‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेच्या चाहत्यांसाठी ‘गुडन्यूज’

‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेच्या चाहत्यांसाठी ‘गुडन्यूज’

एखाद्या मालिकेचा टीआरपी जर कमी झाला तर त्या मालकीची वेळ बदलण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षापासून मराठी मालिकांच्या बाबतीत घडत आहे. याचे कारण म्हणजे मालिकेचा टीआरपी घसरला तर मालिकेचे उत्पन्न हे घसरते. त्यामुळे मालिकेत काम करणारे कलाकार बॅकस्टेज कलाकार या सगळ्यांचे पैसे देण्याचे निर्मात्याला अवघड होऊन जाते.

त्यामुळे एखादी मालिका टीआरपी बाबत घसरत असल्यास हळूहळू तिची वेळ बदलून नंतर ती मालिका बंद करण्यात येते. अशा अनेक मालिका गेल्या काही दिवसात सुरू झाल्या आणि बंद देखील झाल्या. स्वामिनी या मालिकेची वेळ देखील काही दिवस बदलण्यात आली. त्यानंतर ही मालिका बंद करण्यात आली.

या मालिकेला टीआरपी मिळत नव्हता की, अजून काय कारण होते, हे काही कळाले नाही. मात्र, ही मालिका सुंदर होती, तरी देखील निर्मात्यांनी ही मालिका तातडीने बंद केली. राजा राणीची ग जोडी या मालिकेची वेळ आता बदलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या मालिकेच्या जागी नवीन मालिका सुरू होणार आहे.

राजा राणीची जोडी ही मालिका गेल्या अनेक दिवसापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत सगळ्याच भूमिका या लोकप्रिय ठरताना दिसत आहेत. मात्र, आता मालिकेचा ट्रेंड काहीतरी बदल जात आहे. त्यामुळे मालिकेची वेळ बदलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी राजा राणी ची ग जोडी मालिका बंद होणार असल्याचे सांगण्यात येत होतं. कलर्स मराठी वर “योगेश्वर जय शंकर” ही नवी मालिका सुरू होणार आहे. ३० मे पासून ही मालिका संध्याकाळी ७ वाजता ही मालिका टेलिकास्ट होणार आहे. या नव्या मालिकेमुळे राजा राणी ची ग जोडी ही मालिका बंद होण्याची शक्यता होती.

पण राजा राणीची ग जोडी मालिका पाहणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. ही मालिका बंद होणार नसून मालिकेचे वेळ बदलणार आहे. राजा राणीची ग जोडी ही मालिका संध्याकाळी साडेसहाला तुम्हाला कलर्स मराठी वर पाहता येईल. स्वतः कलर्स मराठीने इंस्टाग्राम वर एका हा देताना हा खुलासा केला आहे.

याशिवाय नव्या मालिकेच्या आगमनाने कलर्स मराठी वर कोणतीच मालिका बंद होणार नसून मालिकांचा फक्त वेळ बदलणार आहे. तर तुम्हाला राजा राणीची ग जोडी मालिका आवडते का? राजा राणीची ग जोडी मालिकेची बदललेली वेळ तुम्हाला आवडेल का आणि योगेश्वर जय शंकर या नवीन मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra