‘रंग माझा वेगळा’ मालिकेमध्ये छोट्या कार्तिकीच्या भूमिकेत दिसणार आता ही ‘बालकलाकार’

‘रंग माझा वेगळा’ मालिकेमध्ये छोट्या कार्तिकीच्या भूमिकेत दिसणार आता ही ‘बालकलाकार’

रंग माझा वेगळा ही मालिका अनेक जण पाहत असतात. कलर्स मराठी वर ही मालिका सध्या जोरात सुरू आहे. या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर या दिसतात. हर्षदा खानविलकर यांनी अतिशय अप्रतिम काम या मालिकेत केलेले आहे. त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते. त्याचप्रमाणे या मालिकेत अभिज्ञा भावे हीदेखील दिसलेली आहे.

अभिज्ञा भावे यांचा अभिनय एकदम दर्जेदार झाला आहे. अभिज्ञा भावे ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नेहमी संपर्कात असते. चाहत्यांना ती अनेकदा आपले फोटो देखील पाठवत असते. तिच्या फोटोवर अनेक जण लाईक करत असतात. या मालिकेमध्ये आयेशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री देखील खूप प्रसिद्ध आहे.

तिची भूमिका विदिशा मस्कर हिने केलेली आहे. विदिषा ही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात नेहमी असते. ती सोशल मीडिया वरून अनेक फोटो आपले अपलोड करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून की आपले वेगवेगळे फोटो देखील शेअर करत असते.

या मालिकेमध्ये आशुतोष गोखले हा दिसला आहे. आशुतोष गोखले याने कार्तिक ही भूमिका साकारली आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्याचप्रमाणे या मालिकेमध्ये आपल्याला कार्तिकी आणि दीपिका या मुलींच्या भूमिकादेखील दिसलेल्या आहेत.

मात्र, आता यातील कार्तिकी हिने मालिका सोडली असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून या मालिकेमध्ये रोमांचकारी घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळे आता या मालिकेमध्ये नेमके पुढे काय होणार याबाबतही चर्चा रंगताना दिसत आहेत.

आशुतोष गोखले हा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये बरेच दिवसापासून कार्यरत आहे. त्याचे वडील देखील एक दिग्गज अभिनेते आहेत. त्याला घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला आहे. त्यामुळे तो मालिकांमध्ये उत्तम काम करताना दिसतो. आता या मालिकेमध्ये कार्तिकीची भूमिका साकारणारी बालकलाकार साईशा भोईर हिने ही मालिका सोडली आहे.

यावर तिनेच सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. त्यामुळे चहात्यांना साहजिकच असा प्रश्न पडला आहे की, आता तिच्या जागी कुठली बालकलाकार ही भूमिका साकारणार आहे तर आता साईशा हिच्या जागी एक नवीन बालकलाकार या मालिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे. तिचे नाव मैत्री दाते असे आहे.

मैत्री हिने देखील अनेक मालिका आणि चित्रपटात देखील छोट्या-मोठ्या भूमिका केल्या आहेत. मात्र, हा बदल आता प्रेक्षकांना कितपत रूचतो हे आपल्याला येणाऱ्या काळातच कळेल.

Team Beauty Of Maharashtra