प्रत्युषा बॅनर्जीच्या निधनानंतर आई- वडिलांची हलाखीची परिस्थिती; करतात ‘हे’ काम

प्रत्युषा बॅनर्जीच्या निधनानंतर आई- वडिलांची हलाखीची परिस्थिती; करतात ‘हे’ काम

बॉलीवूड तसेच मराठी, हिंदी मालिकांमध्ये अशा अनेक अभिनेत्री, अभिनेता आहेत की, ज्यांना पहिल्यांदाच प्रचंड यश मिळाले. मात्र, काही जणांना हे यश पचवता आले नाही. तर काही जणांनी आपले जीवन संपवले. यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी दिव्या भारती चे नाव घेता येईल.

नव्वदच्या दशकामध्ये दिव्याभारती हिने प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. साधारणत: दोन-तीन चित्रपट केल्यानंतर तिला अफाट लोकप्रियता मिळाली. मात्र, इमारतीच्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. यासाठी साजिद नाडियाद्वाला हा देखील संशयाच्या भोवर्‍यात आला होता.

मात्र, कालांतराने हे प्रकरण दडपले गेले आणि दिव्या भारतीने का आत्महत्या केली हे अजूनही कळू शकले नाही. साधारणत: एक ते दीड वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने देखील आपले जीवन संपवले. अतिशय प्रसिद्धीच्या झोतात आलेला हा अभिनेता एवढ्या लवकर आपल्या जीवनासोबत असा खेळ करेल, असे कोणालाही वाटले नव्हते.

मात्र, राहत्या फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर या प्रकरणातून ड्रग्ज प्रकारदेखील समोर आले होते. याच प्रमाणे असे अनेक अभिनेते व अभिनेत्री आहेत की, ज्यांनी आपले जीवन अल्पावधीतच संपवले यामध्ये जिया खान या अभिनेत्रीचा देखील आपल्याला समावेश करता येईल. तिनेदेखील निशब्द चित्रपटातून चांगला अभिनय केला होता

मात्र, तिने देखील घरात गळफास लावून आत्महत्या केली. यामध्ये आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली याचे नाव समोर आले होते. आता देखील प्रत्युषा बॅनर्जी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण प्रत्युषा बॅनर्जी ही काम करत असलेल्या ‘बालिका वधू’चा दुसरा भाग आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. प्रत्युषा बॅनर्जी हिने पाच वर्षांपूर्वी आपले जीवन संपवले होते.

तिच्या आत्महत्येचे कारण अजूनही कळले नाही. तिने आपले जीवन का संपले याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. आता बालिका वधूचा दुसरा भाग येणार आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे कुटुंबीय देखील पुन्हा समोर आले आहे. तिचे कुटुंबीय आता सध्या हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असल्याचे कळत आहे.

काही दिवसांपूर्वी प्रत्यूषाच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी आपल्या संवेदना बोलून दाखवल्या. प्रत्युषाच्या वडिलांचे नाव शंकर बॅनर्जी असे आहे. या वेळी शंकर म्हणाले की, आमच्या आयुष्यात फार मोठे वादळ आले आहे. प्रत्युषा आमच्यासाठी सगळं काही होती. तिने का आत्महत्या केली हे अजूनही समजत नाही.

या प्रकरणाचा खटला लढता लढता आमच्याकडील सगळे पैसे संपले आहेत. तसेच आमच्याकडे काही देखील राहिले नाही, असे त्यांनी या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. मुलीने आम्हाला खूप चांगले दिवस दाखवले. मात्र, आता वाईट दिवस आमच्यावर आल्याचे ते म्हणाले. सध्या आमच्यावर कर्जाचा खूप मोठा डोंगर आहे.

त्यामुळे आम्हाला एकाच खोलीत राहावे लागत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्युषाची आई सध्या एका चाईल्ड केअर सेंटर मध्ये काम करत असल्याचे समोर आले आहे. तिचे वडील देखील सध्या याच आशेवर आहेत की, काही तरी पुन्हा चमत्कार घडेल आणि प्रत्युषाच्या या प्रकरणात आम्हाला न्याय मिळेल.

मात्र, कोर्टाचे प्रकरण पुढे हळू हळू सरकत आहे. अखेरच्या श्वासापर्यंत आपण ही लढाई लढणार असल्याचे शंकर बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

Team Beauty Of Maharashtra