Video: अखेर राखी सावंतचा पती आला सगळ्यांसमोर

Video: अखेर राखी सावंतचा पती आला सगळ्यांसमोर

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या बिग बॉसचे १५ वे पर्व सुरु आहे. या पर्वातील तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, शमिता शेट्टी प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहेत. अशातच बिग बॉसच्या घरात आता रश्मि देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि राखी सावंत यांची वाइल्ड कार्ड एण्ट्री होणार आहे. शोचा सूत्रसंचालक सलमान खानने रश्मि आणि देवोलीनाचे बिग बॉसच्या मंचावर स्वागत केले. आता राखी सावंत तिच्या पतीसोबत एण्ट्री करणार आहे.

‘बिग बॉस १५’चा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये राखी एका व्यक्तीशी बिग बॉसच्या घरात एण्ट्री करण्याविषयी बोलत असल्याचे दिसत आहे. ती व्यक्ती राखीचा पती रितेश असल्याचे म्हटले जात आहे. पण प्रोमोमध्ये राखीसोबत नेमकं कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राखी सावंतने जेव्हा रितेशशी लग्न केले तेव्हा ती चर्चेत होती. पण रितेशला आजपर्यंत कुणीही पाहिलेला नाही. अनेकांनी राखीने चर्चेत येण्यासाठी केवळ खोटे लग्न केले आहे असे म्हटले आहे. आता बिग बॉसच्या घरात रितेशची एण्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे.

याविषयी ‘ईटाइम्स’शी बोलताना राखी म्हणाली, ‘जेव्हा मी अनेकांना माझे लग्न रितेश नावाच्या एका उद्योगपतीशी झाल्याचे सांगितले तेव्हा कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. अनेकांनी मी खोटं बोलत आहे असे म्हटले. इतकेच काय तर हा एक पब्लिसिटी स्टंट आहे असेही अनेकांनी म्हटले. माझ्या पतीचा चेहरा लोकांना पाहायला मिळाला नाही म्हणून कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता बिग बॉस १५मध्ये धमाल पाहा.’

Team Beauty Of Maharashtra