आज आहे सोन्याचा दिवस… काही राशींना होऊ शकतो फायदा, तर काही..

आज आहे सोन्याचा दिवस… काही राशींना होऊ शकतो फायदा, तर काही..

आज चंद्र दिवसभर कन्या राशीत असेल. पंचांग गणना नुसार आज कार्तिक महिन्यातील एकादशी आहे. आज उत्तरा हस्त नक्षत्र आहे. अशात आज भगवान विष्णुची पूजा केल्याने शुभ लाभ होऊ शकतो. आयुष्मान योग असल्याने मोठ्यांचा आशिर्वाद घेणे लाभदायक सिद्ध होईल. आजचा दिवस इतर राशींसाठी कसा असेल जाणून घ्या.

मेष- चंद्र आज तुमच्या सहाव्या स्थानी असल्याने शत्रूपासून सावध राहावे लागेल. काही लोकांच्या कार्यक्षेत्रात बदल घडून येईल. पोटाच्या खालच्या भागाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. अनोळखी व्यक्तीकडून लाभ होऊ शकतो. आज ६२% नशिबाची साथ आहे. गायत्री मंत्राचा जप करा.

वृषभ- चंद्र आज पाचव्या स्थानी असल्याने प्रेम संबंध प्रगल्भ होतील. जे विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी दिवस चांगला असेल. मुलांच्या बाजूने असलेल्या समस्येचे निवारण होईल. या राशीची लोकांना सामाजिक स्तरावर चांगले परिणाम दिसून येतील. आज ८२% नशिबाची साथ आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप करा.

मिथुन- आज चंद्र चौथ्या स्थानी असल्याने तुम्ही कुटुंबासह वेळ घालवू शकाल. आईच्या तब्येतीत सुधारणा होताना दिसेल. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. या राशीची कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या लोकांना चांगले परिणाम मिळाल्याने दिलासा मिळेल. जो काही निर्णय होईल तो तुमच्या बाजूने असेल. आज ८६% नशिबाची साथ आहे. गरजूंना त्यांच्या आवडीच्या वस्तू दान करा.

कर्क- आज तुमच्या साहस व पराक्रमात वाढ होईल कारण चंद्र तुमच्या तिसर्‍या स्थानी असेल. तो तुमच्या उर्जेत भर घालेल. कौटुंबिक जीवनात बहीण-भावाशी असलेले संबंध सुधारतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीचा फायदा मिळेल. विनाकारण असलेल्या चिंता दूर होतील. आज ८०% नशिबाची साथ आहे. विरुद्ध लिंग असलेल्या व्यक्तींपासून सावध राहा.

सिंह- तुमच्या बोलण्यात आकर्षकता असेल. तुम्ही तुमच्या बोलण्याने सामाजिक स्तरावर चांगले फळ मिळवू शकता. पितृ संपत्तीमध्ये वाढ होईल. आई- वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्याची योजना सफल होईल. विदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी आपल्या गुरुवर चांगली छाप पाडतील. आज ८५% नशिबाची साथ आहे. सूर्य देवाची उपासना करावी.

कन्या- आज तुम्ही तुमच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नात यशस्वी व्हाल. पूर्वी केलेल्या दुष्कर्माचा पश्चाताप होऊन तुम्ही त्यांची माफी मागाल. त्यामुळे मनावरील भार हलका होईल. चंद्र पाहिल्या स्थानी असल्याने तुम्हालाआत्मिक शांतता मिळू शकते. आज ८८% नशिबाची साथ आहे. गणपतीची पूजा करा.

तूळ- चंद्र आज बाराव्या स्थानी असल्याने कारण नसताना होणार्‍या खर्चावर आवर घालणे गरजेचे आहे. एखाद्याला पैसे उधार देताना विचार करा. विदेशी व्यावसायिक किंवा विदेशी कंपनीत काम करणार्‍या लोकांसाठी आजचा दिवस फायद्याचा असेल. आज ८२% नशिबाची साथ आहे. आई- वडिलांचा आशिर्वाद घेऊन बाहेर पडा.

वृश्चिक- चंद्र अकराव्या स्थानी असल्याने बुद्धीचा योग्य वापर करून नोकरी- व्यवसायात यश मिळवू शकता. जे आपल्या भाऊ- बहिणी सोबत व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी हा दिवस चांगला असेल. गैरफायदा घेणार्‍या लोकांपासून सावध राहा. आज ८७% नशिबाची साथ आहे. हनुमान चालीसाचा पाठ करा.

धनू- चंद्र तुमच्या दहाव्या स्थानी असल्याने करियर मध्ये गरजेपेक्षा जास्त सक्रिय असाल. त्याचा तुम्हाला लाभ होईल. वरिष्ठ लोकं तुमच्या कामाची तारीफ करू शकतात. वडिलांसोबत असलेले मतभेद दूर होतील. आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात यश मिळेल. आज ९०% नशिबाची साथ आहे. भगवान विष्णूची पूजा करा.

मकर- धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात आवड वाढेल. काही लोकं कुटुंबासोबत धार्मिक स्थळी फिरायला जाऊ शकतात. उच्च शिक्षण घ्यायची इच्छा असूनही अजूनपर्यंत काहीही न करू शकणारी लोकं याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकतात. येणाऱ्या पुढील काळात त्याचा फायदा होईल. आज ८२% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा.

कुंभ- आज आठव्या स्थानी चंद्र असल्याने अचानक धनलाभाची संधी निर्माण होऊ शकते. जे आजारांनी ग्रस्त आहेत त्यांनी काळजी घेतली पाहिजे. मन मोकळे करा नाहीतर तणाव निर्माण होऊ शकतो. आज ६६% नशिबाची साथ आहे. शनि देवाच्या बीजमंत्राचा जप करा.

मीन- आज चंद्र तुमच्या सातव्या स्थानी असल्याने वैवाहिक जीवनात सुखद फळ मिळेल. वडिलांच्या सहाय्याने करियरमध्ये येणाऱ्या समस्या शोधण्याचा प्रयत्न काही लोकं करतील. भागीदारी मध्ये व्यवसाय करणाऱ्यांना दिवस चांगला जाईल. आज ७८% नशिबाची साथ आहे. राम नामाचा जप करा.

Team Beauty Of Maharashtra