वृषभ, कर्कसह ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार मित्रांची भक्कम साथ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य…

वृषभ, कर्कसह ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार मित्रांची भक्कम साथ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य…

आज चंद्र तूळ राशीत असून, चित्रा नक्षत्र आहे. सूर्य मिथुन राशीत, तर गुर मीन राशीत आहे. शनी कुंभ राशीत आहे. मेष राशीच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष आनंद देणारा असेल. वृषभ राशीच्या लोकांच्या कामाचे विशेष कौतुक केले जाईल. जाणून  घ्या आजचे संपूर्ण राशीभविष्य…

मेष- सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष आनंद देणारा असेल. व्यवसायात लाभ होईल. जवळचा प्रवास करावा लागेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. लाभ मिळेल, परंतु अधिक मेहनतही घ्यावी लागेल. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फार चांगला जाणार आहे. राजकीय क्षेत्रात सक्रिय असणारे लोक आपल्या नव्या कामाला सुरुवात करू शकतात.

वृषभ- आज वडिलधाऱ्यांकडून मोलाचा सल्ला मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे विशेष कौतुक केले जाईल. भागीदारीच्या व्यवसायात विशेष लक्ष द्यावे लागेल, तरच योग्य तो लाभ मिळेल. व्यापारांना आज भरगोस आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. मित्राची साथ लाभेल. एखाद्याला उधार दिलेले किंवा अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे.

मिथुन- व्यवसायात नवीन संबंध प्रस्थापित होतील, ज्याचा भविष्यात फायदा होईल. नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल, तर काळजीपूर्वक निर्णय घ्या. मनाला आवडणारे काम करण्याचे संधी मिळेल. नव्या योजनांमध्ये अधिकाऱ्यांची मदत मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून अधिकची जबाबदारी तुमच्या खांद्यावर टाकली जाऊ शकते. विद्यार्थ्यांना कठोर मेहनत करावी लागले.

कर्क – कामाच्या ठिकाणी तुमच्या विचारांचा प्रभाव दिसेल. मात्र, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी आपल्या आजूबाजूच्या लोकापासून सावध राहावे. अर्धवट राहिलेली कामे आजच पूर्ण करा, अन्यथा नंतर त्याचा त्रास होऊ शकतो. पैसे जपून खर्च करा. आर्थिक समस्यांमुळे त्रस्त व्हाल. मित्रांची साथ मिळेल. संयम बाळगा. दूरच्या प्रवास घडण्याची शक्यता आहे. आपला पैसा कुठे कुठे अडकला आहे, याचा नीट विचार करा.

सिंह – कामासोबतच त्याच्या गुणवत्तेवर देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून आपल्या कुटुंबाला देण्याचा प्रयत्न करा. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नोकरीत बढती होऊन, नवीन पद मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही व्यवसायिक योजना आज टाळू नका. स्वतःच्या मर्जीने, अभ्यासपूर्वक एखाद्या ठिकाणी पैसा गुंतवा.

कन्या-  आज तुम्हाला तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात संयम बाळगावा लागेल. नोकरदार वर्गाचे अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. या वादाचा परिणाम तुमच्या कामावर आणि प्रमोशनवर देखील होऊ शकतो. मेहनत करा आणि नशिबावर विश्वास ठेवा. कुटुंबात मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. नोकरीत विशेष कौतुक होऊ शकते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. वडिलधाऱ्यांकडून आर्थिक लाभ होईल.

तूळ – आज तुमच्या व्यवसायात भरभराट होणार आहे. मात्र, अधिक मेहनतही करावी लागणार आहे. चिंता करू नका, यात तुम्हाला तुमच्या मित्रांची साथ लाभणार आहे. नकारात्मक विचारांचा प्रभाव दिसून येईल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. व्यवसाय विस्तारात अधिकच पैसा खर्च होऊ शकतो. नोकरदार वर्गाला आज प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही समस्या असल्यास घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

वृश्चिक- कोणतेही काम करताना त्याचे मुल्यांकनही करा. यामुळे तुम्हाला त्यातील त्रुटी काळातील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय लाभदायी असणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात यश मिळणार आहे. कौटुंबिक कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करा. एखादी समस्या असल्यास, त्यावर मित्रांचा सल्ला घ्या. धार्मिक कार्यात रुची वाढेल. एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करा, ज्यामुळे मनाला आनंद मिळेल.

धनु- आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदमय असणार आहे. अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. याचा तुम्हाला प्रत्येक पावलावर फायदा होईल. प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणेही अतिशय महत्त्वाचे आहे. मालमत्तेशी संबंधित एखादे प्रकरण निकाली लागण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायातही नवीन संबंध प्रस्थापित होऊन, यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मसंयम बाळगा.

मकर – व्यवसायात एखादा निर्णय घेण्यापूर्वी द्विधा मनस्थिती असेल.घरातील रोजची कामे लवकर आवरल्याने तुम्हाला स्वतःसाठी मोकळा वेळ मिळेल. मुलांच्या बाबतीत एखादा निर्णय घेताना जोडीदाराचा विचार लक्षात घ्या. आज तुम्ही हातातील सगळी कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नोकरदार वर्गाने अधिकाऱ्यांशी संबंध चांगले ठेवावेत. अतिराग करणे टाळा. आज नोकरीत बदल होण्याची देखील शक्यता आहे.

कुंभ -मनातील नकारात्मक विचारांना दूर करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत एखादी नको असलेली जबाबदारी मिळू शकते. आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. घरात एखाद्या मनाला कार्याचे आयोजन केले जाऊ शकते. अनावश्यक वादविवाद टाळा. अधिकच पैसा खर्च होईल. त्यामुळे मन चिंतेत राहील. व्यवसायात काहीसा तोटा सहन करावा लागू शकतो. भविष्यासाठी काही योजना बनवणे लाभदायी ठरणार आहे.

मीन- तुमची नेहमी एकत्र आणि मिळून मिसळून काम करण्याची कल्पना फायदेशीर असल्याचे सिद्ध होणार आहे. कुटुंबातील सलोखा टिकवून ठेवा. आरोग्यविषयक समस्या जाणवू शकतात. त्यामुळे तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. कोणतीही गोष्ट खरेदी करण्यापूर्वी त्याची नीट माहिती घ्या. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. सुरु असलेल्या व्यवसायात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

Team Beauty Of Maharashtra