सूर्याचं धनु राशीत भ्रमण, ‘या’ राशींना होणार फायदा; वाचा सविस्तर

सूर्याचं धनु राशीत भ्रमण, ‘या’ राशींना होणार फायदा; वाचा सविस्तर

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीचा प्रत्येक राशीवर परिणाम होत असतो. सूर्य हा ग्रह 16 डिसेंबर 2022 रोजी, शुक्रवारी सकाळी 09:38 वाजता धनु राशीत भ्रमण करणार आहे. धनु राशीत सूर्याचे भ्रमण झाल्यावर याचा सर्व राशींवर काही ना काही प्रभाव नक्कीच पडेल. काही राशींवर याचा शुभ प्रभाव असेल तर काही राशींवर अशुभ परिणाम होण्याची शक्यता असते. यामधील काही राशींसाठी सुर्याचं भ्रमण फायदेशीर ठरणार आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक समृद्धी मिळण्याची शक्यता आहे.

मेष- मेष राशीत सूर्य हा पाचव्या घराचा स्वामी असून नवव्या घरात भ्रमण करत आहे. हे धर्म, लांबचा प्रवास, तीर्थयात्रा आणि भाग्याचं घर आहे. धनु राशीतील सूर्याचे भ्रमण मेष राशीच्या लोकांसाठी खूप चांगलं ठरणार आहे. नशीब तुम्हाला साथ देईल. भारतात किंवा परदेशात उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल. तुमच्या सप्तमातील स्वामी शुक्रासोबत सूर्याचे हे भ्रमण फलदायी ठरणार असून अतिशय शुभ योग निर्माण करत आहे. या काळात तुमचा कल धार्मिकतेकडे असेल आणि तुम्ही कोणत्याही धार्मिक पुस्तकातून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला वडिलांचे सहकार्य मिळेल. पण तुम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण यावेळी काही आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

कर्क- कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य दुसऱ्या घरात भ्रमण करेल आणि सहाव्या घरात प्रवेश करेल. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी सहाव्या घरात सूर्याचे भ्रमण शुभ मानले जाते. तुम्ही कोणत्याही वादातून किंवा कायदेशीर प्रकरणातून जात असाल तर अनुकूल परिणामांसाठी हा काळ चांगला आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत आणि निकालाची वाट पाहत आहेत त्यांना धनु राशीत सूर्याच्या भ्रमण काळात चांगली बातमी मिळेल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला याचा तुम्हाला फायदा होईल.

सिंह- सूर्य सिंह राशीच्या राशी स्वामी असून पाचव्या घरात भ्रमण करत आहे. पाचवे घर शिक्षण, प्रेम आणि संतान प्राप्तीचं आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला आहे. उच्च शिक्षण घ्यायची इच्छा असणाऱ्यांना पुढील दिशा मिळेल. सर्व गोंधळ दूर होईल आणि तुम्ही तुमचे ध्येय अधिक स्पष्ट होईल. या दरम्यान तुम्हाला तुमच्या मागील वर्षात केलेल्या कर्माचे सकारात्मक परिणाम मिळतील. धनु राशीतील सूर्याचे भ्रमणावेळी तुम्हाला तुमच्या मुलांच्या सहवासाचा लाभेल. यासोबतच योग सारख्या काही आध्यात्मिक आणि शारीरिक क्रियामध्ये वेळ घालवू शकता.

Team BM