आज आहे कार्तिक पौर्णिमा आणि चंद्रग्रहण.. दरम्यान आजचा तुमचा दिवस कसा जाईल पाहा

आज आहे कार्तिक पौर्णिमा आणि चंद्रग्रहण.. दरम्यान आजचा तुमचा दिवस कसा जाईल पाहा

आज १९ नोव्हेंबर गुरुवारी, चंद्र सकाळी मेष राशीतून वृषभ राशीत संचार करेल. आज कार्तिक पौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. यासोबतच आज चंद्रग्रहणही आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दानधर्म केल्यास शुभ फळ मिळते. चंद्रग्रहण असल्यामुळे या दिवशी योग आणि ध्यान करणे सर्व लोकांसाठी चांगले राहील. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे ध्यान जीवनात सुख आणि शांती घेऊन येऊ शकते. कार्तिक पौर्णिमेच्या शुभ दिवशी असलेल्या चंद्रग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर कसा राहील, जाणून घ्या…

मेष- चंद्र देव आज द्वितीय स्थानी असेल म्हणून तुम्हाला पैशांशी संबंधित व्यवहारामध्ये जागरूक रहा. या राशीचे लोक कुटुंबातील सदस्यासोबत व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात आणि आज त्याबद्दल चर्चा करू शकतात. बोलण्यातही गोडवा असेल, ज्यामुळे तुम्हाला सामाजिक स्तरावरही चांगले परिणाम मिळतील.
आज ७५% नशिबाची साथ आहे. हनुमान चालिसाचे पठण करा.

वृषभ- आरोग्याबाबत ज्या काही चिंता असतील त्या आज दूर होतील. चंद्रग्रहणामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. थंड पदार्थ खाणे टाळा, अन्यथा तुम्हाला घशाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. या राशीच्या ज्या लोकांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे त्यांना घरातील लहान सदस्याकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांची आज दूरच्या नातेवाईकाशी भेट होऊ शकते. आज ८०% नशिबाची साथ आहे. शनिदेवाचा मंत्र ‘ओम शं शनीश्चराय नमः’ चा जप करा.

मिथुन- आज जर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरजूंना आवश्यक गोष्टी दान करू शकलात तर फायदेशीर होईल. बाराव्या घरातील चंद्र आध्यात्मिक कार्यात तुमची आवड निर्माण करू शकतो. मात्र, या राशीच्या लोकांना आज अनावश्यक खर्च टाळावा लागेल, अन्यथा बजेट बिघडू शकते. आज ७०% नशिबाची साथ आहे. भगवान विष्णूची पूजा करा.

कर्क : आज तुमच्या लाभाच्या स्थानी चंद्र विराजमान असेल, त्यामुळे पूर्वी केलेली गुंतवणूक या दिवशी तुम्हाला लाभ देऊ शकते. आज तुमच्यामध्ये व्यवस्थापनाची क्षमता दिसून येईल, जर तुम्ही उच्च पदावर असाल तर आज तुम्ही तुमच्या टीममधील सदस्यांना प्रेरणादायी भाषण देऊ शकता. या राशीच्या व्यावसायिकांना मित्राच्या मदतीने व्यवसायात फायदा होऊ शकतो. आज ९०% नशिबाची साथ आहे.. चंद्र देवाच्या ‘ॐ श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः’ या बीज मंत्राचा जप करा.

सिंह- या राशीच्या लोकांना आज करिअर क्षेत्रात अपेक्षित यश मिळू शकते, या राशीच्या बेरोजगार लोकांना या दिवशी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या दिवशी या राशीचे लोक त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करतील, ज्यामुळे करिअर क्षेत्रात येणाऱ्या अनेक अडचणी दूर होऊ शकतात. दहाव्या घरात चंद्र असल्यामुळे या राशीच्या लोकांना आज ऑफिसमध्ये चांगले अनुभव येऊ शकतात. आज ८५% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा.

कन्या- कन्या राशीच्या लोकांना आज सर्वांपासून दूर एकांतात वेळ घालवायला आवडेल. या लोकांची आज धार्मिक गुरुची भेट होऊ शकते. तसेच त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल, खूप दिवसांपासून रखडलेले काम या दिवशी पूर्ण होऊ शकते. मात्र, चंद्रग्रहण काळात तुम्ही थोडे सावध राहावे. आज ९०% नशिबाची साथ आहे. भगवान शिवाची आराधना करा.

तूळ- तूळ राशीच्या लोकांनी आज बोलण्यावर संयम ठेवला पाहिजे. आठव्या स्थानातील चंद्र तुम्हाला अनावश्यक काळजी देऊ शकतो, त्यामुळे तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा दिसून येईल. तूळ राशीच्या लोकांनी या दिवशी ध्यान केल्यास मनाची चंचलता कमी होऊन जीवनात संतुलन येईल. आज ६५% नशिबाची साथ आहे. गणेशाची आराधना करा.

वृश्चिक- आज तुमच्या वैवाहिक जीवनात चांगले बदल होऊ शकतात. जर तुम्ही जोडीदारासोबत व्यवसाय करत असाल तर आज फायदा होण्याची शक्यता आहे. या राशीचे काही लोक या दिवशी जोडीदारासोबत भविष्यातील योजना बनवताना दिसतील. ज्यांना आपल्या लव्हमेटशी लग्न करायचे होते ते त्यांच्याशी याबद्दल बोलताना आढळतील. आज ७०% नशिबाची साथ आहे. मंगळाच्या ‘ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः’ या बीज मंत्राचा जप करा.

धनू- धनु राशीच्या लोकांना या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि सामाजिक जीवनात सावध राहावे लागेल कारण जे लोक तुमच्याशी स्पर्धा करतात ते आज तुमच्या विरोधात कट रचू शकतात. या दिवशी नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून दूर राहिल्यास चांगले होईल. धनु राशीच्या लोकांनीही आरोग्याबाबत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आज ६५% नशिबाची साथ आहे. गुरूच्या ‘ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरुवे नमः’ या बीज मंत्राचा जप करा.

मकर- या दिवशी तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात, मन एकाग्र ठेवण्यासाठी या राशीचे लोक ज्या विषयात त्यांची पकड चांगली आहे त्या विषयांचा अभ्यास करताना दिसतील. प्रेमात असलेल्या या राशीच्या लोकांनी प्रियकराशी बोलताना भूतकाळाचा उल्लेख करू नये, अन्यथा वादविवाद होऊ शकतात.
आज ७६% नशिबाची साथ आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप करा.

कुंभ- चंद्र तुमच्या चौथ्या स्थानी असेल, त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. वाहन चालवतानाही काळजी घ्या. या राशीचे लोक जे प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत आहेत ते या दिवशी घरातील लोकांशी याबद्दल बोलू शकतात आणि घरातील लोक सहमत होण्याची शक्यता आहे.
आज ७५% नशिबाची साथ आहे. दुर्गामातेच्या मंत्रांचा जप करा.

मीन- तुमच्‍या राशीच्‍या तिसर्‍या घरात चंद्र असल्याने या दिवशी तुम्‍हाला सामान्य फळ मिळेल. या दिवशी कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे टाळावे. जर तुम्ही पैसे गुंतवणार असाल तर अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानेच पुढे जा. लहान भावंडांशी चांगले वागा, अन्यथा त्यांच्यात भांडण होऊ शकते. आज ६६% नशिबाची साथ आहे. आज एकाक्षरी मंत्राचा जप करा.

Team Beauty Of Maharashtra