‘पुष्पा’ ला श्रेयस, तर चित्रपटात कोंडा रेड्डी यांना कुणी दिलाय आवाज पहा

‘पुष्पा’ ला श्रेयस, तर चित्रपटात कोंडा रेड्डी यांना कुणी दिलाय आवाज पहा

पुष्पा द राईस हा चित्रपट काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाला. त्यामुळे हिंदीतही प्रेक्षकांच्या उड्या या चित्रपटावर पडल्या आहेत.

हिंदी चित्रपटात अल्लू अर्जुन याच्या पुष्पा या कॅरेक्टरला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे यांनी दमदार असा आवाज दिला आहे. त्यामुळे चित्रपट हा अतिशय जबरदस्त झाला आहे. आता इतर कलाकारांना कोणी आवाज दिला याबाबत अनेकांना माहीत नव्हती तर आम्ही आपल्याला या लेखामध्ये चित्रपटातील इतर कलाकारांना हिंदीमध्ये कोणी आवाज दिला आहे ते सांगणार आहोत.

1) श्री वल्ली– या चित्रपटात श्री वल्ली ची भूमिका अतिशय जबरदस्त अशी झाली आहे. ही भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने साकारली आहे. रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समजली जाते. हिंदी चित्रपटात श्री वल्ली हिला स्मिता रोजमे यांनी आवाज दिला आहे.

2) केसर सिंह शेखावत – या चित्रपटामध्ये केसर सिंह शेखावत ही भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली आहे. ही भूमिका तिने जबरदस्तरित्या साकारली आहे. फवाद हा अतिशय जबरदस्त असा अभिनेता आहे. हिंदीमध्ये फवाद त्याच्या भूमिकेला राजेश खट्टर यांनी आवाज दिला आहे.

3) मंगलम श्री – पुष्पा या चित्रपटांमध्ये मंगलम श्री ही भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय झाली आहे. दाक्षिणात्य अभिनेता सुनील यांनी ही भूमिका साकारली आहे. हिंदीमध्ये या कॅरेक्टरला मराठमोळे अभिनेते उदय सबनीस यांनी आपला आवाज दिला आहे.

4) जॉली रेड्डी – पुष्पा चित्रपटात ही भूमिका देखील अतिशय जबरदस्त अशी झाली आहे. ही भूमिका धनंजय यांनी साकारली आहे. हिंदी चित्रपटामध्ये धनंजय यांच्या भूमिकेला मनोज पांडे यांनी आवाज दिला आहे.

5) कोंडा रेड्डी – पुष्पा चित्रपटात कोंडा रेड्डी यांची भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय झालेली आहे. हिंदी मध्ये अजय शहा यांच्या या भूमिकेला राजेश जॉली यांनी आवाज दिला आहे.

6) दाक्षियाणी – ही भूमिका अभिनेत्री अनुसया भारद्वाज यांनी साकारली. अतिशय जबरदस्तरित्या तिने ही भूमिका केली आहे. ती अनेक चित्रपटात दिसते. हिंदीमध्ये अनुसया हिच्या कॅरेक्टर ला सबिना मौसम यांनी आवाज दिला आहे.

Team Beauty Of Maharashtra