‘राजा राणी ची ग जोडी’ मधील या कलाकाराला मिळाला मोठा सन्मान !

‘राजा राणी ची ग जोडी’ मधील या कलाकाराला मिळाला मोठा सन्मान !

” राजा राणी ची ग जोडी” ही मालिका सध्या वेगळ्या वळणावर आली आहेत. गेल्या काही भागामध्ये आपण पहात आहे. रणजीत हा बळीराजासाठी नवनवीन योजना आखत आहे. त्यापैकी त्यांनी एक योजना आखली होती, की बळीराजाचा माल प्रत्यक्षरीत्या तो बाजारात जाऊन विकणार असे रणजीत व त्याचे बळिराजा सदस्य ठरवतात.

यातच दादासाहेबांचा पेरलेला माणूस जगन ही सर्व माहिती दादासाहेब व राजश्री वहिणींना देतो. यावर राजश्री वहिनी सर्व माल एका गोदाममध्ये जमा होईल, अशी काहीतरी योजना दे म्हणजे रणजीत भाऊजी तसं करतील आणि पुढील कामास आपल्याला सोयीस्कर होईल, असे सांगते.

जगन रणजीत जवळ येऊन सांगतो की, आपण सर्व माल एका गोदामात ठेवू आणि तिथूनच सर्व शेतकऱ्यांना बाजारात जाण्यास सोपे होईल, असे करू. रणजीत जगनला हो असेच सांगतो. रात्री सर्व माल गोदाममध्ये ठेवला जातो. यानंतर रणजीत आणि सुजित हे दोघे बंधू रात्रीतून त्या गोदामातील माल हलवतात आणि त्या गोदामात गौर्या व भुसा भरलेली पोते ठेवतात.

मध्यरात्री या गोदामाला आग लागते. सर्व शेतकरी हळहळ करतात. रणजीत तिथे येऊन पाहतो. परंतु तो सगळ्यात जास्त हैराण होतो. आतमध्ये संजीवनी असल्याचे कळते. त्यामुळे संजीवनीला तो वाचवतो. दुसऱ्या दिवशी सगळ्यांसमोर तो सत्य सांगतो की, आपला माल जळालेला नाही. तो सुरक्षित आहे. सगळे सत्य दादासाहेब व शेतकऱ्यांसमोर सांगतो.

रणजीत म्हणतो की, मला माहिती होते जगन असे काहीतरी करणार आहे. तो दादासाहेबांचा माणूस आहे, हे मला कधीच समजले होते. म्हणून तो माल मी सुजितच्या ढाब्यावर नेऊन ठेवला आहे .हे सर्व खोटे आहे, असे सांगण्याचा प्रयत्न राजश्री वहिनी आणि दादासाहेब करतात. तेवढ्यात जगनला सुजित समोर घेऊन येतो आणि तो दादासाहेब, दादासाहेब अशी गयावया करतो.

तेवढ्यातच सर्व शेतकरी मिळुन त्याला मारतात. रणजीत म्हणतो की, दादासाहेब मी आता काहीच करू शकत नाही. मी फक्त दादासाहेब हाय हाय असं म्हणू शकतो. सर्व शेतकरी दादासाहेब हाय हाय व राजश्री वहिनी हाय हाय अशी घोषणा देऊ लागतात. ही सर्व परिस्थिती संजीवनी अतिशय चोखपणे हाताळते.

कालच्या भागात आपण असे पाहिले आहे की, रणजीत पुन्हा आपल्या नोकरीवर रुजू होतो. संजीवनी हे पाहून आश्चर्यचकित होते, हे सर्व संजीवनीला स्वप्न पडत आहे की सत्यात रंजीत पुन्हा आपल्या नोकरीवर रुजू झाला आहे. हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे .रणजीतचा लहान भाऊ सुजित ढाले पाटील आहे.

हा संजूचा खुप चांगला मित्र देखील असतो. सुजित हा संजीवनीला नेहमीच मदत करत असतो. जेव्हा जेव्हा संजीवनीवर काही संकट आले आहेत. त्यावेळी सुजित हा संजीवनी सोबत खंबीरपणे उभा टाकला आहे. जेव्हा सुजित वर अपर्णाचे संकट होते, त्यावेळी संजू हे संकट हिमतीने लढा, असे सुजीतला सांगते व ती त्याच्या सोबत आहे, असे सांगते.

संजू म्हणते की, मी नेहमी तुझ्या सोबत असेन. याच कारणामुळे सुजित संजूला राखी बांधून बहिणीने भावाला राखी बांधावी, असा मान असला तरी आज मी तुला राखी बांधणार आहे असे म्हणतो. सुजित चे खरे नाव पार्थ घाडगे असे आहे . पार्थ ला खूप मोठा सन्मान मिळणार आहे.

हा सन्मान पाच नोव्हेंबरला मिळणार आहे. पार्थला इंद्रधनु कलाविष्कार मार्फत बालगंधर्व युवा पदार्पण पुरस्कार मिळणार आहे.

Team Beauty Of Maharashtra