मेष राशीत पुन्हा होणार चंद्र आणि गुरुची युती, गजकेसरी योगामुळे या राशींना होणार फायदा

मेष राशीत पुन्हा होणार चंद्र आणि गुरुची युती, गजकेसरी योगामुळे या राशींना होणार फायदा

ग्रहमंडळ आणि राशीचक्र याचं एक वेगळंच नातं आहे. ग्रहमंडळातील ग्रह ठरावीक कालावधीनंतर या राशीचक्रात भ्रमण करत असतात. त्यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होते. ग्रहमंडळातील चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. तर शनि हा मंद गतीने म्हणजेच अडीच वर्षाने गोचर करतो. त्यामुळे गोचरांचा प्रभाव जातकांवर दिसून येतो. कधी शुभ, तर कधी अशुभ योग जुळून येतात. आता मेष राशीत पुन्हा एकदा गजकेसरी हा अत्यंत शुभ योग जुळून येणार आहे.

17 मे 2023 रोजी चंद्र ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. चंद्र 17 मे 2023 रोजी सकाळी 7 वाजून 38 मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करेल आणि 19 मे 2023 पर्यंत दुपारी 1 वाजून 35 मिनिटांपर्यंत राहील. त्यानंर वृषभ राशीत मार्गस्थ होईल.

मेष राशीत गुरु, राहु, बुध ग्रह असणार आहे. त्यामुळे चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे गजकेसरी योग, राहु आणि चंद्राच्या युतीमुळे ग्रहण योग, बुध आणि चंद्राच्या युतीमुले बुध राजयोग तयार होईल. शुभ अशुभ योगांमुळे प्रारब्ध सोडून जे उरेल त्याची प्रचिती या काळात येईल. गजकेसरी योगाचा तीन राशींना जबर फायदा होईल.

या राशींना होणार फायदा
मीन : गजकेसरी योग या राशीच्या दुसऱ्या म्हणजेच धनस्थानात तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती या काळात चांगली राहील. समाजात मानसन्मान वाढेल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. कौटुंबिक वातावरण चांगलं असल्याने मनावरील ताण कमी होईल. असं असलं तरी ग्रहण योगही नशिबी हे विसरू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा.

मिथुन : या राशीच्या एकादश भावात गजकेसरी योग तयार होत आहे. जातकाचं उत्पन्न आणि नशिब याबाबत हे स्थान महत्त्वाचं ठरतं. यामुळे गजकेसरी योगाचा फायदा होईल. आर्थिक उत्पन्नात वाढ झालेली दिसेल. तसेच नशिबाची चांगली साथ असल्याने शेअर बाजार, लॉटरी या ठिकाणाहून लाभ होण्याची शक्यता आहे. ग्रहण योग असल्याने आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.

कर्क : या राशीच्या दशम स्थानात गजकेसरी योग तयार होत आहे. हे स्थान करिअरशी निगडीत आहे. त्यामुळे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसतील. पदोन्नती किंवा पगारवाढ या काळात होऊ शकते. तसेच चांगल्या नोकरीची या काळात ऑफर मिळू शकते. ग्रहण योग असल्याने कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा.

Team BM