धनु संक्रांती : ‘या’ ५ राशींना आगामी महिना असणार आहे सुखकारक; होईल नफाच नफा

नवग्रहांपैकी चार महत्त्वाचे ग्रह या महिन्यात चलनबदल करणार आहेत. यातील पहिले राशीपरिवर्तन झाले असून, शुक्र तुळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला. यानंतर नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य वृश्चिक राशीतून आज गुरुचे स्वामीत्व असलेल्या धनु राशीत प्रवेश करत आहे. सूर्याच्या या संक्रमणाला संक्रांती म्हटले जाते.
सूर्य धनु राशीत प्रवेश करत असल्यामुळे हा राशीबदल धनु संक्रांती म्हणून ओळखला जातो. यापूर्वी सूर्याने १६ नोव्हेंबर २०२० रोजी तुळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला होता. सूर्य करिअर आणि सामाजिक मान, सन्मान यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यानंतर बुध, मंगळ यांचे राशीपरिवर्तन होईल. सूर्याच्या या राशीपरिवर्तनाचा बहुतांश राशीच्या व्यक्तींवर विशेष प्रभाव पडू शकेल, असे सांगितले जात आहे. सूर्याच्या या राशीपरिवर्तनाचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकेल? जाणून घेऊया…
कर्क – अपेक्षित परिणाम प्राप्त होतील- सूर्याचा धनु राशीतील प्रवेश कर्क राशीच्या व्यक्तींना शुभ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. नोकरदार वर्गांना दिलासा मिळेल. अपेक्षित परिणाम प्राप्त होऊ शकतील. पदोन्नती वा वेतनवृद्धीचे प्रबळ योग जुळून येऊ शकतील. मेहनतीचा योग्य मोबदला मिळू शकेल. विरोधक पराभूत होतील. न्यायालयीन प्रकरणात सकारात्मक वार्ता मिळू शकतील. दिग्गज, लोकप्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग. कार्यालयातील अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे.
तुळ – कौतुक, प्रशंसा होईल- सूर्याचा धनु राशीतील प्रवेश तुळ राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आगामी कालावधीत काही शुभवार्ता मिळतील. कार्यालयात अधिकारी वर्गाकडून कौतुक, प्रशंसा होईल. आपल्या कामाची दखल घेतली जाईल. आनंदाची अनुभूती घ्याल. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. कार्यक्षेत्रातील सहकारी वर्गाचे संपूर्ण सहकार्य लाभेल. भावंडांशी असलेले नाते सुधारेल. आगामी काळात प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. भौतिक सुखाचा अनुभव घ्याल, असे सांगितले जात आहे.
वृश्चिक – मान, सन्मान वाढतील- सूर्याचा धनु राशीतील प्रवेश वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आपण घेत असलेल्या मेहनत व परिश्रमाचे चीज होईल. आपल्या विचारांची दखल घेतली जाईल. आपली मते, सूचना विचारात घेतल्या जाऊ शकतील. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. बचतीच्या योजना आखता येतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. कार्यक्षेत्रात काही ना काही लाभ मिळू शकतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. मान, सन्मान वाढतील, असे सांगितले जात आहे.
धनु – प्रगतीकारक कालावधी- सूर्याचा धनु राशीतील प्रवेश या राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीकारक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आगामी कालावधीत यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. मान, सन्मान वृद्धिंगत होऊ शकतील. व्यवहारात काहीसा बदल झालेला इतरांना जाणवेल. अहंकाराला मात्र दूर ठेवावे. अन्यथा नुकसान संभवते. वैवाहिक जीवन सुखमय होऊ शकतील. मानसिक ताण, तणाव कमी होईल. सूर्याचा धनु राशीत होत असलेला प्रवेश विशेष मानला जात असल्याचे सांगितले जाते.
कुंभ – लाभदायक कालावधी- सूर्याचा धनु राशीतील प्रवेश कुंभ राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जाते. व्यापारी, व्यवसायिकांना आगामी कालावधी उत्तम फायदेशीर ठरू शकेल. मिळकतीत वाढ होईल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना चांगला कालावधी. वैवाहिक जीवनात काही मतभेद होऊ शकतील. मेहनत, परिश्रमाचे चीज होऊ शकेल. नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल. नोकरदार वर्गाला दिलासा मिळू शकेल. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील, असे सांगितले जात आहे.