ग्रह, नक्षत्रांच्या तसेच शनीच्या दृष्टीचा या राशीच्या जीवनावर पडेल प्रभाव, होऊ शकतो धनलाभ…

ग्रह, नक्षत्रांच्या तसेच शनीच्या दृष्टीचा या राशीच्या जीवनावर पडेल प्रभाव, होऊ शकतो धनलाभ…

आज चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीत राहील. येथे शनीची चंद्रावर थेट दृष्टी असेल. परंतु बलवान चंद्रामुळे अनेक राशीसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. तर शनीच्या दृष्टीमुळे अनेकांच्या जीवनात गोंधळाची स्थिती निर्माण होईल. या दिवशी गुरुपुष्यामृत योग असून सकाळी ७.५५ नंतर ब्रह्मयोग सुरू होईल, हा योग आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. आज गुरुवार आहे, त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूची तसेच दत्तांची पूजा केल्याने आणि स्वामी समर्थांची सेवा केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात. अशा स्थितीत सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा जाईल हे जाणून घेऊया.

मेष- मेष राशीचे लोक आज कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधू शकतात. काहींना या दिवशी आईच्या बाजूच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या चतुर्थ स्थानी सौम्य ग्रह चंद्र असल्यामुळे मेष राशीच्या लोकांनाही आईचे प्रेम मिळेल. या राशीच्या विवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे.

वृषभ- जर काही कारणाने मानसिक तणाव असेल तर या दिवशी तुम्हाला मित्राकडून त्या समस्येवर उपाय मिळू शकतो. जोखीम आणि धाडसी काम करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला जाईल. भावंडांच्या मदतीने कौटुंबिक जीवनात संतुलन राहील. काही लोक लहान भावंडांसोबत कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करू शकतात. आज ६७% नशिबाची साथ आहे. संतोषी देवीची उपासना केल्यास लाभ होईल.

मिथुन- चंद्र आज तुमच्या आर्थिक क्षेत्रात सुधारणा घडवून आणू शकतो. नोकरी व्यवसायाशी संबंधित मिथुन राशीच्या लोकांना या दिवशी वडिलांच्या सल्ल्याने फायदा होऊ शकतो. या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही मीडिया, फॅशन इंडस्ट्री किंवा कला क्षेत्रात काम करत असाल तर आज तुमच्या कामाला नवी ओळख मिळू शकते. आज ८४% नशिबाची साथ आहे. गणपतीला लाडू अर्पण करा.

कर्क- आज करिअर क्षेत्रात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यास त्यात सुधारणा होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या समजूतदार बोलण्याने सर्वांची मने जिंकू शकता. वैवाहिक जीवनातही या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात, जोडीदाराच्या तब्येतीत बिघाड झाला असेल तर त्यातही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. आज तुम्ही आईसोबत कोणतीही महत्त्वाची गोष्ट शेअर करू शकता. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाचा जलाभिषेक करावा.

सिंह:- तुमच्या बाराव्या भावात चंद्र असल्यामुळे या दिवशी अचानक तुम्हाला एखाद्या गोष्टीवर खर्च करावा लागू शकतो. घरातील मौल्यवान वस्तू खराब होऊ शकतात. जे लोक आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस आनंददायी असू शकतो. आज तुम्ही ध्यानाच्या गुढतेला स्पर्श करू शकता. या राशीच्या काही लोकांना या दिवशी जुन्या मित्राची भेट होऊ शकते. आज ६२% नशिबाची साथ आहे. सूर्यदेवाची उपासना करा.

कन्या- पूर्वी एखाद्याला मोठी रकम उधार दिली असेल जर तुम्हाला आज परत मिळू शकते. त्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. या राशीचे काही लोक या दिवशी आपला व्यवसाय सुरू करू शकतात. त्याचबरोबर जे आधीच व्यवसाय करतात त्यांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांना या दिवशी त्यांच्या मोठ्या भावा-बहिणींकडूनही लाभ मिळू शकतो. आज ९०% नशिबाची साथ आहे. बुधाच्या ‘ओम ब्रम् ब्रम् ब्रुं सह बुधाय नमः’ या बीज मंत्राचा जप करा.

तूळ- या दिवशी तुम्हाला कार्यक्षेत्रात शुभ परिणाम मिळू शकतात. सहकाऱ्याकडून लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. जर तुम्ही कामाशी संबंधित प्रवासावर असाल तर तुम्हाला या प्रवासाचा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही तुमच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळलात तर या दिवशी तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. काही लोकांना या दिवशी नवीन नोकरी देखील मिळू शकते. आज ७५% नशिबाची साथ आहे. देवी लक्ष्मीची पूजा करा.

वृश्चिक- आज वृश्चिक राशीच्या लोकांना धर्मादाय कार्य करून समाधान वाटू शकतो. या राशीचे लोक या दिवशी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीलाही भेटू शकतात. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाने तुम्ही सामाजिक स्तरावरही तुमचा ठसा उमटवू शकता. या राशीचे लोक योग ध्यानाद्वारे त्यांचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आज ८८% नशिबाची साथ आहे. शिवाला बेलची पाने अर्पण करा.

धनू- आज चंद्र आठव्या स्थानी असेल, त्यामुळे आरोग्याबाबत सावध राहिले पाहिजे. जर तुम्ही स्ट्रीट फूड खाणे टाळले तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. तथापि, ज्योतिष, विज्ञान यासारख्या गूढ विषयांचा अभ्यास करणाऱ्या या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ ठरू शकतो. आज ६५% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा.

मकर- आज जीवनसाथीसोबत बराच वेळ घालवू शकता. जुन्या गोष्टी आठवून आज तुमच्या चेहऱ्यावर हसू येऊ शकते. ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे, त्यांच्या आयुष्यात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना संततीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज ८४% नशिबाची साथ आहे. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.

कुंभ- चंद्र आज तुमच्या सहाव्या स्थानी असणार आहे, त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या आईच्या बाजूच्या लोकांना भेटू शकता. नोकरी शोधणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे, ऑफिसमध्ये राजकारण करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. तुम्ही दुचाकी चालवत असाल तर अत्यंत सावधगिरी बाळगा आणि वाहतूक नियमांचे पालन करा, अन्यथा तुम्ही बिकट परिस्थितीत अडकू शकता. आज ६५% नशिबाची साथ आहे. माता दुर्गेची पूजा करा.

मीन- मीन राशीचे जे लोकं प्रेमात आहेत अशांना लव्हमेटकडून एक सुंदर भेट मिळू शकते. तुमचा लव्हमेट तुमच्यासाठी परफेक्ट पार्टनर आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या दिवशी त्यांना लग्नासाठी प्रपोज करू शकता. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील दिवस आनंददायी असेल, तुम्हाला तुमच्या दिवशी शिक्षकांकडून चांगला सल्ला मिळू शकेल. आज ८६% नशिबाची साथ आहे. लक्ष्मी गणेशाची पूजा करावी.

Team Beauty Of Maharashtra