सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा’ ची ऑफर फेटाळून ‘या’ सहा कलाकारांनी घेतलं स्वतःच नुकसान करून

सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा’ ची ऑफर फेटाळून ‘या’ सहा कलाकारांनी घेतलं स्वतःच नुकसान करून

पुष्पा द राईज हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास दीड ते दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे, असे असले तरी या चित्रपटाची चर्चा अजूनही थांबायचे नाव घेत नाही. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन याने पुष्पराज ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत रश्मिका मंदाना ही अभिनेत्री दिसली आहे, तर एका ॲटम सॉंगमध्ये अभिनेत्री समंथा हिने जोरदार ठुमके लावले आहेत. तिची ही भूमिकाही प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे, तर या चित्रपटाचा हिंदी मध्ये देखील रिमेक करण्यात आला आहे. हिंदीमधील रिमेक प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.

हिंदीमधील रिमेकमध्ये श्रेयस तळपदे याने पुष्पा या पत्राला आवाज दिला आहे. अल्लू अर्जुन याच्या आधी हा चित्रपट करण्यासाठी जवळपास सहा अभिनेता आणि अभिनेत्रींना या चित्रपटासाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ही ऑफर नाकारली आता त्यांना खूप मोठा पश्चाताप होत असल्याचे दिसत आहे.

1) महेश बाबू – महेश बाबू हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचे नाव आहे. ते दिग्गज अभिनेता देखील आहेत. त्याने आजवर अनेक चित्रपटात काम केलेले आहे. पुष्पा चित्रपटासाठी देखील त्याला विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्याने हा चित्रपट नाकारला. चित्रपट नाकारण्याचे कारण म्हणजे आपल्या प्रतिभेसारखा हा चित्रपट नाही, असे त्याचे म्हणणे होते. त्यामुळे तो चित्रपट त्याने नाकारला. यातच त्याचे नुकसान झाले.

2) समंथा – समंथा ही दाक्षिणात्य चित्रपट सुट्टी मधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने पुष्पा चित्रपटामध्ये देखील एका आयटम सॉंग केले आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी तिने नकार दिला होता. कारण की तिला ब्रेक हवा होता, असे सांगण्यात आले.

3) दिशा पाटणी – दिशा पाटणी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. दिशा पाटनी हिला देखील या चित्रपटातील आयटम सॉंग साठी विचारणा करण्यात आली होती. मात्र तिने आयटम सॉन्ग साठी कोट्यवधी रुपये मागितले. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी तिला नकार दिला.

4) नोरा फतेही – नोरा फतेही ही आता बॉलिवूडमध्ये चांगलीच रमली आहे. या चित्रपटातही तिने चांगले काम केले होते. त्याचप्रमाणे इतर चित्रपटातील तिच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. नोरा फतेही पुष्पा चित्रपटातील आयटमसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, तिने या गाण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितले होते. त्यामुळे तिला देखील नकार देण्यात आला.

5) विजय सेतुपती – विजय सेतुपती हा तामिळ मधील मोठा सुपरस्टार आहे. मात्र, त्याच्याकडे अनेक चित्रपट असल्याने त्याला हा चित्रपट करण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे त्याने या चित्रपटासाठी नकार दिला.

6) नारा रोहित – नारा रोहित हा देखील तेलगू सुपरस्टार आहे. त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटासाठी त्याला विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्याने या चित्रपटाला स्पष्टपणे नकार देऊन टाकला.

Team Beauty Of Maharashtra