‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील अश्विनीने मालिका का सोडली?, अभिनेत्रीच्या आयुष्यात घडला धक्कादायक अनुभव

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील अश्विनीने मालिका का सोडली?, अभिनेत्रीच्या आयुष्यात घडला धक्कादायक अनुभव

रंग माझा वेगळा ही मालिका अतिशय जबरदस्तरित्या चालताना दिसत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळत आहेत. या मालिकेमध्ये हर्षदा खानविलकर, आशुतोष गोखले, रेश्मा शिंदे यासारखे कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत.

याशिवाय या मालिकेमध्ये आपल्याला विदिशा म्हसकर, सायशा भोईर, अनघा भगरे, अभिज्ञा भावे, स्पृहा दळी, निखिल राजेशिर्के, ऋतुजा देशमुख यासारखे कलाकार पाहायला मिळत आहेत. आशुतोष गोखले हा प्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांचा मुलगा आहे. त्याने अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे.

या मालिकेमध्ये रेश्मा शिंदे हिने देखील अतिशय जबरदस्त काम केले आहे. हर्षदा खानविलकर आपल्या रुबाबदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत, तर आता ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनल्याने देखील दिसताहेत. ही मालिका सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत, असे असले तरी या मालिकेमध्ये दीपा दीपिका यांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडताना दिसत आहेत.

या मालिकेमध्ये अश्विनीची भूमिका देखील लोकप्रिय झालेली आहे. या मालिकेमध्ये दीपा ची मैत्रीण अश्विनी ही भूमिका देखील लोकप्रिय झाली आहे. अश्विनी ही भूमिका वैशाली भोसले हिने सातारला आहे. वैशाली भोसले आपल्याला अनेक मालिका चित्रपटात दिसली आहे. तसेच तिने काही जाहिरातींमध्ये देखील काम केलेले आहे.

या मालिकेचे चित्रीकरण सुरू असतानाच वैशाली ही गरोदर राहिली होती. गरोदर आल्यामुळे तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने पूर्णतः आराम केला. मात्र, असे असतानाही तिचे बाळ हे राहू शकले नाही आणि तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला.

या धक्क्यातून सावरल्यानंतर वैशालीने मन झालं बाजिंद या मालिकेमध्ये देखील काम केले होते. तिच्या या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तसेच आगामी काळामध्ये तिच्याकडे आणखीन काही मालिका आणि चित्रपट देखील असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे वैशाली भोसले ही आपल्याला आगामी काळातही अनेक मालिकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे तिने तिच्यासोबत घडलेल्या अवघड प्रसंगाला हिम्मत दिली आहे. तर आपल्याला वैशाली भोसले आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra