राहू केतू वाढवणार या चार राशींच्या समस्या, आजपासूनच राहावे लागेल सावध!

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह नियमित अंतराने भ्रमण करतात, ज्यामुळे मानवी जीवनावर परिणाम होतो. होळीच्या अवघ्या 4 दिवसांनी म्हणजेच 12 मार्चला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. जिथे राहू आधीच स्थित आहे. ज्याचा प्रभाव 4 राशींवर होऊ शकतो. राहू-शुक्र संयोग मेष, वृषभ, कन्या आणि मीन राशीसाठी त्रासदायक असू शकतो.
मेष- या राशीच्या लोकांनी राहू आणि शुक्रापासून सावध राहण्याची गरज आहे. ही युती आरोग्यास हानी पोहोचवू शकते. गुप्त शत्रू सक्रिय होतील. लव्ह लाईफमध्ये फसवणुकीचा बळी होऊ शकतो. यासोबतच वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. पत्नीची तब्येत बिघडू शकते.
वृषभ- राहू आणि शुक्राचा संयोग अशुभ घडवून आणेल. आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. ऑफिसमध्ये तुम्ही स्वतःसाठी अडचणी निर्माण करू शकता. प्रेम आणि लग्नाच्या बाबतीत थोडे समजूतदार व्हा. हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. या काळात शनि मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
कन्या- राहू आणि शुक्राचा संयोग तुमच्यासाठी वाईट काळ आणू शकतो. हा योग तुमच्या कुंडलीच्या आठव्या घरात तयार होईल. या काळात तब्येत बिघडू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कोणाशीही वाईट वागू नका. तुमचे कर्मच तुमचे भाग्य ठरवणार आहे. त्यामुळे लांबचा विचार करून निर्णय घ्या.
मीन- राहू आणि शुक्राचा संयोग तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. पैशाची कमतरता भासू शकते. कौटुंबिक सहकार्य मिळणार नाही. तुम्हाला मानसिक त्रास होईल. कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागेल. ऑफिसमध्ये कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. अनावश्यक साहस टाळा. गुंतवणूक करण्याआधी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या.