शब्दाने घोळ वाढू शकतो. विद्यार्थी वर्गाला मेहनातीसह चिकटीची देखील गरज भासेल. षष्ठातील शुक्र आर्थिक स्थिती सुधारेल. भरपूर धनसंपत्ती मिळेल.

कुंभ रास (Aquarius Zodiac)
२१ एप्रिलला झालेला गुरूचा राशी बदल आपल्यासाठी अतिशय लाभकारक आहे. परदेशाशीसंबंधित कामांना गती मिळेल. अर्थात तसे प्रयत्न देखील व्हायला हवेत. कला, क्रीडा आणि बौद्धिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवाल. नोकरीतील कामकाज धिम्या गतीने पुढे सरकेल. व्यावसायिकांचा वेग मात्र चांगला असेल. आर्थिक उन्नती करणारे ग्रहयोग आहेत. पित्त आणि डोकेदुखीचा त्रास आटोक्यात ठेवावा. अन्यथा दुखणे वाढेल.

मीन रास (Pisces Zodiac)
द्वितीय स्थानातील पंचग्रहीमुळे कामाचा वेग कमी- अधिक होण्याची दाट शक्यता आहे. प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवा. तत्कालीन लाभापेक्षा कायमस्वरूपी लाभ महत्वाचा असणार आहे, हे ध्यानात असू द्यावे नोकरीतील कामात अडथळे येतील. व्यवसायात नवी झेप घेताना विशेष काळजी घ्यावी. जोडीदाराला समजून घेणे आवश्यक! विवाहोत्सुक मंडळींनी जरा धीराने घ्यावे. संतान प्राप्तीसाठीचे प्रयत्न लांबणीवर पडतील.

Team BM