पुढील १७ दिवस महत्त्वाचे! शनी-सूर्य ‘या’ ३ राशींना बनवणार श्रीमंत? लक्ष्मी देऊ शकते नशिबाला कलाटणी

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्यदेव सध्या पुत्र शनीच्या कुंभ राशीत युती करून स्थिर झाले आहेत तर १५ मार्चला ते कुंभ राशीतून मीन राशीत परिवर्तन करणार आहेत. सूर्याच्या राशी परिवर्तनाच्या आधीचा १७ दिवसांचा काळ हा काही राशींसाठी अत्यंत शुभ व लाभदायक सिद्ध होऊ शकतो.
वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार कुंभ राशीतील शनी व सूर्याची युती वेगळी होण्याआधी अत्यंत दृढ स्थितीत असेल त्यामुळे प्रभावित राशींना शुभ अशुभ प्रभाव हा अधिक प्रबळ जाणवू शकतो. सुदैवाने हा प्रभाव तीन राशींच्या बाबत अत्यंत फायद्याचा ठरण्याची चिन्हे आहेत. तीन भाग्यवान राशींना येत्या काळात अचानक प्रचंड धनलाभ होऊ शकतो. नेमक्या कोणत्या मार्गाने तुमच्या दारी लक्ष्मी येऊ शकते हे जाणून घेऊयात.
मेष – मेष रास ही सूर्याची रास म्हणून ओळखली जाते त्यामुळे कुंभ राशीत असतानाही सूर्यदेव आपल्या मूळ राशीला समृद्ध करतील. आपल्याला नव्या कामाची सुरुवात करता येईल. जे काम करण्यास तुम्ही आजवर उशीर करत होतात त्याच कामातून तुम्हाला प्रचंड मोठा फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी पुढील १७ दिवस सोन्याहून पिवळा योग घेऊन येत आहेत. तुमच्या जोडीदाराचे मन नकळत दुखावले जाऊ नये याची पूर्ण काळजी घ्या. संधी गमावू नका. तुमच्या कामाची यादी करून वेळ व्यवस्थापन करावे लागेल. पुढचे काही दिवस व्यस्थ जातील पण तुम्हाला मानसिक ताण- तणाव फार जाणवणार नाही.
सिंह – सिंह ही सूर्याची कनिष्ठ रास आहे, त्यामुळे येत्या काळात तुम्हाला आर्थिक लाभाची कवाडे उघडू शकतात. तुम्हाला इतरांवर विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे जावे लागू शकते. त्यासाठी तुमचे उद्दिष्ट्य ठरवणे गरजेचे आहे. तुम्हाला येत्या काळात आई वडिलांची साथ लाभू शकते. मित्रांचे मन जपून ठेवा. कामाच्या ठिकाणी वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
धनु – धनु राशीला स्वतःचे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला विचारात घ्यावा लागेल. तुम्ही दृढनिश्चय व कर्म केलं तर तुम्हाला मोठा धनलाभ होऊ शकतो.आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत भाग्य स्थानी स्थिर होणार आहे. याकाळात आपल्याला भाग्याची साथ लाभू शकते. परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या काळात मनाप्रमाणे काम व प्रगतीचे योग आहेत. आपली प्रलंबित कामे पूर्ण होऊन यातूनच धनलाभाची संधी मिळू शकते.