अभिनेत्री प्रिया बापटच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?, तिच्या इतकीच दिसते खूप सुंदर!

अभिनेत्री प्रिया बापटच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?, तिच्या इतकीच दिसते खूप सुंदर!

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत की ज्यांनी हिंदी चित्रपटातही काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. यामध्ये आपल्याला प्रिया बापटचे नाव घेता येईल. प्रिया बापट हिने गेल्या काही वर्षांमध्ये वेब सिरीज मध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

त्याचप्रमाणे काही वर्षापूर्वी आलेल्या मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात तिने एक छोटी भूमिका केली होती. आज आम्ही आपल्याला तिच्या बहिणी विषयी माहिती देणार आहोत. प्रिया‌ हिने अनेक मालिका, चित्रपट, नाटक यामध्ये काम केले आहे. नाटकाविषयी तर तिचे विशेष असे प्रेम आहे.

प्रिया बापट हिने काही वर्षांपूर्वी संजय दत्त सोबतच्या मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात एक छोटी भूमिका केली होती. त्यानंतर तिला अनेक चित्रपटात भूमिका मिळाल्या. महेश मांजरेकर यांच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात तिने शशिकला भोसले ही भूमिका साकारून सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले होते.

तिने या चित्रपटात रंगीला चित्रपटातील ‘याई रे याई रे’ या गाण्यावर धुमाकूळ घालणारे नृत्य केले होते. हे तिचे नृत्य प्रचंड लोकप्रिय ठरले होते. या चित्रपटातील तिची भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली. त्यानंतर काही वर्षांपूर्वी प्रिया बापट हिने उमेश कामत याच्या सोबत लग्न केले. उमेश कामत हा देखील एक अभिनेता आहे.

प्रिया बापट हिने काही महिन्यांपूर्वी आलेल्या एका वेबसीरीज मध्ये देखील काम केले. तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले आहे. त्याच प्रमाणे आपला पती उमेश कामत याच्या सोबत मिळून ती नाटक देखील करते. तिच्या नाटकाचे शो हे हाऊसफुल होत असतात. त्याप्रमाणे ती अनेक नाटकांची निर्मिती देखील करत असल्याचे सांगण्यात येते.

प्रियाप्रमाणे तिची बहीण देखील कलाक्षेत्रात संबंधित आहे. हे अनेकांना माहिती नाही. आज आपल्याला याबद्दलच माहिती देणार आहोत. प्रिया बापटच्या बहिणीचे नाव श्वेता बापट असे आहे. प्रिया बापट हिची बहिण श्वेता बापट ही आपल्या बहिणीप्रमाणे अभिनेत्री नसून कला क्षेत्राशी संबंधित आहे. श्वेता बापट ही प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर आहे.

अनेक अभिनेता व अभिनेत्रीचे ड्रेस डिझाईन ती करत असते. त्याचप्रमाणे प्रियाचे अनेक ड्रेस डिझाईन केलेले आहेत. स्वतःचे सोशल मीडियावर अधिकृत पेज देखील आहे. आपल्या बहिणी सोबत प्रियाची खूप विशेष अशी अटॅचमेंट आहे. सोशल मीडियावर दोघीही आपल्या जुने फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

नुकताच लहानपणीचा व्हिडिओ या दोघींनीही शेअर केला आहे. श्वेता हिच्याकडे सावंजी नावाचे एक साडीचे ब्रँड देखील आहे. या ब्रँडचे ती प्रमोशन करताना दिसत असते. प्रिया बापट हिने नुकताच विस्फोट या चित्रपटाचे चित्रीकरण संपवले असून या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता रितेश देशमुख दिसणार आहे

Team Beauty Of Maharashtra